0:00:00.580,0:00:04.054 मेलाती विजसेन: बाली - देवांचे बेट. 0:00:05.301,0:00:07.642 इसाबेल विजसेन: एक हिरवा स्वर्ग. 0:00:09.139,0:00:10.552 मेलाती: किंवा.. 0:00:10.576,0:00:12.393 एक हरवलेला स्वर्ग. 0:00:13.075,0:00:14.234 बाली - 0:00:14.696,0:00:16.639 कचऱ्याचे बेट. 0:00:17.707,0:00:18.859 इसाबेल: बालीमध्ये, 0:00:18.883,0:00:24.834 आम्ही दर दिवशी ६८० घनमीटर [br]प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो. 0:00:25.801,0:00:28.657 म्हणजे एखाद्या १४ मजली इमारतीएवढा. 0:00:29.205,0:00:31.426 आणि प्लास्टिक पिशव्यांचं म्हणाल, तर 0:00:31.450,0:00:34.018 पाच टक्क्यांहूनही कमी पिशव्या [br]रीसायकल केल्या जातात. 0:00:34.900,0:00:38.206 मेलाती: हे ऐकून तुमच्या मनातलं [br]आमच्या बेटाचं चित्र बदललं असेल. 0:00:38.666,0:00:41.150 तसं ते आमचंही बदललं, [br]जेव्हा आम्हाला कळलं, की 0:00:41.174,0:00:45.735 बालीमधल्या बहुतेक सगळ्या [br]प्लास्टिक पिशव्या आपल्या गटारात पोहोचतात. 0:00:45.759,0:00:47.009 आणि मग आपल्या नद्यांमध्ये 0:00:47.033,0:00:48.404 आणि मग समुद्रात. 0:00:48.900,0:00:51.364 आणि ज्या समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत, 0:00:51.388,0:00:53.501 त्या जाळतात किंवा तशाच टाकतात. 0:00:54.183,0:00:56.441 इसाबेल: आम्ही ठरवलं, यासाठी [br]काही केलं पाहिजे. 0:00:56.812,0:00:59.311 आणि जवळपास गेली तीन वर्षं [br]आम्ही यावर काम करतो आहोत. 0:00:59.335,0:01:02.687 आमच्या बेटावर प्लास्टिक पिशव्यांना [br]मज्जाव करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 0:01:02.711,0:01:05.175 आम्हाला काही बाबतीत मोठं यश मिळालं आहे. 0:01:06.835,0:01:08.867 मेलाती: आम्ही दोघी बहिणी आहोत. 0:01:08.891,0:01:11.458 आणि आम्ही जगातल्या [br]सर्वोत्कृष्ट शाळेत जातो. 0:01:12.061,0:01:13.586 ग्रीन स्कूल, बाली. 0:01:13.610,0:01:18.233 ग्रीन स्कूल बांधायला बांबू वापरलेत.[br]पण तिचं वेगळेपण इतकंच नाही, 0:01:18.257,0:01:20.220 तर तिथलं शिक्षणही वेगळं आहे. 0:01:20.864,0:01:23.551 आम्हाला वर्तमान काळाचे [br]नेते व्हायला शिकवलं जातं. 0:01:24.518,0:01:26.951 साधं पाठ्यपुस्तक या तोडीचं [br]काही शिकवू शकत नाही. 0:01:27.813,0:01:29.834 इसाबेल: एकदा आम्हाला शाळेत एक धडा शिकवला, 0:01:29.858,0:01:32.571 महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 0:01:32.595,0:01:34.083 नेल्सन मंडेला, 0:01:34.107,0:01:35.258 लेडी डायना, 0:01:35.282,0:01:36.507 महात्मा गांधी. 0:01:37.244,0:01:38.401 शाळेतून घरी येताना, 0:01:38.425,0:01:41.733 आपणही महत्त्वाची व्यक्ती व्हायचं, [br]यावर आमचं एकमत झालं. 0:01:42.614,0:01:44.651 पण महत्त्वाची व्यक्ती व्हायला, का बरं 0:01:44.675,0:01:45.933 मोठं होईपर्यंत थांबायचं? 0:01:46.420,0:01:48.494 आम्हाला आत्ताच काहीतरी करायचं होतं. 