0:00:01.780,0:00:06.848 कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे. 0:00:06.872,0:00:10.808 "तुला पटणार नाही काय झालं आहे,[br]मला खूप संताप येतोय." 0:00:11.260,0:00:14.720 तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून [br]तपशील विचारता. 0:00:14.744,0:00:17.283 आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात. 0:00:17.307,0:00:19.747 व्यायामशाळेत, कार्यालयात[br]किंवा काल रात्री डेटवर 0:00:19.771,0:00:23.096 तुम्ही ऐकता व ते का संतापले[br]हे समजून घ्यायचा प्रयत्न करता. 0:00:23.548,0:00:26.851 कदाचित गुप्तपणे निवाडा करता,[br]त्यांनी चिडायला हवं की नाही 0:00:26.875,0:00:28.985 (हास्य) 0:00:29.009,0:00:31.085 कधी त्यांना सल्लाही देता. 0:00:31.109,0:00:34.649 तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता,[br]ते मी रोज करतो 0:00:34.673,0:00:36.553 कारण मी एक क्रोध संशोधक आहे. 0:00:36.577,0:00:40.907 क्रोध संशोधक म्हणून[br]माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे. 0:00:40.931,0:00:43.709 चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही. 0:00:43.733,0:00:45.542 लोकांना राग का येतो हे अभ्यासताना. 0:00:46.042,0:00:48.788 चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात, 0:00:48.812,0:00:51.093 आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही. 0:00:51.117,0:00:53.585 भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा 0:00:53.609,0:00:56.156 अगदी ठळक अक्षरांत [br]इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो. 0:00:56.180,0:00:57.164 (हास्य) 0:00:57.188,0:00:58.554 तुम्ही कल्पना करू शकता, 0:00:58.578,0:01:00.561 जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे, 0:01:00.585,0:01:02.585 त्यांना रागाबद्दल[br]माझ्याशी बोलावं वाटतं. 0:01:02.609,0:01:04.822 त्यांच्या रागाच्या कथा[br]मला सांगाव्या वाटतात. 0:01:04.846,0:01:06.847 त्यांना चिकित्सकाची गरज आहे,[br]म्हणून नाही. 0:01:06.871,0:01:08.506 जरी कधी असं झालं तरी, 0:01:08.530,0:01:10.410 असं घडतं कारण राग वैश्विक आहे. 0:01:10.434,0:01:13.537 अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो [br]आणि जिचा ते संबंध जोडू शकतात 0:01:13.561,0:01:16.268 आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून[br]पण ती अनुभवत आहोत 0:01:16.292,0:01:19.514 आपल्याला हवं ते मिळालं नाही की[br]आपल्या निषेधार्थ रडण्याने 0:01:19.538,0:01:22.903 जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय,[br]तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा" 0:01:22.927,0:01:24.085 मला पाहिजे तो! 0:01:24.109,0:01:25.549 (हास्य) 0:01:26.141,0:01:30.522 संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो,[br]कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल. 0:01:30.546,0:01:31.696 माफ कर, आई. 0:01:32.188,0:01:33.993 अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो. 0:01:34.017,0:01:37.942 जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा[br]राग आपल्या सोबत आहे. 0:01:38.321,0:01:41.171 तो आपल्या दु:खाचा[br]नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे. 0:01:41.195,0:01:44.408 पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही[br]तो आपल्या सोबत आहे. 0:01:44.432,0:01:47.448 लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी. 0:01:47.472,0:01:50.268 सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला, 0:01:50.292,0:01:51.812 खराब हवामान, प्रवासाला विलंब.. 0:01:51.836,0:01:53.840 त्या क्षणी भयंकर वाटते सगळे, 0:01:53.864,0:01:57.140 पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर [br]त्यांचा विसर पडतो. 0:01:57.990,0:02:00.776 मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी[br]खूप संवाद साधतो. 0:02:00.800,0:02:04.197 याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक, 0:02:04.221,0:02:06.363 आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण, 0:02:06.387,0:02:07.680 रागाला एक समस्या मानतात. 0:02:07.704,0:02:09.758 तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो, 0:02:09.782,0:02:12.926 नातेसंबंधांवर परिणाम करतो,[br]म्हणूनच भयानक वाटतो. 