WEBVTT 00:00:02.260 --> 00:00:09.260 मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता. पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग 00:00:10.099 --> 00:00:16.720 करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला. 00:00:16.720 --> 00:00:21.699 मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी 00:00:21.699 --> 00:00:26.920 बनवू शकता. कॉम्प्युटर सायन्स हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी 00:00:26.920 --> 00:00:31.550 आणि व्यावसायिक पुढची 20 किंवा 30 वर्षे करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला 00:00:31.550 --> 00:00:36.690 लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य सोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते. 00:00:36.690 --> 00:00:41.120 मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे. सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 00:00:41.120 --> 00:00:46.829 मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर शिकावं असं मला वाटतं. 00:00:46.829 --> 00:00:50.679 तुमचा कुठला असा आवडता व्हिडीओ गेम आहे का जो तुम्हाला बनवावासा वाटतो? आता आपण फक्त 00:00:50.679 --> 00:00:57.109 प्ले लॅब वापरून गेम्स बनवायला सुरुवात करणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट असते. आणि 00:00:57.109 --> 00:01:02.670 प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, 00:01:02.670 --> 00:01:07.680 कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी 00:01:07.680 --> 00:01:13.540 कशा करायच्या ते मजेशीर कलाकारांबरोबर शिकणार आहोत - चेटकिणी, झोम्बीज, परग्रहवासी, प्राणी 00:01:13.540 --> 00:01:18.220 आणि मग एक गेम तयार करणार आहोत. तो शेअर करता येईल आणि फोनवर खेळता येईल. 00:01:18.220 --> 00:01:22.930 तुमच्या स्क्रीनचे 3 मुख्य भाग आहेत. डावीकडे गेम स्पेस आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होतो. 00:01:22.930 --> 00:01:28.310 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे. 00:01:28.310 --> 00:01:33.520 आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला 00:01:33.520 --> 00:01:38.260 वर्कस्पेस म्हणतात आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. 00:01:38.260 --> 00:01:43.600 सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही पिवळी 00:01:43.600 --> 00:01:48.620 रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून ते एकत्र जोडू शकता, आणि मग 00:01:48.620 --> 00:01:50.600 ते एकमेकांना चिकटतील. 00:01:50.600 --> 00:01:56.080 पहिल्या कोड्यात आपला कलाकार आहे पेंग्विन आणि आपण त्याला "हॅलो" म्हणायला लावणार आहोत, 00:01:56.080 --> 00:02:02.020 "say" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून, आणि मग "Hello." टाईप करून. आपण 00:02:02.020 --> 00:02:06.940 "move right" आणि "move left" ब्लॉक्स वापरून पेंग्विनला हालचाल करायलासुद्धा लावू शकतो. एकदा 00:02:06.940 --> 00:02:11.920 ब्लॉक्स व्यवस्थित जोडले की "run button" दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा 00:02:11.920 --> 00:02:16.439 आणि शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, आनंदी किंवा दु:खी होणारे, पॉईंट्स मिळवणारे किंवा आगीचे गोळे फेकणारे, 00:02:16.439 --> 00:02:23.439 अगदी एकमेकांना गायब करणारे असे सर्व प्रकारचे कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम बनवू शकता. 00:02:23.579 --> 00:02:26.180 तुम्हाला कसल्या प्रकारचा गेम बनवायचा आहे, ते तुम्ही ठरवायचं.