1 00:00:00,300 --> 00:00:01,120 हॅलो! 2 00:00:01,120 --> 00:00:02,719 तुम्ही अगदी वेळेत आलात. 3 00:00:02,719 --> 00:00:05,060 व्हॉयेज अक्वेटिकमध्ये आपले स्वागत! 4 00:00:05,060 --> 00:00:09,160 पाण्याखाली दडलेला खजिना शोधायला मी निघणार आहे 5 00:00:09,160 --> 00:00:11,320 आणि तुमची मदत मिळणार आहे, याचा मला आनंद वाटतोय! 6 00:00:11,330 --> 00:00:14,580 या गूढ पाण्यात आपल्याला काय मिळणार काय माहिती? 7 00:00:14,580 --> 00:00:18,620 आपल्याला आपला पहिला मार्गदर्शक या डॉकवरच कुठेतरी भेटणार आहे. 8 00:00:18,620 --> 00:00:20,090 स्वागत आहे, साहसी वीरांनो! 9 00:00:20,090 --> 00:00:24,890 व्हॉयेज अक्वेटिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोड वापरून कोड्यांची एक मालिका सोडवायची आहे. 10 00:00:24,890 --> 00:00:26,660 हे कसं होतं ते पाहूया. 11 00:00:26,660 --> 00:00:28,780 तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. 12 00:00:28,780 --> 00:00:30,770 डावीकडे, तुम्हाला माईनक्राफ्ट वर्ल्ड दिसेल. 13 00:00:30,770 --> 00:00:35,410 मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे, इथे तुम्हाला कोडींगच्या कमांड्स दिसतात. 14 00:00:35,410 --> 00:00:40,370 आणि तुमच्या उजव्या बाजूचा मोठा भाग म्हणजे वर्कस्पेस. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी 15 00:00:40,370 --> 00:00:43,870 कमांड्सचा स्टॅक तयार करू शकता आणि तुमच्या हालचाली नियंत्रित करू शकता. 16 00:00:43,870 --> 00:00:47,130 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना पानाच्या वरच्या भागात आहेत. 17 00:00:47,130 --> 00:00:50,910 प्लस चिन्हावर क्लिक करा आणि मोठ्या / लहान सूचना बघा. 18 00:00:50,910 --> 00:00:55,300 टूलबॉक्समधून ब्लॉक्स ओढून वर्कस्पेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते एकाखाली एक ठेवा, 19 00:00:55,300 --> 00:00:59,200 आणि मग रन बटण वापरून तुमच्या कमांड्स एक्झिक्युट करा. 20 00:00:59,200 --> 00:01:02,790 हे बरोबर करण्यासाठी तुम्हाला काही वेळा प्रयत्न करावा लागेल, आणि काही कोड्यांसाठी एकापेक्षा 21 00:01:02,790 --> 00:01:05,820 जास्त उत्तरे आहेत, त्यामुळे काय चालते, याचा प्रयोग करून बघा. 22 00:01:05,820 --> 00:01:09,760 जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर रीसेट बटणावर क्लिक करा आणि तुम्ही जिथून सुरुवात केलीत तिकडे परत जा. 23 00:01:09,760 --> 00:01:12,080 जर तुम्हाला कमांड डीलीट करायची असेल, तर तुमच्या वर्कस्पेसमधून 24 00:01:12,160 --> 00:01:15,080 फक्त ब्लॉक ओढा आणि टूलबॉक्समध्ये मागे न्या. 25 00:01:15,080 --> 00:01:19,380 तुमचा कोड चालताना कसा दिसतो ते बघायला रनवर क्लिक करायला विसरू नका. 26 00:01:19,380 --> 00:01:21,780 ओके, खूप इकडचं, तिकडचं बोलून झालं, साहसी मित्रांनो . 27 00:01:21,780 --> 00:01:25,060 पाण्याखालचा खजिना शोधण्यासाठी कोडींग सुरू करा. 28 00:01:25,060 --> 00:01:26,000 Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स