0:02:12.950,0:02:16.156 मी हे जाणतो पण [br]मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो, 0:02:16.180,0:02:18.807 आज मी तुम्हांला[br]एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे 0:02:18.831,0:02:20.363 तुमच्या रागाबद्दल, ती अशी: 0:02:20.387,0:02:23.799 राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे. 0:02:23.823,0:02:25.522 तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे. 0:02:25.546,0:02:26.879 तो अनुभवणे आवश्यक आहे 0:02:27.792,0:02:30.371 हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ. 0:02:30.395,0:02:32.707 आणि प्रथम आपल्याला राग का येतो[br]यावर चर्चा करू. 0:02:32.731,0:02:35.493 यासाठी आपल्याला एका संशोधकाचे[br]कार्य पाहावे लागेल. 0:02:35.517,0:02:39.557 डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली[br] 0:02:39.581,0:02:42.260 समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे [br]याबद्दल लिहिले 0:02:42.284,0:02:44.507 आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना 0:02:44.531,0:02:46.473 हे सोपे वाटते जसे: 0:02:46.497,0:02:48.045 कोणी डिवचल्यावर मला राग येतो. 0:02:48.506,0:02:50.410 लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं. 0:02:50.434,0:02:51.608 ते असं काहीसं बोलतात, 0:02:51.632,0:02:53.998 "मी संतापतो,[br]जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात " 0:02:54.022,0:02:58.067 "मला राग आला [br]कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले" 0:02:58.091,0:02:59.248 किंवा माझे आवडते वाक्य, 0:02:59.272,0:03:02.918 "मला रागाची समस्या नाही-- [br]फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये." 0:03:02.942,0:03:04.092 (हास्य) 0:03:04.527,0:03:08.712 या चिथावणीच्या विविध प्रकारांना[br]नीट समजून घेण्याच्या हेतूने, 0:03:08.736,0:03:12.998 माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब[br]यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो, 0:03:13.022,0:03:15.149 "कोणत्या गोष्टी [br]तुमच्या डोक्यात जातात ?" 0:03:15.173,0:03:16.514 तुम्हाला कशाचा राग येतो? 0:03:16.538,0:03:19.625 एक फायदा सांगण्याची[br]ही योग्य वेळ आहे. 0:03:19.649,0:03:20.998 क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा 0:03:21.022,0:03:24.299 मी समग्र यादी तयार करण्यासाठी[br]एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे. 0:03:24.323,0:03:27.483 अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात. 0:03:27.507,0:03:28.887 अगदीच मला गरज पडली तर 0:03:28.911,0:03:32.895 (हास्य) 0:03:32.919,0:03:35.078 पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात. 0:03:35.102,0:03:37.537 कारण ते असं म्हणतात, 0:03:37.561,0:03:39.537 "जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो." 0:03:39.561,0:03:41.958 "जे लोक मोठा आवाज करत खातात" 0:03:41.982,0:03:44.410 खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या[br]सार्वत्रिक आहे. 0:03:44.434,0:03:47.514 "जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे. 0:03:47.974,0:03:49.949 आणि हो,"गोलाकार मार्ग " 0:03:49.973,0:03:51.149 गोलाकार मार्ग-- 0:03:51.173,0:03:53.164 (हास्य) 0:03:53.188,0:03:56.299 मी प्रामाणिकपणे सांगतो,[br]या रागाइतका राग इतर कशाचाही नाही. 0:03:56.323,0:03:58.712 (हास्य) 0:03:59.219,0:04:01.300 काहीवेळा त्याची उत्तरे [br]अजिबात किरकोळ नसतात. 0:04:01.324,0:04:04.832 कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी[br]याबद्दल बोलतात. 0:04:04.856,0:04:09.177 पर्यावरणाची हानी--[br]आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या. 