कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे. "तुला पटणार नाही काय झालं आहे, मला खूप संताप येतोय." तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून तपशील विचारता. आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात. व्यायामशाळेत, कार्यालयात किंवा काल रात्री डेटवर तुम्ही ऐकता व ते का संतापले हे समजून घ्यायचा प्रयत्न करता. कदाचित गुप्तपणे निवाडा करता, त्यांनी चिडायला हवं की नाही (हास्य) कधी त्यांना सल्लाही देता. तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता, ते मी रोज करतो कारण मी एक क्रोध संशोधक आहे. क्रोध संशोधक म्हणून माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे. चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही. लोकांना राग का येतो हे अभ्यासताना. चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात, आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही. भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा अगदी ठळक अक्षरांत इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो. (हास्य) तुम्ही कल्पना करू शकता, जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे, त्यांना रागाबद्दल माझ्याशी बोलावं वाटतं. त्यांच्या रागाच्या कथा मला सांगाव्या वाटतात. त्यांना चिकित्सकाची गरज आहे, म्हणून नाही. जरी कधी असं झालं तरी, असं घडतं कारण राग वैश्विक आहे. अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो आणि जिचा ते संबंध जोडू शकतात आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून पण ती अनुभवत आहोत आपल्याला हवं ते मिळालं नाही की आपल्या निषेधार्थ रडण्याने जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा" मला पाहिजे तो! (हास्य) संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो, कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल. माफ कर, आई. अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो. जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा राग आपल्या सोबत आहे. तो आपल्या दु:खाचा नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे. पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही तो आपल्या सोबत आहे. लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी. सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला, खराब हवामान, प्रवासाला विलंब.. त्या क्षणी भयंकर वाटते सगळे, पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर त्यांचा विसर पडतो. मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी खूप संवाद साधतो. याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक, आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण, रागाला एक समस्या मानतात. तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो, नातेसंबंधांवर परिणाम करतो, म्हणूनच भयानक वाटतो. मी हे जाणतो पण मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो, आज मी तुम्हांला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुमच्या रागाबद्दल, ती अशी: राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे. तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे. तो अनुभवणे आवश्यक आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ. आणि प्रथम आपल्याला राग का येतो यावर चर्चा करू. यासाठी आपल्याला एका संशोधकाचे कार्य पाहावे लागेल. डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे याबद्दल लिहिले आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना हे सोपे वाटते जसे: कोणी डिवचल्यावर मला राग येतो. लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं. ते असं काहीसं बोलतात, "मी संतापतो, जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात " "मला राग आला कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले" किंवा माझे आवडते वाक्य, "मला रागाची समस्या नाही-- फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये." (हास्य) या चिथावणीच्या विविध प्रकारांना नीट समजून घेण्याच्या हेतूने, माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो, "कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात जातात ?" तुम्हाला कशाचा राग येतो? एक फायदा सांगण्याची ही योग्य वेळ आहे. क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा मी समग्र यादी तयार करण्यासाठी एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे. अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात. अगदीच मला गरज पडली तर (हास्य) पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात. कारण ते असं म्हणतात, "जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो." "जे लोक मोठा आवाज करत खातात" खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या सार्वत्रिक आहे. "जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे. आणि हो,"गोलाकार मार्ग " गोलाकार मार्ग-- (हास्य) मी प्रामाणिकपणे सांगतो, या रागाइतका राग इतर कशाचाही नाही. (हास्य) काहीवेळा त्याची उत्तरे अजिबात किरकोळ नसतात. कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी याबद्दल बोलतात. पर्यावरणाची हानी-- आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या. पण कधीकधी, त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात, कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट. "तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा, तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील कट्ट्यावर वाकता" (हास्य) अतिशय ठळक, बरोबर? (हास्य) किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?" (हास्य) आता ते लहान असो किंवा मोठे, साधारण असो की विशिष्ट, आपण ही उदाहरणे पाहू शकतो. आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो. अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो. जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते, ते टाळणे शक्य होते ही भावना निष्प्रभ करून टाकते. ही रागाची पाककृती आहे. पण तुम्ही असेही म्हणू शकता, अशा परिस्थितीत मनात येणारी राग ही एकमेव भावना नाही. राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही. आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो. किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो. पण ती गोष्ट अशी आहे: या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही फक्त त्याचमुळे तर नाहीच , आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर, आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो, पण असे होत नाही. माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे भिन्न आहेत, म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे. हे काहीतरी म्हणजे काय? चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय, आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं. आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो, तुम्ही भुकेले आहात? थकला आहात? तुम्हांला कशाची चिंता वाटते? तुम्हाला उशीर झाला आहे? तुमच्या मनात अशा गोष्टी असताना, त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात. पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत, ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे: आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो. जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो? जेव्हा काही घडते, आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट? ते योग्य की अयोग्य? ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र? हे झालं प्राथमिक मूल्यमापन, तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता. आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे. एकदा हे झालं की आपण ठरवतो ते किती वाईट आहे. हे झालं दुय्यम मूल्यमापन. आपण म्हणतो , "आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे." किंवा मी याचा सामना करू शकतो का? हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा, तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात. अधिक पुढे जाण्याआधी, मी तुम्हांला सांगू इच्छितो, मी जर वाईट शक्ती असतो, आणि मला तुम्ही संतापण्याजोगी परिस्थिती निर्माण करायची असती, तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच असली असती. (हास्य) खरं आहे हे. सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एका ठिकाणी जात आहात, घडणारी प्रत्येक गोष्ट- वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत. सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम, सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात. सहसा परिणामांशिवाय आणि हे नियम कोण मोडतो? अनोळखी व्यक्ती, ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही. तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात. (हास्य) तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच. तुमच्या समोरील व्यक्ती वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे. आणि हे निराशाजनक आहे, कारण ते सावकाश का जात आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. हे झाले प्राथमिक मूल्यांकन. तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात, हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे. पण कदाचित तुम्ही ठरवाल की ही तेवढी मोठी गोष्ट नाही. तुम्हाला घाई नाही, हरकत नाही. हे झालं दुय्यम मूल्यांकन-- तुम्हाला राग येत नाही. पण कल्पना करा तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर? तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही, अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे. पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते. कारण एकाएकी, तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. एकाएकी, तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही. जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती. (हास्य) इतरांना तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळत आहे. तुम्ही ढासळणार आहात. तुम्ही निराधार होणार आहात. कदाचित तसेच थांबा, मागे वळा, तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा. (हास्य) का? "या समोरील माणसामुळे. हा माणूस नाही, राक्षस आहे." (हास्य) हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी करण्यासाठी आला आहे. (हास्य) आता ही विचार प्रक्रिया, याला म्हणतात आपत्तीजनन, जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता. हा ज्ञात असणाऱ्या विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे. जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे. पण असे अजूनही आहेत. चुकीचा कार्यकारणभाव. क्रोधित व्यक्तीचा कल असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो. फक्त लोकांना नाही, तर निर्जीव वस्तूंना सुद्धा. जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे, आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या हरवल्या तेंव्हा म्हणालात, " कुठे गेल्या किल्ल्या?" कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या. (हास्य) हे नेहमी होत असं त्यांना वाटतं मग ते शब्द वापरतात , "कायम", "कधीच नाही ","प्रत्येक", " हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं", "मला जे हवं ते मिळत नाही." "आज इकडे येताना प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले." मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा स्वतःच्या गरजांना महत्व देतात: "देवा, ही व्यक्ती इतकी हळू वाहन का चालवत आहे, त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन." आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण. ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात किंवा अशा शब्दांचा गठ्ठा जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही. या टेड टॉक मध्ये. (हास्य) तर बराच काळ, मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख आकलनविषयक विकृती असा केला आहे. किंवा अकारण समज सुद्धा. आणि हो, कधीकधी ते अकारण असतात. कदाचित बरेचदा. पण काही वेळा हे विचार पूर्णपणे तर्कसंगत असतात. या जगात अन्याय आहे. क्रूर, स्वार्थी माणसे आहेत. जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा , संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे. माझ्या आजच्या बोलण्यातील एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे: तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे. कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. जशी भीती तुम्हाला संभाव्य धोक्याची सूचना देते, तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो. मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा तो एक मार्ग आहे. की आता पुरे झालं. एवढंच नाही, तो तुम्हाला अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो. एक सेकंद विचार करा, मागील वेळी तुम्ही चिडला होता, तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते. तुमचा श्वासोश्वास वाढला, तुम्हाला घाम आला, ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे. किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात. जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते. या फक्त लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला. त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले. आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. म्हणून तुमचा चेहरा लाल झाला. शारीरिक अनुभवांच्या गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे. जो आज अस्तित्वात आहे. कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली. निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा सामना करण्यासाठी. आणि समस्या ही आहे की तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली, रागाचा सामना करण्यासाठी, शारीरिक लढ्यासाठी, त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत. कायम चिडून फायदा नाही. (हास्य) पण इथे एक चांगली बातमी आहे. तुम्ही सक्षम आहात ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते. आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे. खूप चिडता तेंव्हाही तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता. एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे. तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा तो येऊ नये याबद्दल बोलतो. आपण लोकांना शांत व्हा व आराम करा असे सांगतो. आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो. राग वाईट व तो येणे चुकीचे आहे, असे आपण मानतो. पण त्याऐवजी, मला रागाचा प्रेरक म्हणून विचार करायला आवडते. तसेच जसे तहान तुम्हाला पाणी पिण्यासाठी प्रेरित करते. भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते. तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊ शकतो. कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी फार विचार करावा लागत नाही. जेव्हा आपण पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो, हो, काही गोष्टी क्षुल्लक आहेत. पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी, पर्यावरणाची हानी, या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत. त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी संतापणे. मग लढण्यासाठी त्या रागाला योग्य वाट करून देणे. आणि तुम्ही संताप, शत्रुत्व किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही. राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत. तुम्ही विरोध करू शकता, संपादकांना पत्र लिहू शकता. तुम्ही दान करू शकता, स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता. तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता. तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता. समुदाय तयार करू शकता जो एकमेकांची काळजी घेतो, आणि तसे अत्याचार होऊ देत नाही. तर पुढील वेळेस, जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल; तेव्हा तो दाबून न टाकता, मी आशा करतो, तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल. सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे तुम्ही त्याला वाट करून द्याल. धन्यवाद. (टाळ्या)