अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी
प्रत्यक्ष आयुष्यातले अल्गोरीदम्स: बी पेरणे
अल्गोरीदम
या धड्याचं नाव आहे बी पेरणे आणि
अल्गोरीदम्स म्हणजे काय
हे समजून घ्यायला तो आपल्याला मदत
करणार आहे. अल्गोरीदम्स म्हणजे एखादी गोष्ट
कोणत्या क्रमाने करायची हे सांगणाऱ्या विशिष्ट सूचना. अगदी रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे न्याहारी
करणे किंवा दात घासणे हेसुद्धा अल्गोरीदम्स असतात,
ज्यामध्ये एखादे काम करण्यासाठी अनेक लहान पायऱ्या कराव्या लागतात.
कॉम्प्युटर्स अतिशय स्मार्ट असू शकतात पण तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्ही त्यांना पायरीपायरीनं
सांगितलं तरच त्यांना कळतं. अल्गोरीदम्सची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही क्रमानं सूचनांचं
पालन केलंत तर तुम्हाला आधीपासून कशी करायची माहीत नसलेली एखादी गोष्ट तुम्ही करू शकता. एखादी
पाककृती करण्यासारखं आहे हे. आज आपण अल्गोरीदम वापरून बिया पेरणार आहोत. तर आधी आपल्याला
कुंडी मातीनं भरून घ्यायला हवी, नाही का? आपल्याला बीला डिंक लावावा लागणार नाही, असं मला वाटतंय. बरोबर.
चित्रं कापून तुमचा स्वत:चा अल्गोरीदम तयार करा. बीमधल्या पायऱ्या दाखवणारी चित्रं निवडा आणि मग ती
योग्य क्रमानं लावा. आता तुमचा अल्गोरीदम
नीट चालतोय का
हे तुम्ही पाहणार आहात. अल्गोरीदममधल्या
पायऱ्या काळजीपूर्वक करा.
त्यांचा क्रम योग्य आहे का? अल्गोरीदमप्रमाणं बी
पेरण्यात तुम्ही यशस्वी झालात का?
हे म्हणजे चित्रं वापरून प्रोग्रॅमिंग
करण्यासारखं आहे!
आपल्याला जेव्हा चॉकलेट तयार करायचं असतं तेव्हा
त्या प्रक्रियेच्या अनेक मोठ्या
पायऱ्या आहेत. यातल्या प्रत्येक मोठ्या पायरीत
छोट्या पायऱ्यांचा एक संच आहे.
आणि चॉकलेटची चव आपल्याला कशी हवीय
त्यानुसार वेगवेगळ्या कृती किंवा
अल्गोरीदम्स आहेत. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. एक पायरी केली नाही तर
उरलेल्या पूर्ण करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळं प्रत्येक पायरी लिहिणं महत्त्वाचं
आहे, म्हणजे ती कुणीही
केली तरीही परिणाम सारखाच असेल.