0:04:09.839,0:04:11.053 पण कधीकधी, 0:04:11.077,0:04:14.347 त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात,[br]कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट. 0:04:14.815,0:04:16.950 "तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा, 0:04:16.974,0:04:20.322 तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील[br]कट्ट्यावर वाकता" 0:04:20.346,0:04:21.870 (हास्य) 0:04:21.894,0:04:23.505 अतिशय ठळक, बरोबर? 0:04:23.529,0:04:25.037 (हास्य) 0:04:25.061,0:04:28.488 किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला[br]जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, 0:04:28.512,0:04:30.702 मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?" 0:04:30.726,0:04:35.209 (हास्य) 0:04:35.233,0:04:38.938 आता ते लहान असो किंवा मोठे, [br]साधारण असो की विशिष्ट, 0:04:38.962,0:04:40.593 आपण ही उदाहरणे पाहू शकतो. 0:04:40.617,0:04:43.248 आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो. 0:04:43.272,0:04:46.113 अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो. 0:04:46.137,0:04:48.803 जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते, 0:04:48.827,0:04:51.941 ते टाळणे शक्य होते ही भावना [br]निष्प्रभ करून टाकते. 0:04:51.965,0:04:53.765 ही रागाची पाककृती आहे. 0:04:54.100,0:04:55.488 पण तुम्ही असेही म्हणू शकता, 0:04:55.512,0:04:59.361 अशा परिस्थितीत मनात येणारी[br]राग ही एकमेव भावना नाही. 0:04:59.385,0:05:01.014 राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही. 0:05:01.038,0:05:04.474 आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो [br]त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो. 0:05:04.498,0:05:07.029 किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो. 0:05:07.053,0:05:08.506 पण ती गोष्ट अशी आहे: 0:05:08.530,0:05:11.728 या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही 0:05:11.752,0:05:13.062 फक्त त्याचमुळे तर नाहीच , 0:05:13.086,0:05:14.949 आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर, 0:05:14.973,0:05:18.053 आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो,[br]पण असे होत नाही. 0:05:18.077,0:05:21.355 माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे [br]भिन्न आहेत, 0:05:21.379,0:05:23.497 म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे. 0:05:23.521,0:05:25.014 हे काहीतरी म्हणजे काय? 0:05:25.038,0:05:30.307 चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय, [br]आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं. 0:05:30.331,0:05:34.061 आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो,[br]तुम्ही भुकेले आहात? थकला आहात? 0:05:34.085,0:05:37.545 तुम्हांला कशाची चिंता वाटते?[br]तुम्हाला उशीर झाला आहे? 0:05:37.569,0:05:39.418 तुमच्या मनात अशा गोष्टी असताना, 0:05:39.442,0:05:41.870 त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात. 0:05:42.752,0:05:45.125 पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत, 0:05:45.149,0:05:47.720 ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे: 0:05:47.744,0:05:49.617 आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो. 0:05:49.641,0:05:52.370 जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो? 0:05:52.394,0:05:53.799 जेव्हा काही घडते, 0:05:53.823,0:05:56.903 आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट? 0:05:56.927,0:06:00.601 ते योग्य की अयोग्य? [br]ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र? 0:06:00.990,0:06:04.808 हे झालं प्राथमिक मूल्यमापन,[br]तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता. 0:06:04.832,0:06:07.245 आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे. 0:06:07.269,0:06:09.625 एकदा हे झालं की[br]आपण ठरवतो ते किती वाईट आहे. 0:06:09.649,0:06:11.378 हे झालं दुय्यम मूल्यमापन. 0:06:11.919,0:06:14.464 आपण म्हणतो ,[br]"आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे." 0:06:14.488,0:06:16.088 किंवा मी याचा सामना करू शकतो का? 0:06:16.815,0:06:20.322 हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा,[br]तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात. 0:06:21.052,0:06:23.362 अधिक पुढे जाण्याआधी,[br]मी तुम्हांला सांगू इच्छितो, 0:06:23.386,0:06:25.282 मी जर वाईट शक्ती असतो, 0:06:25.306,0:06:28.878 आणि मला तुम्ही संतापण्याजोगी[br]परिस्थिती निर्माण करायची असती, 0:06:28.902,0:06:31.340 तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच[br]असली असती. 