WEBVTT 00:00:01.780 --> 00:00:06.848 कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे. 00:00:06.872 --> 00:00:10.808 "तुला पटणार नाही काय झालं आहे, मला खूप संताप येतोय." 00:00:11.260 --> 00:00:14.720 तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून तपशील विचारता. 00:00:14.744 --> 00:00:17.283 आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात. 00:00:17.307 --> 00:00:19.747 व्यायामशाळेत, कार्यालयात किंवा काल रात्री डेटवर 00:00:19.771 --> 00:00:23.096 तुम्ही ऐकता व ते का संतापले हे समजून घ्यायचा प्रयत्न करता. 00:00:23.548 --> 00:00:26.851 कदाचित गुप्तपणे निवाडा करता, त्यांनी चिडायला हवं की नाही NOTE Paragraph 00:00:26.875 --> 00:00:28.985 (हास्य) NOTE Paragraph 00:00:29.009 --> 00:00:31.085 कधी त्यांना सल्लाही देता. 00:00:31.109 --> 00:00:34.649 तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता, ते मी रोज करतो 00:00:34.673 --> 00:00:36.553 कारण मी एक क्रोध संशोधक आहे. 00:00:36.577 --> 00:00:40.907 क्रोध संशोधक म्हणून माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे. 00:00:40.931 --> 00:00:43.709 चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही. 00:00:43.733 --> 00:00:45.542 लोकांना राग का येतो हे अभ्यासताना. 00:00:46.042 --> 00:00:48.788 चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात, 00:00:48.812 --> 00:00:51.093 आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही. 00:00:51.117 --> 00:00:53.585 भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा 00:00:53.609 --> 00:00:56.156 अगदी ठळक अक्षरांत इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो. NOTE Paragraph 00:00:56.180 --> 00:00:57.164 (हास्य) NOTE Paragraph 00:00:57.188 --> 00:00:58.554 तुम्ही कल्पना करू शकता, 00:00:58.578 --> 00:01:00.561 जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे, 00:01:00.585 --> 00:01:02.585 त्यांना रागाबद्दल माझ्याशी बोलावं वाटतं. 00:01:02.609 --> 00:01:04.822 त्यांच्या रागाच्या कथा मला सांगाव्या वाटतात. 00:01:04.846 --> 00:01:06.847 त्यांना चिकित्सकाची गरज आहे, म्हणून नाही. 00:01:06.871 --> 00:01:08.506 जरी कधी असं झालं तरी, 00:01:08.530 --> 00:01:10.410 असं घडतं कारण राग वैश्विक आहे. 00:01:10.434 --> 00:01:13.537 अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो आणि जिचा ते संबंध जोडू शकतात 00:01:13.561 --> 00:01:16.268 आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून पण ती अनुभवत आहोत 00:01:16.292 --> 00:01:19.514 आपल्याला हवं ते मिळालं नाही की आपल्या निषेधार्थ रडण्याने 00:01:19.538 --> 00:01:22.903 जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा" 00:01:22.927 --> 00:01:24.085 मला पाहिजे तो! NOTE Paragraph 00:01:24.109 --> 00:01:25.549 (हास्य) NOTE Paragraph 00:01:26.141 --> 00:01:30.522 संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो, कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल. 00:01:30.546 --> 00:01:31.696 माफ कर, आई. 00:01:32.188 --> 00:01:33.993 अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो. 00:01:34.017 --> 00:01:37.942 जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा राग आपल्या सोबत आहे. 00:01:38.321 --> 00:01:41.171 तो आपल्या दु:खाचा नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे. 00:01:41.195 --> 00:01:44.408 पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही तो आपल्या सोबत आहे. 00:01:44.432 --> 00:01:47.448 लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी. 00:01:47.472 --> 00:01:50.268 सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला, 00:01:50.292 --> 00:01:51.812 खराब हवामान, प्रवासाला विलंब.. 00:01:51.836 --> 00:01:53.840 त्या क्षणी भयंकर वाटते सगळे, 00:01:53.864 --> 00:01:57.140 पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर त्यांचा विसर पडतो. NOTE Paragraph 00:01:57.990 --> 00:02:00.776 मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी खूप संवाद साधतो. 00:02:00.800 --> 00:02:04.197 याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक, 00:02:04.221 --> 00:02:06.363 आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण, 00:02:06.387 --> 00:02:07.680 रागाला एक समस्या मानतात. 00:02:07.704 --> 00:02:09.758 तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो, 00:02:09.782 --> 00:02:12.926 नातेसंबंधांवर परिणाम करतो, म्हणूनच भयानक वाटतो. 