0:01:49.135,0:01:50.835 मेलाती: त्या रात्री सोफ्यावर बसून, 0:01:50.859,0:01:53.695 आम्ही बालीला भेडसावणाऱ्या [br]सगळ्या प्रश्नांचा खूप विचार केला. 0:01:54.332,0:01:56.396 आणि आम्हाला सगळ्यात जास्त जाणवला, तो 0:01:56.420,0:01:57.784 प्लास्टिकचा कचरा. 0:01:58.536,0:02:00.603 पण ती समस्या प्रचंड मोठी आहे. 0:02:01.189,0:02:04.671 म्हणून आम्हा मुलांना योग्य [br]असं ध्येय आम्ही शोधलं. 0:02:05.589,0:02:06.820 प्लास्टिक पिशव्या. 0:02:06.844,0:02:08.237 आणि एका कल्पनेचा जन्म झाला. 0:02:08.983,0:02:10.964 इसाबेल: आम्ही संशोधन सुरू केलं. 0:02:10.988,0:02:13.928 आणि इतकंच सांगते, [br]जितकं जास्त संशोधन केलं, 0:02:13.952,0:02:17.041 तितकं हेच कळलं, की प्लास्टिकच्या [br]पिशव्यांमध्ये चांगलं काहीच नाही. 0:02:17.401,0:02:18.671 आणि, ठाऊक आहे ना, 0:02:18.695,0:02:20.273 आपल्याला त्यांची गरज सुध्दा नसते. 0:02:21.003,0:02:24.544 मेलाती: इतर ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर [br]बंदी घालण्याचे झालेले प्रयत्न 0:02:24.568,0:02:26.438 आम्हाला प्रेरणा देत होते. 0:02:26.462,0:02:28.444 हवाई पासून रवांडा पर्यंत, आणि 0:02:28.468,0:02:31.013 ओकलंड आणि डब्लिन सारख्या शहरांपर्यंत. 0:02:31.784,0:02:37.449 इसाबेल: आणि या कल्पनेतून निर्माण झाली, [br]"बाय बाय प्लास्टिक बैग्स" 0:02:38.658,0:02:40.850 मेलाती: या चळवळीच्या काळात 0:02:40.874,0:02:43.436 आम्ही खूप काही शिकलो. 0:02:43.984,0:02:45.626 धडा पहिला: 0:02:46.233,0:02:48.391 आपण एकटेच सगळं काही करू शकत नाही.[br]तर त्यासाठी 0:02:48.415,0:02:50.607 आपल्यासारखे विचार असणाऱ्या [br]मुलांची टीम लागते 0:02:50.631,0:02:53.802 म्हणून आम्ही [br]"बाय बाय प्लास्टिक बैग्स" चमू तयार केला. 0:02:54.459,0:02:57.574 या स्वयंसेवकांच्या टीममध्ये [br]पूर्ण बेटावरची मुलं सामील आहेत. 0:02:57.598,0:02:59.997 स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधली 0:03:00.505,0:03:01.656 आणि त्यांच्याबरोबर आम्ही 0:03:01.680,0:03:03.430 एक उपक्रम अनेक पातळ्यांवर सुरू केला. 0:03:03.454,0:03:06.750 ऑन आणि ऑफलाईन [br]सह्यांच्या मोहिमा. 0:03:06.774,0:03:10.210 शाळांतून शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरण 0:03:10.234,0:03:14.719 आम्ही याविषयी लोकांची जाणीव वाढवतो. [br]बाजारात, उत्सवात, किनारे सफाईवेळी 0:03:14.743,0:03:15.894 आणि शेवटचं पण महत्त्वाचं 0:03:15.918,0:03:17.964 आम्ही पर्यायी पिशव्यांचं वाटप करतो. 0:03:17.988,0:03:19.712 जसं की जाळीच्या पिशव्या, 0:03:19.736,0:03:21.058 वर्तमानपत्रापासून केलेल्या, 0:03:21.082,0:03:23.802 किंवा १००% सेंद्रिय पिशव्या 0:03:23.826,0:03:26.339 बेटावरच्या स्थानिक उपक्रमांनी बनवलेल्या. 0:03:26.898,0:03:28.292 इसाबेल: आम्ही एक 0:03:28.316,0:03:30.428 मार्गदर्शी गाव बनवलं आहे.