0:06:31.364,0:06:32.359 (हास्य) 0:06:32.383,0:06:33.541 खरं आहे हे. 0:06:33.565,0:06:35.732 सांगितल्याप्रमाणे,[br]तुम्ही एका ठिकाणी जात आहात, 0:06:35.756,0:06:40.333 घडणारी प्रत्येक गोष्ट-[br]वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण 0:06:40.357,0:06:42.505 असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत. 0:06:42.529,0:06:45.720 सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम, 0:06:45.744,0:06:48.998 सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात. 0:06:49.022,0:06:50.537 सहसा परिणामांशिवाय 0:06:50.561,0:06:52.307 आणि हे नियम कोण मोडतो? 0:06:52.331,0:06:54.926 अनोळखी व्यक्ती,[br]ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही. 0:06:54.950,0:06:58.085 तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात. 0:06:58.109,0:06:59.887 (हास्य) 0:06:59.911,0:07:03.607 तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात [br]म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच. 0:07:03.631,0:07:07.355 तुमच्या समोरील व्यक्ती[br]वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे. 0:07:08.118,0:07:09.341 आणि हे निराशाजनक आहे, 0:07:09.365,0:07:12.316 कारण ते सावकाश का जात आहेत[br]हे तुम्ही पाहू शकत नाही. 0:07:12.340,0:07:13.658 हे झाले प्राथमिक मूल्यांकन. 0:07:13.682,0:07:16.942 तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात,[br]हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे. 0:07:16.966,0:07:19.567 पण कदाचित तुम्ही ठरवाल की[br]ही तेवढी मोठी गोष्ट नाही. 0:07:19.591,0:07:21.884 तुम्हाला घाई नाही, हरकत नाही. 0:07:21.908,0:07:24.360 हे झालं दुय्यम मूल्यांकन--[br]तुम्हाला राग येत नाही. 0:07:25.218,0:07:29.074 पण कल्पना करा[br]तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 0:07:29.720,0:07:32.204 ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर? 0:07:32.228,0:07:35.793 तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही, [br]अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे. 0:07:36.315,0:07:39.156 पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते. 0:07:39.180,0:07:40.569 कारण एकाएकी, 0:07:40.593,0:07:42.760 तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात. 0:07:42.784,0:07:43.935 एकाएकी, 0:07:43.959,0:07:45.869 तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही. 0:07:45.893,0:07:48.846 जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती. 0:07:48.870,0:07:49.871 (हास्य) 0:07:49.895,0:07:52.228 इतरांना तुमच्या स्वप्नातील[br]नोकरी मिळत आहे. 0:07:52.252,0:07:53.902 तुम्ही ढासळणार आहात. 0:07:53.926,0:07:55.355 तुम्ही निराधार होणार आहात. 0:07:55.680,0:07:58.633 कदाचित तसेच थांबा, मागे वळा,[br]तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा. 0:07:58.657,0:08:00.815 (हास्य) 0:08:00.839,0:08:02.003 का? 0:08:02.027,0:08:03.901 "या समोरील माणसामुळे. 0:08:03.925,0:08:05.918 हा माणूस नाही, राक्षस आहे." 0:08:05.942,0:08:06.942 (हास्य) 0:08:06.966,0:08:10.480 हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी [br]करण्यासाठी आला आहे. 0:08:10.504,0:08:11.894 (हास्य) 0:08:11.918,0:08:13.767 आता ही विचार प्रक्रिया, 0:08:13.791,0:08:18.497 याला म्हणतात आपत्तीजनन,[br]जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता. 0:08:18.521,0:08:21.252 हा ज्ञात असणाऱ्या [br]विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे. 0:08:21.276,0:08:22.941 जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे. 0:08:22.965,0:08:25.037 पण असे अजूनही आहेत. 0:08:25.061,0:08:26.625 चुकीचा कार्यकारणभाव. 0:08:26.649,0:08:29.426 क्रोधित व्यक्तीचा कल[br]असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो. 0:08:29.450,0:08:31.332 फक्त लोकांना नाही, 0:08:31.356,0:08:33.244 तर निर्जीव वस्तूंना सुद्धा. 