00:02:12.950 --> 00:02:16.156 मी हे जाणतो पण मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो, 00:02:16.180 --> 00:02:18.807 आज मी तुम्हांला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे 00:02:18.831 --> 00:02:20.363 तुमच्या रागाबद्दल, ती अशी: 00:02:20.387 --> 00:02:23.799 राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे. 00:02:23.823 --> 00:02:25.522 तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे. 00:02:25.546 --> 00:02:26.879 तो अनुभवणे आवश्यक आहे NOTE Paragraph 00:02:27.792 --> 00:02:30.371 हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ. 00:02:30.395 --> 00:02:32.707 आणि प्रथम आपल्याला राग का येतो यावर चर्चा करू. 00:02:32.731 --> 00:02:35.493 यासाठी आपल्याला एका संशोधकाचे कार्य पाहावे लागेल. 00:02:35.517 --> 00:02:39.557 डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली 00:02:39.581 --> 00:02:42.260 समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे याबद्दल लिहिले 00:02:42.284 --> 00:02:44.507 आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना 00:02:44.531 --> 00:02:46.473 हे सोपे वाटते जसे: 00:02:46.497 --> 00:02:48.045 कोणी डिवचल्यावर मला राग येतो. 00:02:48.506 --> 00:02:50.410 लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं. 00:02:50.434 --> 00:02:51.608 ते असं काहीसं बोलतात, NOTE Paragraph 00:02:51.632 --> 00:02:53.998 "मी संतापतो, जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात " 00:02:54.022 --> 00:02:58.067 "मला राग आला कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले" 00:02:58.091 --> 00:02:59.248 किंवा माझे आवडते वाक्य, 00:02:59.272 --> 00:03:02.918 "मला रागाची समस्या नाही-- फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये." NOTE Paragraph 00:03:02.942 --> 00:03:04.092 (हास्य) NOTE Paragraph 00:03:04.527 --> 00:03:08.712 या चिथावणीच्या विविध प्रकारांना नीट समजून घेण्याच्या हेतूने, 00:03:08.736 --> 00:03:12.998 माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो, 00:03:13.022 --> 00:03:15.149 "कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात जातात ?" 00:03:15.173 --> 00:03:16.514 तुम्हाला कशाचा राग येतो? 00:03:16.538 --> 00:03:19.625 एक फायदा सांगण्याची ही योग्य वेळ आहे. 00:03:19.649 --> 00:03:20.998 क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा 00:03:21.022 --> 00:03:24.299 मी समग्र यादी तयार करण्यासाठी एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे. 00:03:24.323 --> 00:03:27.483 अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात. 00:03:27.507 --> 00:03:28.887 अगदीच मला गरज पडली तर NOTE Paragraph 00:03:28.911 --> 00:03:32.895 (हास्य) NOTE Paragraph 00:03:32.919 --> 00:03:35.078 पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात. 00:03:35.102 --> 00:03:37.537 कारण ते असं म्हणतात, 00:03:37.561 --> 00:03:39.537 "जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो." 00:03:39.561 --> 00:03:41.958 "जे लोक मोठा आवाज करत खातात" 00:03:41.982 --> 00:03:44.410 खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या सार्वत्रिक आहे. 00:03:44.434 --> 00:03:47.514 "जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे. 00:03:47.974 --> 00:03:49.949 आणि हो,"गोलाकार मार्ग " 00:03:49.973 --> 00:03:51.149 गोलाकार मार्ग-- NOTE Paragraph 00:03:51.173 --> 00:03:53.164 (हास्य) NOTE Paragraph 00:03:53.188 --> 00:03:56.299 मी प्रामाणिकपणे सांगतो, या रागाइतका राग इतर कशाचाही नाही. NOTE Paragraph 00:03:56.323 --> 00:03:58.712 (हास्य) NOTE Paragraph 00:03:59.219 --> 00:04:01.300 काहीवेळा त्याची उत्तरे अजिबात किरकोळ नसतात. 00:04:01.324 --> 00:04:04.832 कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी याबद्दल बोलतात. 00:04:04.856 --> 00:04:09.177 पर्यावरणाची हानी-- आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या. 