[br]८०० कुटुंबांचं घर. 0:03:30.952,0:03:32.775 या गावाचे महापौर आमचे पहिले मित्र. 0:03:32.799,0:03:35.265 आमचे टी शर्ट आवडले[br]म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली. 0:03:36.077,0:03:38.745 आम्ही ग्राहकांना [br]जाणीव करून देण्याकडे लक्ष दिलं. 0:03:38.769,0:03:41.487 कारण बदलाची गरज तिथेच आहे. 0:03:42.266,0:03:44.463 या गावाने आत्ताच प्लास्टिक पिशवीमुक्त 0:03:44.487,0:03:46.492 होण्याच्या मार्गावर[br]२/३ अंतर कापलं आहे. 0:03:47.330,0:03:52.205 बाली सरकारला यात सामील करून घेण्याचे [br]आमचे पहिले प्रयत्न फसले. 0:03:52.696,0:03:53.846 म्हणून आम्ही ठरवलं, 0:03:54.391,0:03:58.691 हं..एक दशलक्ष सह्यांची मोहीम! 0:03:58.715,0:04:00.708 त्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत, बरोबर? 0:04:00.732,0:04:01.895 मेलाती: बरोबर! 0:04:02.258,0:04:04.093 इसाबेल: पण कुणाला ठाऊक होतं, 0:04:04.117,0:04:08.279 दशलक्ष म्हणजे हजार गुणिले हजार म्हणून? 0:04:08.303,0:04:09.930 (हशा) 0:04:10.270,0:04:11.835 आम्ही तिथेच अडकलो, 0:04:12.747,0:04:14.738 दुसरा धडा शिकेपर्यंत 0:04:15.507,0:04:17.462 रोजच्यापेक्षा वेगळा विचार करा. 0:04:17.808,0:04:18.959 कुणीतरी म्हणालं, 0:04:18.983,0:04:25.384 बाली विमानतळावर दरवर्षी [br]१६ दशलक्ष प्रवासी ये जा करतात. 0:04:26.294,0:04:29.610 मेलाती: पण विमानतळाच्या आत कसं जायचं? 0:04:29.993,0:04:31.686 आणि आता धडा तिसरा: 0:04:32.236,0:04:33.676 चिकाटी 0:04:34.141,0:04:35.768 आम्ही तडक विमानतळावर गेलो. 0:04:35.792,0:04:37.444 दरवानाला पार करून पुढे 0:04:37.819,0:04:39.705 त्याच्या बॉसच्या बॉसकडे. 0:04:39.729,0:04:41.990 नंतर असिस्टंट ऑफिस मैनेजरकडे. 0:04:42.014,0:04:43.399 नंतर ऑफिस मैनेजर. 0:04:43.423,0:04:44.594 आणि मग … 0:04:44.618,0:04:46.765 पुन्हा आम्हाला दोन पायऱ्या [br]खाली पाठवलं गेलं 0:04:46.789,0:04:48.954 आणि पुन्हा दरवानापाशी आलो. 0:04:49.537,0:04:51.585 बरेच दिवस दारं ठोठावल्यावर, [br]आणि 0:04:51.609,0:04:53.925 केवळ ध्येयवेड्या मुली म्हणून [br]काही दिवस काढल्यावर 0:04:53.949,0:04:57.837 शेवटी आम्ही बाली विमानतळाच्या कमर्शियल [br]मैनेजरपर्यंत पोहोचलो. 0:04:58.368,0:05:02.281 त्यांना "प्लास्टिक पिशव्यावाली बाली"चं [br]भाषण दिलं. आणि ते इतके चांगले आहेत, की 0:05:02.305,0:05:06.003 ते म्हणाले, (पुरुषी आवाजात), [br]मी हे बोलतोय यावर माझाच विश्वास बसत नाही. 0:05:06.027,0:05:08.270 पण मी परवानगी देणार आहे, 0:05:08.294,0:05:11.251 कस्टम्स आणि इमिग्रेशन मागून [br]सह्या गोळा करण्यासाठी. 0:05:11.275,0:05:12.619 (हशा) 0:05:12.643,0:05:16.938 (टाळ्या) 0:05:16.962,0:05:18.906 इसाबेल: तिथल्या पहिल्याच दीड तासात 0:05:18.930,0:05:21.605 आम्ही सुमारे १००० सह्या गोळा केल्या. 0:05:21.954,0:05:23.255 कसलं भारी ना? 