1 00:00:01,780 --> 00:00:06,848 कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे. 2 00:00:06,872 --> 00:00:10,808 "तुला पटणार नाही काय झालं आहे, मला खूप संताप येतोय." 3 00:00:11,260 --> 00:00:14,720 तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून तपशील विचारता. 4 00:00:14,744 --> 00:00:17,283 आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात. 5 00:00:17,307 --> 00:00:19,747 व्यायामशाळेत, कार्यालयात किंवा काल रात्री डेटवर 6 00:00:19,771 --> 00:00:23,096 तुम्ही ऐकता व ते का संतापले हे समजून घ्यायचा प्रयत्न करता. 7 00:00:23,548 --> 00:00:26,851 कदाचित गुप्तपणे निवाडा करता, त्यांनी चिडायला हवं की नाही 8 00:00:26,875 --> 00:00:28,985 (हास्य) 9 00:00:29,009 --> 00:00:31,085 कधी त्यांना सल्लाही देता. 10 00:00:31,109 --> 00:00:34,649 तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता, ते मी रोज करतो 11 00:00:34,673 --> 00:00:36,553 कारण मी एक क्रोध संशोधक आहे. 12 00:00:36,577 --> 00:00:40,907 क्रोध संशोधक म्हणून माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे. 13 00:00:40,931 --> 00:00:43,709 चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही. 14 00:00:43,733 --> 00:00:45,542 लोकांना राग का येतो हे अभ्यासताना. 15 00:00:46,042 --> 00:00:48,788 चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात, 16 00:00:48,812 --> 00:00:51,093 आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही. 17 00:00:51,117 --> 00:00:53,585 भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा 18 00:00:53,609 --> 00:00:56,156 अगदी ठळक अक्षरांत इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो. 19 00:00:56,180 --> 00:00:57,164 (हास्य) 20 00:00:57,188 --> 00:00:58,554 तुम्ही कल्पना करू शकता, 21 00:00:58,578 --> 00:01:00,561 जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे, 22 00:01:00,585 --> 00:01:02,585 त्यांना रागाबद्दल माझ्याशी बोलावं वाटतं. 23 00:01:02,609 --> 00:01:04,822 त्यांच्या रागाच्या कथा मला सांगाव्या वाटतात. 24 00:01:04,846 --> 00:01:06,847 त्यांना चिकित्सकाची गरज आहे, म्हणून नाही. 25 00:01:06,871 --> 00:01:08,506 जरी कधी असं झालं तरी, 26 00:01:08,530 --> 00:01:10,410 असं घडतं कारण राग वैश्विक आहे. 27 00:01:10,434 --> 00:01:13,537 अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो आणि जिचा ते संबंध जोडू शकतात 28 00:01:13,561 --> 00:01:16,268 आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून पण ती अनुभवत आहोत 29 00:01:16,292 --> 00:01:19,514 आपल्याला हवं ते मिळालं नाही की आपल्या निषेधार्थ रडण्याने 30 00:01:19,538 --> 00:01:22,903 जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा" 31 00:01:22,927 --> 00:01:24,085 मला पाहिजे तो! 32 00:01:24,109 --> 00:01:25,549 (हास्य) 33 00:01:26,141 --> 00:01:30,522 संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो, कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल. 34 00:01:30,546 --> 00:01:31,696 माफ कर, आई. 35 00:01:32,188 --> 00:01:33,993 अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो. 36 00:01:34,017 --> 00:01:37,942 जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा राग आपल्या सोबत आहे. 37 00:01:38,321 --> 00:01:41,171 तो आपल्या दु:खाचा नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे. 38 00:01:41,195 --> 00:01:44,408 पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही तो आपल्या सोबत आहे. 39 00:01:44,432 --> 00:01:47,448 लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी. 40 00:01:47,472 --> 00:01:50,268 सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला, 41 00:01:50,292 --> 00:01:51,812 खराब हवामान, प्रवासाला विलंब.. 42 00:01:51,836 --> 00:01:53,840 त्या क्षणी भयंकर वाटते सगळे, 43 00:01:53,864 --> 00:01:57,140 पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर त्यांचा विसर पडतो. 44 00:01:57,990 --> 00:02:00,776 मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी खूप संवाद साधतो. 45 00:02:00,800 --> 00:02:04,197 याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक, 46 00:02:04,221 --> 00:02:06,363 आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण, 47 00:02:06,387 --> 00:02:07,680 रागाला एक समस्या मानतात. 48 00:02:07,704 --> 00:02:09,758 तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो, 49 00:02:09,782 --> 00:02:12,926 नातेसंबंधांवर परिणाम करतो, म्हणूनच भयानक वाटतो. 