00:04:09.839 --> 00:04:11.053 पण कधीकधी, 00:04:11.077 --> 00:04:14.347 त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात, कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट. 00:04:14.815 --> 00:04:16.950 "तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा, 00:04:16.974 --> 00:04:20.322 तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील कट्ट्यावर वाकता" NOTE Paragraph 00:04:20.346 --> 00:04:21.870 (हास्य) NOTE Paragraph 00:04:21.894 --> 00:04:23.505 अतिशय ठळक, बरोबर? NOTE Paragraph 00:04:23.529 --> 00:04:25.037 (हास्य) NOTE Paragraph 00:04:25.061 --> 00:04:28.488 किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, 00:04:28.512 --> 00:04:30.702 मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?" NOTE Paragraph 00:04:30.726 --> 00:04:35.209 (हास्य) NOTE Paragraph 00:04:35.233 --> 00:04:38.938 आता ते लहान असो किंवा मोठे, साधारण असो की विशिष्ट, 00:04:38.962 --> 00:04:40.593 आपण ही उदाहरणे पाहू शकतो. 00:04:40.617 --> 00:04:43.248 आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो. 00:04:43.272 --> 00:04:46.113 अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो. 00:04:46.137 --> 00:04:48.803 जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते, 00:04:48.827 --> 00:04:51.941 ते टाळणे शक्य होते ही भावना निष्प्रभ करून टाकते. 00:04:51.965 --> 00:04:53.765 ही रागाची पाककृती आहे. 00:04:54.100 --> 00:04:55.488 पण तुम्ही असेही म्हणू शकता, 00:04:55.512 --> 00:04:59.361 अशा परिस्थितीत मनात येणारी राग ही एकमेव भावना नाही. 00:04:59.385 --> 00:05:01.014 राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही. 00:05:01.038 --> 00:05:04.474 आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो. 00:05:04.498 --> 00:05:07.029 किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो. NOTE Paragraph 00:05:07.053 --> 00:05:08.506 पण ती गोष्ट अशी आहे: 00:05:08.530 --> 00:05:11.728 या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही 00:05:11.752 --> 00:05:13.062 फक्त त्याचमुळे तर नाहीच , 00:05:13.086 --> 00:05:14.949 आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर, 00:05:14.973 --> 00:05:18.053 आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो, पण असे होत नाही. 00:05:18.077 --> 00:05:21.355 माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे भिन्न आहेत, 00:05:21.379 --> 00:05:23.497 म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे. 00:05:23.521 --> 00:05:25.014 हे काहीतरी म्हणजे काय? 00:05:25.038 --> 00:05:30.307 चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय, आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं. 00:05:30.331 --> 00:05:34.061 आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो, तुम्ही भुकेले आहात? थकला आहात? 00:05:34.085 --> 00:05:37.545 तुम्हांला कशाची चिंता वाटते? तुम्हाला उशीर झाला आहे? 00:05:37.569 --> 00:05:39.418 तुमच्या मनात अशा गोष्टी असताना, 00:05:39.442 --> 00:05:41.870 त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात. 00:05:42.752 --> 00:05:45.125 पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत, 00:05:45.149 --> 00:05:47.720 ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे: 00:05:47.744 --> 00:05:49.617 आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो. 00:05:49.641 --> 00:05:52.370 जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो? NOTE Paragraph 00:05:52.394 --> 00:05:53.799 जेव्हा काही घडते, 00:05:53.823 --> 00:05:56.903 आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट? 00:05:56.927 --> 00:06:00.601 ते योग्य की अयोग्य? ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र? 00:06:00.990 --> 00:06:04.808 हे झालं प्राथमिक मूल्यमापन, तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता. 00:06:04.832 --> 00:06:07.245 आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे. 00:06:07.269 --> 00:06:09.625 एकदा हे झालं की आपण ठरवतो ते किती वाईट आहे. 00:06:09.649 --> 00:06:11.378 हे झालं दुय्यम मूल्यमापन. 00:06:11.919 --> 00:06:14.464 आपण म्हणतो , "आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे." 00:06:14.488 --> 00:06:16.088 किंवा मी याचा सामना करू शकतो का? NOTE Paragraph 00:06:16.815 --> 00:06:20.322 हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा, तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात. 00:06:21.052 --> 00:06:23.362 अधिक पुढे जाण्याआधी, मी तुम्हांला सांगू इच्छितो, 00:06:23.386 --> 00:06:25.282 मी जर वाईट शक्ती असतो, 00:06:25.306 --> 00:06:28.878 आणि मला तुम्ही संतापण्याजोगी परिस्थिती निर्माण करायची असती, 00:06:28.902 --> 00:06:31.340 तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच असली असती. NOTE Paragraph 00:06:31.364 --> 00:06:32.359 (हास्य) NOTE Paragraph 00:06:32.383 --> 00:06:33.541 खरं आहे हे. 