या धड्याचं नाव आहे पॅरामीटर्स वापरून गाणं लिहिणं. आपण इथं काही गाणी लिहिणार आहोत. कधीकधी कोरस गाताना प्रत्येकवेळी थोडं थोडं वेगळं गावं लागतं. तुम्हाला ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म आठवतंय का? प्रत्येक प्राण्यासाठी कोरस थोडासा वेगळा आहे. अँड ऑन दॅट फार्म, वि हॅड अ काऊ, इ-ॲ-इ-ॲ-ओ. प्रत्येक कोरसमधला थोडासा बदल आपण ज्याला पॅरामीटर्स म्हणतो त्यातून दाखवू शकतो. कधीकधी फंक्शनला पॅरामीटर्सची गरज असते. पॅरामीटर म्हणजे माहितीचा एक अतिरिक्त घटक, जो फंक्शनला पाठवून तुम्ही ते खास कारणासाठी कस्टमाईझ करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आईसक्रिम संडेज करणार असता तेव्हा तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्रॅममधल्या पॅरामीटर्ससारखीच प्रक्रिया वापरता. व्हॅनिला आईसक्रिमची डिस्क सगळ्या संडेजसाठी सारखीच असेल पण जेव्हा तुम्ही मित्रांना कोणती दोन टॉपिंग्ज आवडतील असे विचारता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स मिळतील. टॉपिंग हे फंक्शनचं नाव आहे पण प्रत्येक टॉपिंग हा एक पॅरामीटर असतो. फंक्शन्स आणि पॅरामीटर्स एकत्र येऊन चांगले कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स बनवतात आणि चांगल्या संडेजसुद्धा.