मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.
पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग
करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा पहिला कॉम्प्युटर मिळाला.
मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी
बनवू शकता. संगणक शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी
आणि व्यावसायिक पुढची 20 किंवा 30 वर्षे
करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला
लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचे आयुष्य
सोपं करेल असे काहीतरी बनवण्याची संधी मिळते.
मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची
गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर शिकावं असं मला वाटतं.
तुमचा कुठला असा आवडता व्हिडीओ गेम आहे का
जो तुम्हाला बनवावासा वाटतो? आता आपण फक्त
प्ले लॅब वापरून गेम्स बनवायला सुरुवात करणार
आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट असते. आणि
प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार
बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात,
कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी
कशा करायच्या ते मजेशीर कलाकारांबरोबर शिकणार आहोत - चेटकिणी, झोम्बीज, परग्रहवासी, प्राणी
आणि मग एक गेम तयार करणार आहोत. तो शेअर करता येईल आणि फोनवर खेळता येईल.
तुमच्या स्क्रीनचे 3 मुख्य भाग आहेत. डावीकडे गेम स्पेस आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होतो.
प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना खाली दिलेल्या
आहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे.
आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे
कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला
वर्कस्पेस म्हणतात आणि आपण इथे आपला
प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स केशरी
"when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही पिवळी
रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून ते एकत्र
जोडू शकता, आणि मग
ते एकमेकांना चिकटतील.
पहिल्या कोड्यात आपला कलाकार आहे पेंग्विन
आणि आपण त्याला "हॅलो" म्हणायला लावणार आहोत,
"say" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला
जोडून, आणि मग "Hello." टाईप करून. आपण
"move right" आणि "move left" ब्लॉक्स वापरून पेंग्विनला हालचाल करायलासुद्धा लावू शकतो. एकदा
ब्लॉक्स व्यवस्थित जोडले की "run button" दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा
आणि शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, आनंदी किंवा दु:खी होणारे, पॉईंट्स मिळवणारे किंवा आगीचे गोळे फेकणारे,
अगदी एकमेकांना गायब करणारे असे सर्व प्रकारचे कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम बनवू शकता.
तुम्हाला कसल्या प्रकारचा गेम बनवायचा आहे,
ते तुम्ही ठरवायचं.