00:06:33.565 --> 00:06:35.732 सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एका ठिकाणी जात आहात, 00:06:35.756 --> 00:06:40.333 घडणारी प्रत्येक गोष्ट- वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण 00:06:40.357 --> 00:06:42.505 असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत. 00:06:42.529 --> 00:06:45.720 सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम, 00:06:45.744 --> 00:06:48.998 सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात. 00:06:49.022 --> 00:06:50.537 सहसा परिणामांशिवाय 00:06:50.561 --> 00:06:52.307 आणि हे नियम कोण मोडतो? 00:06:52.331 --> 00:06:54.926 अनोळखी व्यक्ती, ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही. 00:06:54.950 --> 00:06:58.085 तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात. NOTE Paragraph 00:06:58.109 --> 00:06:59.887 (हास्य) NOTE Paragraph 00:06:59.911 --> 00:07:03.607 तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच. 00:07:03.631 --> 00:07:07.355 तुमच्या समोरील व्यक्ती वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे. 00:07:08.118 --> 00:07:09.341 आणि हे निराशाजनक आहे, 00:07:09.365 --> 00:07:12.316 कारण ते सावकाश का जात आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. 00:07:12.340 --> 00:07:13.658 हे झाले प्राथमिक मूल्यांकन. 00:07:13.682 --> 00:07:16.942 तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात, हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे. 00:07:16.966 --> 00:07:19.567 पण कदाचित तुम्ही ठरवाल की ही तेवढी मोठी गोष्ट नाही. 00:07:19.591 --> 00:07:21.884 तुम्हाला घाई नाही, हरकत नाही. 00:07:21.908 --> 00:07:24.360 हे झालं दुय्यम मूल्यांकन-- तुम्हाला राग येत नाही. NOTE Paragraph 00:07:25.218 --> 00:07:29.074 पण कल्पना करा तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 00:07:29.720 --> 00:07:32.204 ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर? 00:07:32.228 --> 00:07:35.793 तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही, अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे. 00:07:36.315 --> 00:07:39.156 पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते. 00:07:39.180 --> 00:07:40.569 कारण एकाएकी, 00:07:40.593 --> 00:07:42.760 तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 00:07:42.784 --> 00:07:43.935 एकाएकी, 00:07:43.959 --> 00:07:45.869 तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही. 00:07:45.893 --> 00:07:48.846 जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती. NOTE Paragraph 00:07:48.870 --> 00:07:49.871 (हास्य) NOTE Paragraph 00:07:49.895 --> 00:07:52.228 इतरांना तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळत आहे. 00:07:52.252 --> 00:07:53.902 तुम्ही ढासळणार आहात. 00:07:53.926 --> 00:07:55.355 तुम्ही निराधार होणार आहात. 00:07:55.680 --> 00:07:58.633 कदाचित तसेच थांबा, मागे वळा, तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा. NOTE Paragraph 00:07:58.657 --> 00:08:00.815 (हास्य) NOTE Paragraph 00:08:00.839 --> 00:08:02.003 का? 00:08:02.027 --> 00:08:03.901 "या समोरील माणसामुळे. 00:08:03.925 --> 00:08:05.918 हा माणूस नाही, राक्षस आहे." NOTE Paragraph 00:08:05.942 --> 00:08:06.942 (हास्य) NOTE Paragraph 00:08:06.966 --> 00:08:10.480 हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी करण्यासाठी आला आहे. NOTE Paragraph 00:08:10.504 --> 00:08:11.894 (हास्य) NOTE Paragraph 00:08:11.918 --> 00:08:13.767 आता ही विचार प्रक्रिया, 00:08:13.791 --> 00:08:18.497 याला म्हणतात आपत्तीजनन, जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता. 00:08:18.521 --> 00:08:21.252 हा ज्ञात असणाऱ्या विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे. 00:08:21.276 --> 00:08:22.941 जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे. 