कॉम्प्युटर कार्ये परत परत
करण्यास खूप चांगले असतात,
आपण 10, 20 किंवा 100 मोजू शकता.
पण कॉम्प्युटर बिलियन किंवा
ट्रीलीअन पर्यंत मोजू शकतो.
त्याला कंटाळा येणार नाही आणि
केवळ काही सेकंद लागतील.
मोजण असू दे किंवा चित्र
काढणं काहीही असूदे,
कॉम्प्युटर शेकडो किंवा अगदी
बिलियन वेळ रिपीट करू शकतात.
प्रोग्रॅमिंगमध्ये आपण याला लुप म्हणतो.
एक लुप म्हणजे आपण आपला कोड
परत परत कशा प्रकारे करता.
पुढील कोड्यासाठी
आपले ध्येय आहे आनाला रिपीट ब्लॉकचा
वापर करून चौकोन बनविण्यात मदत करणे.
आपण रिपीट ब्लॉक मध्ये ठेवलेला
कोणताही कोड ब्लॉक
क्रमाने परत परत केला जाईल.
आपल्याला पाहिजे तितक्या वेळा.
चौकोन काढण्यासाठी
आपण मुव्ह फॉरवर्ड आणि
टर्न ब्लॉक वापरू शकता 4 वेळा.
परंतु सर्वात सोपं मार्ग आहे
कॉम्प्युटरला पुढे जाण्यास
आणि एकदा 90 अंशमध्ये वळण्यास सांगणे.
आणि त्याला या क्रिया 4 वेळा
परत परत करण्यास सांगणे.
हे करण्यासाठी आपल्याला मुव्ह फॉरवर्ड आणि
टर्न ब्लॉक रिपीट ब्लॉकमध्ये ठेवावे लागतील.
लक्षात ठेवा,
आपण रिपीट ब्लॉक मधील संख्या
कितीही बदलू शकता.
आणि मग ते ब्लॉकमध्ये
जे काही हे ते रिपीट करेल.
तितके वेळा.