0:00:00.200,0:00:03.000 IF-ELSE स्टेटमेंट म्हणजे दोन गोष्टींमधील[br]निवड असते. 0:00:03.000,0:00:07.000 उदाहरण द्यायचं तर जर आज सोमवार ते शुक्रवार[br]मधला दिवस तर आज शाळेत जायचा दिवस आहे, 0:00:07.000,0:00:09.500 नाहीतर तुम्ही घरी राहून मजा करू शकता. 0:00:09.500,0:00:12.900 आता आपण आपल्या झोंबीबरोबर IF-ELSE स्टेटमेंट[br]कसे वापरू शकतो ते पाहा. 0:00:12.900,0:00:16.090 हा ब्लॉक IF ब्लॉकसारखाच दिसतो. 0:00:16.090,0:00:19.000 पण त्याच्या खाली अजून एक भाग आहे, ELSE चा 0:00:19.000,0:00:24.100 जर मी "do" मध्ये "move" ब्लॉक घातला आणि "else" मध्ये "turn left" ब्लॉक घातला तर, 0:00:24.100,0:00:27.240 तर त्याचा अर्थ असा की पुढे जर रस्ता [br]असेल तर झोंबी पुढे जाईल, 0:00:27.240,0:00:30.590 आणि जर पुढे रस्ता नसेल तर[br]झोंबी डावीकडे वळेल. 0:00:30.590,0:00:34.850 तो एक निर्णय घेत आहे आणि त्यानुसार दोन[br]कृतींमधून एकीची निवड करत आहे. 0:00:34.850,0:00:39.000 आणि IF ब्लॉक्सप्रमाणेच तुम्ही IF-ELSE[br]ब्लॉक्स REPEAT ब्लॉक्समध्ये घालू शकता. 0:00:39.000,0:00:41.610 आता आपण त्या झोंबीजना त्यांच्या [br]मूळ ठिकाणी नेऊया.