तर तू कोणत्या इयत्तेमध्ये आहेस? दुसरी दहावी इयत्ता पहिली मी प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आठवीत होतो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. मला काय उत्साहित करतं की मी लोकांच्या समस्या सोडवू शकतो. आपण आपल्याला व्यक्त करू शकता, एखाद्या कल्पनेतून गोष्टी बनवू शकता. कॉम्प्युटर सायन्स हे अनेक गोष्टींचे बेस आहे ज्या कॉलेज विद्यार्थी आणि व्यावसायिक पुढील 20-30 वर्षे करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला आवडते. मला काहीतरी बनवायची संधी मिळते, जे लोकांचे जीवन थोडे सोपे बनवेल. मला वाटतं ही आपल्याकडे असलेली सुपर पॉवर च्या सर्वात जवळची गोष्ट आहे. सुरुवात करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्वतः शिकते आहे. आणि मला आपण माझ्या सोबत शिकायला हवं आहे. नमस्कार, माझे नाव आहे लिंडसी, मी कॉलेज मध्ये थिएटर मध्ये मेजर केले आहे, पण मी कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा मेजर केले आहे. आणि आता मी मॉडेलिंग करते, अभिनय करते आणि मी स्वतः नाटके लिहते. चला आपण कोडचा वापर करूया आणि आना आणि एल्सासोबत बर्फाची जादू आणि सौन्दर्य एक्सप्लोअर करत आहेत. आपण आईस स्केट करताना स्नो फ्लेक्स आणि पॅटर्न बनविणार आहात आणि एक विंटर वंडर लँड बनविणार आहात जे नंतर आपण मित्रा सोबत शेअर करू शकता. पुढील एका तासात आपण कोड कसे करावे याचे बेसिक शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंग सामान्यतः टेक्स्ट असते, पण आपण वापरणार आहोत ब्लॉकली जे दिसणारे ब्लॉक वापरते ज्यांना आपण प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता अगदी युनिव्हर्सिटी विद्यार्थी सुद्धा बेसिक अशाच प्रकारे शिकतात. पण आतमध्ये खरतर आपण अजूनही कोडच तयार करणार आहात. आपण शिकणाऱ्या संकल्पना आपले कॉम्प्युटर प्रोग्रॅमर रोज वापरतात. आणि ते कॉम्प्युटर सायन्स चे पाया आहेत. प्रोग्रॅम म्हणजे एक सूचनांचा एक संच असतो जो कॉम्प्युटरला काय करायचे ते सांगतो. चला प्रोग्रॅमसाठी एक कोड बनवूया जो एल्साला एक साधी रेष बनवायला मदत करेल. आपण हे नंतर अजून कॉम्प्लेक्स पॅटर्न तयार करण्यासाठी वापरणार आहोत. आपला स्क्रीन 3 मुख्य भागात विभागला आहे. डाव्या बाजूला बर्फाचा पृष्ठभाग आहे ज्यावर आपण प्रोग्रॅम रन कराल. प्रत्येक लेव्हलच्या सूचना पृष्ठभागाच्या अगदी खाली आहेत. हा मधला भाग टूल बॉक्स आहे. आणि यातील प्रत्येक ब्लॉक ही एल्सा आणि आना करणारी कृती आहे. उजव्या बाजूची पांढरी जागा वर्कस्पेस म्हणून ओळखली जाते. आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम बनविणार आहोत. बर्फाच्या पृष्ठभागावर पुढे जाण्यासाठी आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापराल. येथे मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक सांगतो आहे की 100 पिक्सेल णे पुढे जा. जेव्हा आपण रन दाबतो, तेव्हा काय होते? एल्सा स्क्रीन वर ठराविक जागा पुढे जाते. खरेतर 100 पिक्सेल. पिक्सेल खरेतर आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन वरील खूप लहान चौकोन असतात. आपल्याकडे या कोड्यामध्ये असलेला दूसरा ब्लॉक आहे 90 अंशाने उजवीकडे वळा. आणि जेव्हा आपण हा उजवीकडे वळा ब्लॉक वापरतो, तो एल्साला ठराविक वळवतो. आपण एल्साने किती वळावे यासाठी वरखाली करू शकता. कोनाचे मोजमाप एल्साच्या समोरच्या दिशेने केले जाते. म्हणून हा आहे 90 अंशाचा वळण. आणि हा आहे 120 अंशाचे वळण. आणि लक्षात ठेवा की आपण पिक्सेल, डिग्री त्यांच्या समोरील बाणावर क्लिक करून बदलू शकता.