50 00:02:12,950 --> 00:02:16,156 मी हे जाणतो पण मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो, 51 00:02:16,180 --> 00:02:18,807 आज मी तुम्हांला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे 52 00:02:18,831 --> 00:02:20,363 तुमच्या रागाबद्दल, ती अशी: 53 00:02:20,387 --> 00:02:23,799 राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे. 54 00:02:23,823 --> 00:02:25,522 तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे. 55 00:02:25,546 --> 00:02:26,879 तो अनुभवणे आवश्यक आहे 56 00:02:27,792 --> 00:02:30,371 हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ. 57 00:02:30,395 --> 00:02:32,707 आणि प्रथम आपल्याला राग का येतो यावर चर्चा करू. 58 00:02:32,731 --> 00:02:35,493 यासाठी आपल्याला एका संशोधकाचे कार्य पाहावे लागेल. 59 00:02:35,517 --> 00:02:39,557 डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली 60 00:02:39,581 --> 00:02:42,260 समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे याबद्दल लिहिले 61 00:02:42,284 --> 00:02:44,507 आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना 62 00:02:44,531 --> 00:02:46,473 हे सोपे वाटते जसे: 63 00:02:46,497 --> 00:02:48,045 कोणी डिवचल्यावर मला राग येतो. 64 00:02:48,506 --> 00:02:50,410 लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं. 65 00:02:50,434 --> 00:02:51,608 ते असं काहीसं बोलतात, 66 00:02:51,632 --> 00:02:53,998 "मी संतापतो, जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात " 67 00:02:54,022 --> 00:02:58,067 "मला राग आला कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले" 68 00:02:58,091 --> 00:02:59,248 किंवा माझे आवडते वाक्य, 69 00:02:59,272 --> 00:03:02,918 "मला रागाची समस्या नाही-- फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये." 70 00:03:02,942 --> 00:03:04,092 (हास्य) 71 00:03:04,527 --> 00:03:08,712 या चिथावणीच्या विविध प्रकारांना नीट समजून घेण्याच्या हेतूने, 72 00:03:08,736 --> 00:03:12,998 माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो, 73 00:03:13,022 --> 00:03:15,149 "कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात जातात ?" 74 00:03:15,173 --> 00:03:16,514 तुम्हाला कशाचा राग येतो? 75 00:03:16,538 --> 00:03:19,625 एक फायदा सांगण्याची ही योग्य वेळ आहे. 76 00:03:19,649 --> 00:03:20,998 क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा 77 00:03:21,022 --> 00:03:24,299 मी समग्र यादी तयार करण्यासाठी एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे. 78 00:03:24,323 --> 00:03:27,483 अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात. 79 00:03:27,507 --> 00:03:28,887 अगदीच मला गरज पडली तर 80 00:03:28,911 --> 00:03:32,895 (हास्य) 81 00:03:32,919 --> 00:03:35,078 पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात. 82 00:03:35,102 --> 00:03:37,537 कारण ते असं म्हणतात, 83 00:03:37,561 --> 00:03:39,537 "जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो." 84 00:03:39,561 --> 00:03:41,958 "जे लोक मोठा आवाज करत खातात" 85 00:03:41,982 --> 00:03:44,410 खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या सार्वत्रिक आहे. 86 00:03:44,434 --> 00:03:47,514 "जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे. 87 00:03:47,974 --> 00:03:49,949 आणि हो,"गोलाकार मार्ग " 88 00:03:49,973 --> 00:03:51,149 गोलाकार मार्ग-- 89 00:03:51,173 --> 00:03:53,164 (हास्य) 90 00:03:53,188 --> 00:03:56,299 मी प्रामाणिकपणे सांगतो, या रागाइतका राग इतर कशाचाही नाही. 91 00:03:56,323 --> 00:03:58,712 (हास्य) 92 00:03:59,219 --> 00:04:01,300 काहीवेळा त्याची उत्तरे अजिबात किरकोळ नसतात. 93 00:04:01,324 --> 00:04:04,832 कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी याबद्दल बोलतात. 94 00:04:04,856 --> 00:04:09,177 पर्यावरणाची हानी-- आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या. 95 00:04:09,839 --> 00:04:11,053 पण कधीकधी, 96 00:04:11,077 --> 00:04:14,347 त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात, कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट. 97 00:04:14,815 --> 00:04:16,950 "तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा, 98 00:04:16,974 --> 00:04:20,322 तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील कट्ट्यावर वाकता" 99 00:04:20,346 --> 00:04:21,870 (हास्य) 100 00:04:21,894 --> 00:04:23,505 अतिशय ठळक, बरोबर? 101 00:04:23,529 --> 00:04:25,037 (हास्य) 102 00:04:25,061 --> 00:04:28,488 किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, 103 00:04:28,512 --> 00:04:30,702 मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?" 