0:05:24.340,0:05:25.851 चौथा धडा: 0:05:25.875,0:05:28.876 आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांत [br]पाठीराखे हवेत. 0:05:29.486,0:05:33.295 विद्यार्थ्यांपासून ते कमर्शियल मैनेजर्स [br]ते प्रसिध्द व्यक्तींपर्यंत. 0:05:34.097,0:05:36.209 आणि ग्रीन स्कूलच्या महत्त्वामुळे 0:05:36.233,0:05:38.899 आमचा प्रसिध्द व्यक्तींशी सतत संपर्क असे. 0:05:39.937,0:05:41.136 बान की मून यांनी शिकवलं, 0:05:41.160,0:05:44.521 की युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल 0:05:44.545,0:05:46.196 अर्जांवर सह्या करत नसतात. 0:05:46.220,0:05:47.221 (हशा) 0:05:47.245,0:05:49.082 मुलांनी कितीही छानपणे विचारलं, तरीही. 0:05:49.106,0:05:50.791 पण त्यांनी प्रचार करण्याचं वचन दिलं 0:05:50.815,0:05:53.328 आता आम्ही युनायटेड नेशन्सच्या [br]बरोबर काम करतो. 0:05:53.701,0:05:56.644 मेलाती: जेन गुडाल यांनी [br]माणसं जोडण्याचं महत्त्व शिकवलं. 0:05:57.055,0:06:00.095 त्यांनी एकाच रूट्स एंड शूट्स ग्रुपने [br]सुरुवात केली. 0:06:00.119,0:06:03.410 आणि आता जगभर त्यांचे ४००० ग्रुप्स आहेत. 0:06:03.434,0:06:04.607 आम्ही त्यापैकी एक आहोत. 0:06:04.631,0:06:06.073 त्या मूर्तिमंत प्रेरणा आहेत. 0:06:06.731,0:06:08.483 आपणही रोटरी सदस्य असाल, तर 0:06:08.507,0:06:09.797 खूपच छान. 0:06:09.821,0:06:10.972 आम्ही इंटरएक्टर्स आहोत. 0:06:10.996,0:06:13.327 रोटरी इंटरनेशनल चा सर्वात तरूण विभाग. 0:06:14.573,0:06:17.816 इसाबेल: आम्ही चिकाटीविषयी बरंच काही शिकलो. 0:06:17.840,0:06:20.097 मेलाती: निराशेचा सामना कसा करायचा, 0:06:20.121,0:06:21.272 इसाबेल: नेतृत्वगुण 0:06:21.296,0:06:22.465 मेलाती: टीमबरोबर काम 0:06:22.489,0:06:23.640 इसाबेल: मैत्री 0:06:23.664,0:06:26.323 मेलाती: बालीनीज लोक आणि त्यांची संस्कृती [br]याबद्दल शिकलो. 0:06:26.347,0:06:29.505 इसाबेल: आणि आम्ही बांधिलकीचं [br]महत्त्व शिकलो. 0:06:30.106,0:06:31.840 मेलाती: ते नेहमीच सोपं नसतं. 0:06:31.864,0:06:35.329 कधी कधी बोले तैसा चाले हे थोडं कठीण होतं. 0:06:35.830,0:06:38.257 इसाबेल: पण गेल्या वर्षी आम्ही हेच केलं. 0:06:38.663,0:06:40.266 आम्ही भाषणासाठी भारतात गेलो होतो, 0:06:40.290,0:06:41.845 आणि आमचे पालक आम्हाला घेऊन गेले, 0:06:41.869,0:06:44.457 महात्मा गांधींचं स्वतःचं जुनं घर पाहायला. 0:06:45.216,0:06:47.470 आम्हाला उपोषणाची ताकद कळली, [br]ज्यामुळे त्यांचं 0:06:47.494,0:06:48.770 ध्येय साकार झालं होतं. 0:06:49.329,0:06:51.327 हो, घर पाहून झाल्यावर बाहेर 0:06:51.351,0:06:53.002 जेव्हा आमचे पालक भेटले, तेव्हा 0:06:53.026,0:06:54.692 आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितला 0:06:54.716,0:06:56.472 "आम्ही उपोषण करणार!" 0:06:56.496,0:06:57.497 (हशा) 0:06:57.521,0:07:00.420 मेलाती: त्यांचे चेहरे कसे झाले असतील, [br]तुम्हीच कल्पना करा. 0:07:00.444,0:07:02.722 आम्हाला पुष्कळ पटवावं लागलं. 