00:08:22.965 --> 00:08:25.037 पण असे अजूनही आहेत. 00:08:25.061 --> 00:08:26.625 चुकीचा कार्यकारणभाव. 00:08:26.649 --> 00:08:29.426 क्रोधित व्यक्तीचा कल असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो. 00:08:29.450 --> 00:08:31.332 फक्त लोकांना नाही, 00:08:31.356 --> 00:08:33.244 तर निर्जीव वस्तूंना सुद्धा. 00:08:33.268 --> 00:08:35.157 जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे, 00:08:35.181 --> 00:08:38.110 आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या हरवल्या तेंव्हा म्हणालात, 00:08:38.134 --> 00:08:39.585 " कुठे गेल्या किल्ल्या?" 00:08:39.609 --> 00:08:41.633 कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या. NOTE Paragraph 00:08:41.657 --> 00:08:44.567 (हास्य) NOTE Paragraph 00:08:44.591 --> 00:08:47.456 हे नेहमी होत असं त्यांना वाटतं मग ते शब्द वापरतात , "कायम", 00:08:47.480 --> 00:08:50.146 "कधीच नाही ","प्रत्येक", " हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं", 00:08:50.170 --> 00:08:51.551 "मला जे हवं ते मिळत नाही." 00:08:51.575 --> 00:08:54.265 "आज इकडे येताना प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले." 00:08:54.879 --> 00:08:58.149 मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा स्वतःच्या गरजांना महत्व देतात: 00:08:58.173 --> 00:09:00.474 "देवा, ही व्यक्ती इतकी हळू वाहन का चालवत आहे, 00:09:00.498 --> 00:09:04.401 त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन." 00:09:04.425 --> 00:09:06.716 आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण. 00:09:07.275 --> 00:09:10.147 ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात 00:09:10.171 --> 00:09:13.219 किंवा अशा शब्दांचा गठ्ठा जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही. 00:09:13.243 --> 00:09:14.410 या टेड टॉक मध्ये. NOTE Paragraph 00:09:14.434 --> 00:09:15.855 (हास्य) NOTE Paragraph 00:09:15.879 --> 00:09:17.149 तर बराच काळ, 00:09:17.173 --> 00:09:20.629 मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख आकलनविषयक विकृती असा केला आहे. 00:09:20.653 --> 00:09:22.207 किंवा अकारण समज सुद्धा. 00:09:22.231 --> 00:09:24.690 आणि हो, कधीकधी ते अकारण असतात. 00:09:25.462 --> 00:09:27.184 कदाचित बरेचदा. 00:09:27.208 --> 00:09:29.890 पण काही वेळा हे विचार पूर्णपणे तर्कसंगत असतात. 00:09:30.649 --> 00:09:32.379 या जगात अन्याय आहे. 00:09:32.403 --> 00:09:34.115 क्रूर, स्वार्थी माणसे आहेत. 00:09:34.139 --> 00:09:37.997 जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा , 00:09:38.021 --> 00:09:41.240 संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे. NOTE Paragraph 00:09:41.846 --> 00:09:45.847 माझ्या आजच्या बोलण्यातील एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे: 00:09:45.871 --> 00:09:49.617 तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे. 00:09:49.641 --> 00:09:54.299 कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना 00:09:54.323 --> 00:09:56.390 उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. 00:09:56.857 --> 00:09:59.942 जशी भीती तुम्हाला संभाव्य धोक्याची सूचना देते, 00:09:59.966 --> 00:10:02.122 तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो. 00:10:02.146 --> 00:10:04.704 मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा तो एक मार्ग आहे. 00:10:04.728 --> 00:10:06.395 की आता पुरे झालं. 00:10:07.022 --> 00:10:10.416 एवढंच नाही, तो तुम्हाला अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो. 00:10:10.440 --> 00:10:13.646 एक सेकंद विचार करा, मागील वेळी तुम्ही चिडला होता, 00:10:13.670 --> 00:10:15.408 तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते. 00:10:15.432 --> 00:10:17.733 तुमचा श्वासोश्वास वाढला, तुम्हाला घाम आला, 00:10:18.297 --> 00:10:20.161 ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे. 00:10:20.185 --> 00:10:23.363 किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात. 00:10:23.387 --> 00:10:26.974 जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते. 00:10:27.758 --> 00:10:29.584 या फक्त लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. 00:10:29.608 --> 00:10:34.099 त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला. 00:10:34.123 --> 00:10:35.997 त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले. 00:10:36.021 --> 00:10:40.065 आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. 