104 00:04:30,726 --> 00:04:35,209 (हास्य) 105 00:04:35,233 --> 00:04:38,938 आता ते लहान असो किंवा मोठे, साधारण असो की विशिष्ट, 106 00:04:38,962 --> 00:04:40,593 आपण ही उदाहरणे पाहू शकतो. 107 00:04:40,617 --> 00:04:43,248 आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो. 108 00:04:43,272 --> 00:04:46,113 अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो. 109 00:04:46,137 --> 00:04:48,803 जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते, 110 00:04:48,827 --> 00:04:51,941 ते टाळणे शक्य होते ही भावना निष्प्रभ करून टाकते. 111 00:04:51,965 --> 00:04:53,765 ही रागाची पाककृती आहे. 112 00:04:54,100 --> 00:04:55,488 पण तुम्ही असेही म्हणू शकता, 113 00:04:55,512 --> 00:04:59,361 अशा परिस्थितीत मनात येणारी राग ही एकमेव भावना नाही. 114 00:04:59,385 --> 00:05:01,014 राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही. 115 00:05:01,038 --> 00:05:04,474 आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो. 116 00:05:04,498 --> 00:05:07,029 किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो. 117 00:05:07,053 --> 00:05:08,506 पण ती गोष्ट अशी आहे: 118 00:05:08,530 --> 00:05:11,728 या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही 119 00:05:11,752 --> 00:05:13,062 फक्त त्याचमुळे तर नाहीच , 120 00:05:13,086 --> 00:05:14,949 आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर, 121 00:05:14,973 --> 00:05:18,053 आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो, पण असे होत नाही. 122 00:05:18,077 --> 00:05:21,355 माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे भिन्न आहेत, 123 00:05:21,379 --> 00:05:23,497 म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे. 124 00:05:23,521 --> 00:05:25,014 हे काहीतरी म्हणजे काय? 125 00:05:25,038 --> 00:05:30,307 चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय, आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं. 126 00:05:30,331 --> 00:05:34,061 आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो, तुम्ही भुकेले आहात? थकला आहात? 127 00:05:34,085 --> 00:05:37,545 तुम्हांला कशाची चिंता वाटते? तुम्हाला उशीर झाला आहे? 128 00:05:37,569 --> 00:05:39,418 तुमच्या मनात अशा गोष्टी असताना, 129 00:05:39,442 --> 00:05:41,870 त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात. 130 00:05:42,752 --> 00:05:45,125 पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत, 131 00:05:45,149 --> 00:05:47,720 ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे: 132 00:05:47,744 --> 00:05:49,617 आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो. 133 00:05:49,641 --> 00:05:52,370 जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो? 134 00:05:52,394 --> 00:05:53,799 जेव्हा काही घडते, 135 00:05:53,823 --> 00:05:56,903 आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट? 136 00:05:56,927 --> 00:06:00,601 ते योग्य की अयोग्य? ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र? 137 00:06:00,990 --> 00:06:04,808 हे झालं प्राथमिक मूल्यमापन, तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता. 138 00:06:04,832 --> 00:06:07,245 आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे. 139 00:06:07,269 --> 00:06:09,625 एकदा हे झालं की आपण ठरवतो ते किती वाईट आहे. 140 00:06:09,649 --> 00:06:11,378 हे झालं दुय्यम मूल्यमापन. 141 00:06:11,919 --> 00:06:14,464 आपण म्हणतो , "आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे." 142 00:06:14,488 --> 00:06:16,088 किंवा मी याचा सामना करू शकतो का? 143 00:06:16,815 --> 00:06:20,322 हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा, तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात. 144 00:06:21,052 --> 00:06:23,362 अधिक पुढे जाण्याआधी, मी तुम्हांला सांगू इच्छितो, 145 00:06:23,386 --> 00:06:25,282 मी जर वाईट शक्ती असतो, 146 00:06:25,306 --> 00:06:28,878 आणि मला तुम्ही संतापण्याजोगी परिस्थिती निर्माण करायची असती, 147 00:06:28,902 --> 00:06:31,340 तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच असली असती. 