0:07:02.746,0:07:04.478 आमच्या पालकांनाच नव्हे, 0:07:04.502,0:07:06.794 तर आमच्या मैत्रिणींना आणि शिक्षकांनादेखील. 0:07:07.561,0:07:10.532 इसाबेल आणि मी अगदी ठाम होतो. 0:07:10.556,0:07:12.165 आम्ही एका आहारतज्ज्ञाला भेटलो. 0:07:12.189,0:07:14.029 आणि एक तोडगा काढला. 0:07:14.053,0:07:18.318 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत [br]न खाण्याचा. 0:07:18.342,0:07:20.947 "बालीत प्लास्टिक पिशव्या बंद कशा कराव्या" 0:07:20.971,0:07:24.458 हे बोलण्यासाठी भेटण्याचं, बालीचे गव्हर्नर[br]मान्य करीत नाहीत, तोपर्यंत. 0:07:25.118,0:07:29.138 इसाबेल: आमचं इंडोनेशियन भाषेत 0:07:29.162,0:07:30.313 "मोगाक माकान" सुरु झालं. 0:07:30.337,0:07:32.326 सोशल मिडिया वापरून आम्ही पाठिंबा मिळवला. 0:07:32.350,0:07:34.117 आणि दुसऱ्याच दिवशी 0:07:34.141,0:07:36.407 आमच्या घरी आणि शाळेत पोलीस येऊ लागले. 0:07:36.724,0:07:38.921 ह्या दोन मुली काय करताहेत? 0:07:39.466,0:07:41.976 आमच्या उपोषणामुळे गव्हर्नरांची [br]प्रतिमा उजळणार नव्हती 0:07:42.000,0:07:43.881 हे आम्हाला ठाऊक होतं. 0:07:43.905,0:07:45.339 आम्ही तुरुंगात गेलो असतो. 0:07:45.768,0:07:47.697 अहो, पण काम फत्ते झालं. 0:07:47.721,0:07:48.947 चोवीस तासांनंतर, 0:07:48.971,0:07:50.383 आम्हाला शाळेतून सुरक्षितपणे 0:07:50.407,0:07:52.430 गव्हर्नरांच्या ऑफिसात नेण्यात आलं. 0:07:53.283,0:07:54.796 मेलाती:आणि गव्हर्नर सामोरे आले 0:07:54.820,0:07:57.029 (टाळ्या) 0:07:57.053,0:07:58.983 भेटीसाठी, बोलणी करण्यासाठी. 0:07:59.007,0:08:01.557 बालीचं सौंदर्य आणि पर्यावरण [br]जपण्याच्या इच्छेबद्दल 0:08:01.581,0:08:04.193 आम्हाला धन्यवाद आणि पाठिंबा देत. 0:08:04.812,0:08:05.963 त्यांनी बालीतल्या 0:08:05.987,0:08:08.738 प्लास्टिक पिशव्या रोखण्यात[br]मदत करण्याच्या वचनावर सही केली. 0:08:08.762,0:08:09.916 आता आम्ही मित्र आहोत. 0:08:09.940,0:08:11.336 आम्ही सतत त्यांना, आणि 0:08:11.360,0:08:14.657 त्यांच्या टीमला, त्यांनी दिलेल्या [br]वचनाची आठवण करून देत असतो. 0:08:15.372,0:08:16.523 आणि खरोखरच, 0:08:16.547,0:08:18.453 हल्लीच त्यांनी ठरवलं आणि सांगितलं आहे, 0:08:18.477,0:08:23.120 की, बाली २०१८ पर्यंत[br]प्लास्टिक मुक्त होणार आहे. 0:08:23.144,0:08:29.980 (टाळ्या) 0:08:31.498,0:08:36.115 इसाबेल: बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील [br]आमचे समर्थक 0:08:36.139,0:08:40.701 २०१६ मध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील[br]बंदीचं धोरण आखण्याचा बेत करीत आहेत. 0:08:41.186,0:08:43.173 मे: प्लास्टिक पिशव्या[br]मोफत देणं बंद करा. 0:08:43.197,0:08:44.893 पुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या आणा. 0:08:44.917,0:08:48.361 हा आमचा संदेश [br]लोकांचे विचार बदलण्यासाठी आहे. 0:08:49.405,0:08:51.102 इसाबेल:आमची अल्पमुदतीची चळवळ, 0:08:51.126,0:08:52.558 "एक बेट / एक आवाज" 0:08:52.582,0:08:54.016 याबद्दलच आहे. 