00:10:40.089 --> 00:10:41.542 म्हणून तुमचा चेहरा लाल झाला. 00:10:41.566 --> 00:10:45.105 शारीरिक अनुभवांच्या गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे. 00:10:45.129 --> 00:10:46.367 जो आज अस्तित्वात आहे. 00:10:46.391 --> 00:10:49.149 कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली. 00:10:49.173 --> 00:10:52.506 निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा सामना करण्यासाठी. NOTE Paragraph 00:10:52.976 --> 00:10:56.207 आणि समस्या ही आहे की तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली, 00:10:56.231 --> 00:10:57.504 रागाचा सामना करण्यासाठी, 00:10:57.528 --> 00:10:58.856 शारीरिक लढ्यासाठी, 00:10:58.880 --> 00:11:01.037 त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत. 00:11:03.864 --> 00:11:04.864 कायम चिडून फायदा नाही. NOTE Paragraph 00:11:04.864 --> 00:11:07.704 (हास्य) NOTE Paragraph 00:11:07.728 --> 00:11:09.466 पण इथे एक चांगली बातमी आहे. 00:11:09.490 --> 00:11:10.914 तुम्ही सक्षम आहात 00:11:10.938 --> 00:11:13.395 ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते. 00:11:13.419 --> 00:11:16.174 आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे. 00:11:16.174 --> 00:11:17.174 खूप चिडता तेंव्हाही 00:11:17.174 --> 00:11:18.968 तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता. 00:11:18.992 --> 00:11:21.674 एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे. 00:11:21.698 --> 00:11:23.765 तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा 00:11:24.119 --> 00:11:25.918 तो येऊ नये याबद्दल बोलतो. 00:11:25.942 --> 00:11:28.609 आपण लोकांना शांत व्हा व आराम करा असे सांगतो. 00:11:28.633 --> 00:11:31.164 आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो. 00:11:31.188 --> 00:11:33.466 राग वाईट व तो येणे चुकीचे आहे, असे आपण मानतो. 00:11:33.490 --> 00:11:38.339 पण त्याऐवजी, मला रागाचा प्रेरक म्हणून विचार करायला आवडते. NOTE Paragraph 00:11:38.712 --> 00:11:41.533 तसेच जसे तहान तुम्हाला पाणी पिण्यासाठी प्रेरित करते. 00:11:41.557 --> 00:11:44.684 भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते. 00:11:44.708 --> 00:11:47.660 तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊ शकतो. 00:11:47.684 --> 00:11:51.183 कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी फार विचार करावा लागत नाही. 00:11:51.609 --> 00:11:55.545 जेव्हा आपण पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो, 00:11:56.085 --> 00:11:57.697 हो, काही गोष्टी क्षुल्लक आहेत. NOTE Paragraph 00:12:01.715 --> 00:12:04.922 पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी, पर्यावरणाची हानी, 00:12:04.946 --> 00:12:07.248 या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत. 00:12:07.272 --> 00:12:10.498 त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी संतापणे. 00:12:10.522 --> 00:12:13.585 मग लढण्यासाठी त्या रागाला योग्य वाट करून देणे. 00:12:14.053 --> 00:12:18.283 आणि तुम्ही संताप, शत्रुत्व किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही. 00:12:18.307 --> 00:12:21.434 राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत. 00:12:21.458 --> 00:12:24.379 तुम्ही विरोध करू शकता, संपादकांना पत्र लिहू शकता. 00:12:24.403 --> 00:12:26.946 तुम्ही दान करू शकता, स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता. 00:12:26.970 --> 00:12:29.739 तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता. 00:12:29.763 --> 00:12:31.724 तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता. 00:12:31.748 --> 00:12:34.247 समुदाय तयार करू शकता जो एकमेकांची काळजी घेतो, 00:12:34.271 --> 00:12:36.484 आणि तसे अत्याचार होऊ देत नाही. NOTE Paragraph 00:12:37.331 --> 00:12:40.212 तर पुढील वेळेस, जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल; 00:12:40.236 --> 00:12:42.236 तेव्हा तो दाबून न टाकता, 00:12:42.260 --> 00:12:44.905 मी आशा करतो, तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल. 00:12:44.929 --> 00:12:48.460 सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे तुम्ही त्याला वाट करून द्याल. NOTE Paragraph 00:12:48.785 --> 00:12:49.936 धन्यवाद. NOTE Paragraph 00:12:49.960 --> 00:12:53.460 (टाळ्या)