हॅलो!
तुम्ही अगदी वेळेत आलात.
व्हॉयेज अक्वेटिकमध्ये आपले स्वागत!
पाण्याखाली दडलेला खजिना शोधायला
मी निघणार आहे
आणि तुमची मदत मिळणार आहे,
याचा मला आनंद वाटतोय!
या गूढ पाण्यात आपल्याला काय मिळणार
काय माहिती?
आपल्याला आपला पहिला मार्गदर्शक या
डॉकवरच कुठेतरी भेटणार आहे.
स्वागत आहे, साहसी वीरांनो!
व्हॉयेज अक्वेटिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोड वापरून कोड्यांची एक मालिका सोडवायची आहे.
हे कसं होतं ते पाहूया.
तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत.
डावीकडे, तुम्हाला माईनक्राफ्ट वर्ल्ड दिसेल.
मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे, इथे
तुम्हाला कोडींगच्या कमांड्स दिसतात.
आणि तुमच्या उजव्या बाजूचा मोठा भाग म्हणजे वर्कस्पेस. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी
कमांड्सचा स्टॅक तयार करू शकता आणि
तुमच्या हालचाली नियंत्रित करू शकता.
प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना पानाच्या
वरच्या भागात आहेत.
प्लस चिन्हावर क्लिक करा आणि
मोठ्या / लहान सूचना बघा.
टूलबॉक्समधून ब्लॉक्स ओढून वर्कस्पेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते एकाखाली एक ठेवा,
आणि मग रन बटण वापरून तुमच्या
कमांड्स एक्झिक्युट करा.
हे बरोबर करण्यासाठी तुम्हाला काही वेळा प्रयत्न करावा लागेल, आणि काही कोड्यांसाठी एकापेक्षा
जास्त उत्तरे आहेत, त्यामुळे काय चालते,
याचा प्रयोग करून बघा.
जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर रीसेट बटणावर क्लिक करा आणि तुम्ही जिथून सुरुवात केलीत तिकडे परत जा.
जर तुम्हाला कमांड डीलीट करायची
असेल, तर तुमच्या वर्कस्पेसमधून
फक्त ब्लॉक ओढा आणि टूलबॉक्समध्ये मागे न्या.
तुमचा कोड चालताना कसा दिसतो ते बघायला
रनवर क्लिक करायला विसरू नका.
ओके, खूप इकडचं, तिकडचं बोलून झालं,
साहसी मित्रांनो .
पाण्याखालचा खजिना शोधण्यासाठी
कोडींग सुरू करा.
Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स