0:08:54.040,0:08:56.719 जी दुकानं आणि रेस्टोरंट्स स्वतःला[br]प्लास्टिक पिशवीमुक्त 0:08:56.743,0:08:59.586 म्हणवतात, [br]ती आम्ही तपासतो आणि त्यांना मान्यता देतो. 0:08:59.610,0:09:01.983 त्यांच्या दारावर आम्ही हा स्टीकर लावतो. 0:09:02.007,0:09:04.325 त्यांची नावं सोशल मीडियावर आणि बालीतल्या 0:09:04.349,0:09:06.425 महत्त्वाच्या मासिकांतून प्रसिद्ध करतो. 0:09:06.829,0:09:07.980 यामुळे घडतं ते उलटंच. 0:09:08.004,0:09:10.829 स्टीकर नसलेले जास्त उठून दिसतात. 0:09:10.853,0:09:12.240 (हशा) 0:09:12.731,0:09:16.050 मेलाती:तर, आम्ही हे सगळं तुम्हाला [br]खरोखर का सांगतो आहोत? 0:09:16.673,0:09:18.591 थोडं अशासाठी, की आमच्या टीमबरोबर 0:09:18.615,0:09:20.686 आम्ही जे यश मिळवलं, त्याचा 0:09:20.710,0:09:22.066 आम्हाला अभिमान वाटतो. 0:09:22.469,0:09:24.557 आणि अशासाठीही, की या मार्गाने चालताना, 0:09:24.581,0:09:27.421 मुलंही काही करू शकतात, हे आम्ही शिकलो. 0:09:27.445,0:09:29.099 आम्ही गोष्टी घडवू शकतो. 0:09:29.891,0:09:32.318 इसाबेल आणि मी केवळ [br]१० आणि १२ वर्षांच्या होतो. 0:09:32.342,0:09:33.901 त्यावेळी आम्ही सुरुवात केली. 0:09:33.925,0:09:35.978 आमच्याजवळ काही आराखडा नव्हता. 0:09:36.002,0:09:37.226 ठरलेले डावपेच नव्हते. 0:09:37.250,0:09:39.169 काही छुपे हेतू नव्हते. 0:09:39.193,0:09:41.633 आमच्यासमोर होती केवळ एक कल्पना 0:09:41.657,0:09:43.770 आणि आमच्याबरोबर काम करणारे मित्र. 0:09:44.195,0:09:46.441 आम्हाला फक्त [br]आमच्या सुंदर घराला गुंडाळून टाकून 0:09:46.465,0:09:49.107 गुदमरवणाऱ्या त्या प्लास्टिक पिशव्यांना [br]रोखायचं होतं. 0:09:49.933,0:09:51.641 मुलांमध्ये एक अमर्याद शक्ती असते 0:09:51.665,0:09:55.830 आणि जगात आवश्यक असणारा बदल [br]स्वतःच होण्याची प्रेरणा असते. 0:09:56.454,0:10:01.179 इसाबेल: तर, या सुंदर पण आव्हानात्मक [br]जगातल्या सर्व मुलांनो, 0:10:01.690,0:10:02.844 व्हा पुढे! 0:10:02.868,0:10:04.623 तो बदल घडवून आणा. 0:10:05.057,0:10:07.476 ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही. 0:10:07.500,0:10:09.767 पण ते फार मोलाचं असेल, इतकं सांगतो. 0:10:10.221,0:10:14.592 आम्ही मुलं जगाच्या लोकसंख्येच्या [br]२५ टक्केच असू. 0:10:14.616,0:10:17.923 पण आम्ही भविष्याचे १०० टक्के आहोत. 0:10:19.050,0:10:21.706 मेलाती:आम्हाला अजून पुष्कळ काम करायचं आहे. 0:10:21.730,0:10:23.395 पण आम्ही तोपर्यंत थांबणार नाही, 0:10:23.419,0:10:27.844 जोपर्यंत बाली विमानतळावर येणाऱ्यांना [br]प्रथम विचारलं जात नाही, 0:10:28.682,0:10:30.016 दोघी: बालीत आपलं स्वागत आहे. 0:10:30.040,0:10:32.207 आपल्या सामानात प्लास्टिक पिशव्या आहेत का? 0:10:32.231,0:10:33.644 (हशा) 0:10:33.668,0:10:36.404 ओम शांति शांति शांति ओम 0:10:36.428,0:10:37.579 धन्यवाद. 0:10:37.603,0:10:47.396 (टाळ्या)