148 00:06:31,364 --> 00:06:32,359 (हास्य) 149 00:06:32,383 --> 00:06:33,541 खरं आहे हे. 150 00:06:33,565 --> 00:06:35,732 सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एका ठिकाणी जात आहात, 151 00:06:35,756 --> 00:06:40,333 घडणारी प्रत्येक गोष्ट- वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण 152 00:06:40,357 --> 00:06:42,505 असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत. 153 00:06:42,529 --> 00:06:45,720 सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम, 154 00:06:45,744 --> 00:06:48,998 सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात. 155 00:06:49,022 --> 00:06:50,537 सहसा परिणामांशिवाय 156 00:06:50,561 --> 00:06:52,307 आणि हे नियम कोण मोडतो? 157 00:06:52,331 --> 00:06:54,926 अनोळखी व्यक्ती, ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही. 158 00:06:54,950 --> 00:06:58,085 तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात. 159 00:06:58,109 --> 00:06:59,887 (हास्य) 160 00:06:59,911 --> 00:07:03,607 तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच. 161 00:07:03,631 --> 00:07:07,355 तुमच्या समोरील व्यक्ती वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे. 162 00:07:08,118 --> 00:07:09,341 आणि हे निराशाजनक आहे, 163 00:07:09,365 --> 00:07:12,316 कारण ते सावकाश का जात आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही. 164 00:07:12,340 --> 00:07:13,658 हे झाले प्राथमिक मूल्यांकन. 165 00:07:13,682 --> 00:07:16,942 तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात, हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे. 166 00:07:16,966 --> 00:07:19,567 पण कदाचित तुम्ही ठरवाल की ही तेवढी मोठी गोष्ट नाही. 167 00:07:19,591 --> 00:07:21,884 तुम्हाला घाई नाही, हरकत नाही. 168 00:07:21,908 --> 00:07:24,360 हे झालं दुय्यम मूल्यांकन-- तुम्हाला राग येत नाही. 169 00:07:25,218 --> 00:07:29,074 पण कल्पना करा तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 170 00:07:29,720 --> 00:07:32,204 ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर? 171 00:07:32,228 --> 00:07:35,793 तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही, अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे. 172 00:07:36,315 --> 00:07:39,156 पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते. 173 00:07:39,180 --> 00:07:40,569 कारण एकाएकी, 174 00:07:40,593 --> 00:07:42,760 तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 175 00:07:42,784 --> 00:07:43,935 एकाएकी, 176 00:07:43,959 --> 00:07:45,869 तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही. 177 00:07:45,893 --> 00:07:48,846 जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती. 178 00:07:48,870 --> 00:07:49,871 (हास्य) 179 00:07:49,895 --> 00:07:52,228 इतरांना तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळत आहे. 180 00:07:52,252 --> 00:07:53,902 तुम्ही ढासळणार आहात. 181 00:07:53,926 --> 00:07:55,355 तुम्ही निराधार होणार आहात. 182 00:07:55,680 --> 00:07:58,633 कदाचित तसेच थांबा, मागे वळा, तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा. 183 00:07:58,657 --> 00:08:00,815 (हास्य) 184 00:08:00,839 --> 00:08:02,003 का? 185 00:08:02,027 --> 00:08:03,901 "या समोरील माणसामुळे. 186 00:08:03,925 --> 00:08:05,918 हा माणूस नाही, राक्षस आहे." 187 00:08:05,942 --> 00:08:06,942 (हास्य) 188 00:08:06,966 --> 00:08:10,480 हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी करण्यासाठी आला आहे. 189 00:08:10,504 --> 00:08:11,894 (हास्य) 190 00:08:11,918 --> 00:08:13,767 आता ही विचार प्रक्रिया, 191 00:08:13,791 --> 00:08:18,497 याला म्हणतात आपत्तीजनन, जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता. 192 00:08:18,521 --> 00:08:21,252 हा ज्ञात असणाऱ्या विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे. 193 00:08:21,276 --> 00:08:22,941 जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे. 194 00:08:22,965 --> 00:08:25,037 पण असे अजूनही आहेत. 195 00:08:25,061 --> 00:08:26,625 चुकीचा कार्यकारणभाव. 196 00:08:26,649 --> 00:08:29,426 क्रोधित व्यक्तीचा कल असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो. 