0:08:33.268,0:08:35.157 जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे, 0:08:35.181,0:08:38.110 आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या[br]हरवल्या तेंव्हा म्हणालात, 0:08:38.134,0:08:39.585 " कुठे गेल्या किल्ल्या?" 0:08:39.609,0:08:41.633 कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या. 0:08:41.657,0:08:44.567 (हास्य) 0:08:44.591,0:08:47.456 हे नेहमी होत असं त्यांना वाटतं[br]मग ते शब्द वापरतात , "कायम", 0:08:47.480,0:08:50.146 "कधीच नाही ","प्रत्येक",[br]" हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं", 0:08:50.170,0:08:51.551 "मला जे हवं ते मिळत नाही." 0:08:51.575,0:08:54.265 "आज इकडे येताना[br]प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले." 0:08:54.879,0:08:58.149 मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा [br]स्वतःच्या गरजांना महत्व देतात: 0:08:58.173,0:09:00.474 "देवा, ही व्यक्ती इतकी हळू[br]वाहन का चालवत आहे, 0:09:00.498,0:09:04.401 त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी [br]म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन." 0:09:04.425,0:09:06.716 आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण. 0:09:07.275,0:09:10.147 ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात 0:09:10.171,0:09:13.219 किंवा अशा शब्दांचा गठ्ठा [br]जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही. 0:09:13.243,0:09:14.410 या टेड टॉक मध्ये. 0:09:14.434,0:09:15.855 (हास्य) 0:09:15.879,0:09:17.149 तर बराच काळ, 0:09:17.173,0:09:20.629 मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख[br]आकलनविषयक विकृती असा केला आहे. 0:09:20.653,0:09:22.207 किंवा अकारण समज सुद्धा. 0:09:22.231,0:09:24.690 आणि हो, कधीकधी ते अकारण असतात. 0:09:25.462,0:09:27.184 कदाचित बरेचदा. 0:09:27.208,0:09:29.890 पण काही वेळा हे विचार [br]पूर्णपणे तर्कसंगत असतात. 0:09:30.649,0:09:32.379 या जगात अन्याय आहे. 0:09:32.403,0:09:34.115 क्रूर, स्वार्थी माणसे आहेत. 0:09:34.139,0:09:37.997 जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा , 0:09:38.021,0:09:41.240 संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे. 0:09:41.846,0:09:45.847 माझ्या आजच्या बोलण्यातील[br]एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे: 0:09:45.871,0:09:49.617 तुमचा राग[br]तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे. 0:09:49.641,0:09:54.299 कारण त्याने तुमच्या दोन्ही-[br]मानवी व अमानवी पूर्वजांना 0:09:54.323,0:09:56.390 उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे. 0:09:56.857,0:09:59.942 जशी भीती तुम्हाला [br]संभाव्य धोक्याची सूचना देते, 0:09:59.966,0:10:02.122 तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो. 0:10:02.146,0:10:04.704 मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा[br]तो एक मार्ग आहे. 0:10:04.728,0:10:06.395 की आता पुरे झालं. 0:10:07.022,0:10:10.416 एवढंच नाही, तो तुम्हाला[br]अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो. 0:10:10.440,0:10:13.646 एक सेकंद विचार करा,[br]मागील वेळी तुम्ही चिडला होता, 0:10:13.670,0:10:15.408 तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते. 0:10:15.432,0:10:17.733 तुमचा श्वासोश्वास वाढला,[br]तुम्हाला घाम आला, 0:10:18.297,0:10:20.161 ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे. 0:10:20.185,0:10:23.363 किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात. 0:10:23.387,0:10:26.974 जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी[br]आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते. 0:10:27.758,0:10:29.584 या फक्त[br]लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. 0:10:29.608,0:10:34.099 त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी[br]तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला. 0:10:34.123,0:10:35.997 त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले. 0:10:36.021,0:10:40.065 आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी[br]तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. 