197 00:08:29,450 --> 00:08:31,332 फक्त लोकांना नाही, 198 00:08:31,356 --> 00:08:33,244 तर निर्जीव वस्तूंना सुद्धा. 199 00:08:33,268 --> 00:08:35,157 जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे, 200 00:08:35,181 --> 00:08:38,110 आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या हरवल्या तेंव्हा म्हणालात, 201 00:08:38,134 --> 00:08:39,585 " कुठे गेल्या किल्ल्या?" 202 00:08:39,609 --> 00:08:41,633 कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या. 203 00:08:41,657 --> 00:08:44,567 (हास्य) 204 00:08:44,591 --> 00:08:47,456 हे नेहमी होत असं त्यांना वाटतं मग ते शब्द वापरतात , "कायम", 205 00:08:47,480 --> 00:08:50,146 "कधीच नाही ","प्रत्येक", " हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं", 206 00:08:50,170 --> 00:08:51,551 "मला जे हवं ते मिळत नाही." 207 00:08:51,575 --> 00:08:54,265 "आज इकडे येताना प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले." 208 00:08:54,879 --> 00:08:58,149 मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा स्वतःच्या गरजांना महत्व देतात: 209 00:08:58,173 --> 00:09:00,474 "देवा, ही व्यक्ती इतकी हळू वाहन का चालवत आहे, 210 00:09:00,498 --> 00:09:04,401 त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन." 211 00:09:04,425 --> 00:09:06,716 आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण. 212 00:09:07,275 --> 00:09:10,147 ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात 213 00:09:10,171 --> 00:09:13,219 किंवा अशा शब्दांचा गठ्ठा जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही. 214 00:09:13,243 --> 00:09:14,410 या टेड टॉक मध्ये. 215 00:09:14,434 --> 00:09:15,855 (हास्य) 216 00:09:15,879 --> 00:09:17,149 तर बराच काळ, 217 00:09:17,173 --> 00:09:20,629 मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख आकलनविषयक विकृती असा केला आहे. 218 00:09:20,653 --> 00:09:22,207 किंवा अकारण समज सुद्धा. 219 00:09:22,231 --> 00:09:24,690 आणि हो, कधीकधी ते अकारण असतात. 220 00:09:25,462 --> 00:09:27,184 कदाचित बरेचदा. 221 00:09:27,208 --> 00:09:29,890 पण काही वेळा हे विचार पूर्णपणे तर्कसंगत असतात. 222 00:09:30,649 --> 00:09:32,379 या जगात अन्याय आहे. 223 00:09:32,403 --> 00:09:34,115 क्रूर, स्वार्थी माणसे आहेत. 224 00:09:34,139 --> 00:09:37,997 जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा , 225 00:09:38,021 --> 00:09:41,240 संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे. 226 00:09:41,846 --> 00:09:45,847 माझ्या आजच्या बोलण्यातील एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे: 227 00:09:45,871 --> 00:09:49,617 तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे. 228 00:09:49,641 --> 00:09:54,299 कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना 229 00:09:54,323 --> 00:09:56,390 उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. 230 00:09:56,857 --> 00:09:59,942 जशी भीती तुम्हाला संभाव्य धोक्याची सूचना देते, 231 00:09:59,966 --> 00:10:02,122 तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो. 232 00:10:02,146 --> 00:10:04,704 मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा तो एक मार्ग आहे. 233 00:10:04,728 --> 00:10:06,395 की आता पुरे झालं. 234 00:10:07,022 --> 00:10:10,416 एवढंच नाही, तो तुम्हाला अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो. 235 00:10:10,440 --> 00:10:13,646 एक सेकंद विचार करा, मागील वेळी तुम्ही चिडला होता, 236 00:10:13,670 --> 00:10:15,408 तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते. 237 00:10:15,432 --> 00:10:17,733 तुमचा श्वासोश्वास वाढला, तुम्हाला घाम आला, 238 00:10:18,297 --> 00:10:20,161 ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे. 239 00:10:20,185 --> 00:10:23,363 किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात. 240 00:10:23,387 --> 00:10:26,974 जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते. 241 00:10:27,758 --> 00:10:29,584 या फक्त लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. 242 00:10:29,608 --> 00:10:34,099 त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला. 243 00:10:34,123 --> 00:10:35,997 त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले. 244 00:10:36,021 --> 00:10:40,065 आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. 