0:10:40.089,0:10:41.542 म्हणून तुमचा चेहरा लाल झाला. 0:10:41.566,0:10:45.105 शारीरिक अनुभवांच्या[br]गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे. 0:10:45.129,0:10:46.367 जो आज अस्तित्वात आहे. 0:10:46.391,0:10:49.149 कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली. 0:10:49.173,0:10:52.506 निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा[br]सामना करण्यासाठी. 0:10:52.976,0:10:56.207 आणि समस्या ही आहे की [br]तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली, 0:10:56.231,0:10:57.504 रागाचा सामना करण्यासाठी, 0:10:57.528,0:10:58.856 शारीरिक लढ्यासाठी, 0:10:58.880,0:11:01.037 त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत.[br] 0:11:03.864,0:11:04.864 कायम चिडून[br]फायदा नाही. 0:11:04.864,0:11:07.704 (हास्य) 0:11:07.728,0:11:09.466 पण इथे एक चांगली बातमी आहे. 0:11:09.490,0:11:10.914 तुम्ही सक्षम आहात 0:11:10.938,0:11:13.395 ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते. 0:11:13.419,0:11:16.174 आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे. 0:11:16.174,0:11:17.174 खूप चिडता तेंव्हाही 0:11:17.174,0:11:18.968 तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता. 0:11:18.992,0:11:21.674 एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे. 0:11:21.698,0:11:23.765 तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा 0:11:24.119,0:11:25.918 तो येऊ नये याबद्दल बोलतो. 0:11:25.942,0:11:28.609 आपण लोकांना शांत व्हा[br]व आराम करा असे सांगतो. 0:11:28.633,0:11:31.164 आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो. 0:11:31.188,0:11:33.466 राग वाईट व तो येणे चुकीचे आहे,[br]असे आपण मानतो. 0:11:33.490,0:11:38.339 पण त्याऐवजी, मला रागाचा[br]प्रेरक म्हणून विचार करायला आवडते. 0:11:38.712,0:11:41.533 तसेच जसे तहान तुम्हाला[br]पाणी पिण्यासाठी प्रेरित करते. 0:11:41.557,0:11:44.684 भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते. 0:11:44.708,0:11:47.660 तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार[br]करण्याची प्रेरणा देऊ शकतो. 0:11:47.684,0:11:51.183 कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी[br]फार विचार करावा लागत नाही. 0:11:51.609,0:11:55.545 जेव्हा आपण[br]पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो, 0:11:56.085,0:11:57.697 हो, काही गोष्टी [br]क्षुल्लक आहेत. 0:12:01.715,0:12:04.922 पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी,[br]पर्यावरणाची हानी, 0:12:04.946,0:12:07.248 या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत. 0:12:07.272,0:12:10.498 त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग[br]म्हणजे आधी संतापणे. 0:12:10.522,0:12:13.585 मग लढण्यासाठी[br]त्या रागाला योग्य वाट करून देणे. 0:12:14.053,0:12:18.283 आणि तुम्ही संताप, शत्रुत्व[br]किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही. 0:12:18.307,0:12:21.434 राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत. 0:12:21.458,0:12:24.379 तुम्ही विरोध करू शकता, [br]संपादकांना पत्र लिहू शकता. 0:12:24.403,0:12:26.946 तुम्ही दान करू शकता,[br]स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता. 0:12:26.970,0:12:29.739 तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता. 0:12:29.763,0:12:31.724 तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता. 0:12:31.748,0:12:34.247 समुदाय तयार करू शकता[br]जो एकमेकांची काळजी घेतो, 0:12:34.271,0:12:36.484 आणि तसे अत्याचार होऊ देत नाही. 0:12:37.331,0:12:40.212 तर पुढील वेळेस, [br]जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल; 0:12:40.236,0:12:42.236 तेव्हा तो दाबून न टाकता, 0:12:42.260,0:12:44.905 मी आशा करतो,[br]तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल. 0:12:44.929,0:12:48.460 सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे [br]तुम्ही त्याला वाट करून द्याल. 0:12:48.785,0:12:49.936 धन्यवाद. 0:12:49.960,0:12:53.460 (टाळ्या)