245 00:10:40,089 --> 00:10:41,542 म्हणून तुमचा चेहरा लाल झाला. 246 00:10:41,566 --> 00:10:45,105 शारीरिक अनुभवांच्या गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे. 247 00:10:45,129 --> 00:10:46,367 जो आज अस्तित्वात आहे. 248 00:10:46,391 --> 00:10:49,149 कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली. 249 00:10:49,173 --> 00:10:52,506 निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा सामना करण्यासाठी. 250 00:10:52,976 --> 00:10:56,207 आणि समस्या ही आहे की तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली, 251 00:10:56,231 --> 00:10:57,504 रागाचा सामना करण्यासाठी, 252 00:10:57,528 --> 00:10:58,856 शारीरिक लढ्यासाठी, 253 00:10:58,880 --> 00:11:01,037 त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत. 254 00:11:03,864 --> 00:11:04,864 कायम चिडून फायदा नाही. 255 00:11:04,864 --> 00:11:07,704 (हास्य) 256 00:11:07,728 --> 00:11:09,466 पण इथे एक चांगली बातमी आहे. 257 00:11:09,490 --> 00:11:10,914 तुम्ही सक्षम आहात 258 00:11:10,938 --> 00:11:13,395 ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते. 259 00:11:13,419 --> 00:11:16,174 आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे. 260 00:11:16,174 --> 00:11:17,174 खूप चिडता तेंव्हाही 261 00:11:17,174 --> 00:11:18,968 तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता. 262 00:11:18,992 --> 00:11:21,674 एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे. 263 00:11:21,698 --> 00:11:23,765 तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा 264 00:11:24,119 --> 00:11:25,918 तो येऊ नये याबद्दल बोलतो. 265 00:11:25,942 --> 00:11:28,609 आपण लोकांना शांत व्हा व आराम करा असे सांगतो. 266 00:11:28,633 --> 00:11:31,164 आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो. 267 00:11:31,188 --> 00:11:33,466 राग वाईट व तो येणे चुकीचे आहे, असे आपण मानतो. 268 00:11:33,490 --> 00:11:38,339 पण त्याऐवजी, मला रागाचा प्रेरक म्हणून विचार करायला आवडते. 269 00:11:38,712 --> 00:11:41,533 तसेच जसे तहान तुम्हाला पाणी पिण्यासाठी प्रेरित करते. 270 00:11:41,557 --> 00:11:44,684 भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते. 271 00:11:44,708 --> 00:11:47,660 तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊ शकतो. 272 00:11:47,684 --> 00:11:51,183 कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी फार विचार करावा लागत नाही. 273 00:11:51,609 --> 00:11:55,545 जेव्हा आपण पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो, 274 00:11:56,085 --> 00:11:57,697 हो, काही गोष्टी क्षुल्लक आहेत. 275 00:12:01,715 --> 00:12:04,922 पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी, पर्यावरणाची हानी, 276 00:12:04,946 --> 00:12:07,248 या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत. 277 00:12:07,272 --> 00:12:10,498 त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी संतापणे. 278 00:12:10,522 --> 00:12:13,585 मग लढण्यासाठी त्या रागाला योग्य वाट करून देणे. 279 00:12:14,053 --> 00:12:18,283 आणि तुम्ही संताप, शत्रुत्व किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही. 280 00:12:18,307 --> 00:12:21,434 राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत. 281 00:12:21,458 --> 00:12:24,379 तुम्ही विरोध करू शकता, संपादकांना पत्र लिहू शकता. 282 00:12:24,403 --> 00:12:26,946 तुम्ही दान करू शकता, स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता. 283 00:12:26,970 --> 00:12:29,739 तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता. 284 00:12:29,763 --> 00:12:31,724 तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता. 285 00:12:31,748 --> 00:12:34,247 समुदाय तयार करू शकता जो एकमेकांची काळजी घेतो, 286 00:12:34,271 --> 00:12:36,484 आणि तसे अत्याचार होऊ देत नाही. 287 00:12:37,331 --> 00:12:40,212 तर पुढील वेळेस, जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल; 288 00:12:40,236 --> 00:12:42,236 तेव्हा तो दाबून न टाकता, 289 00:12:42,260 --> 00:12:44,905 मी आशा करतो, तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल. 290 00:12:44,929 --> 00:12:48,460 सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे तुम्ही त्याला वाट करून द्याल. 291 00:12:48,785 --> 00:12:49,936 धन्यवाद. 292 00:12:49,960 --> 00:12:53,460 (टाळ्या)