हा माझे रोबोटिक्स मित्र नावाचा एक मस्त धडा आहे. खूप मजा येते. आम्ही कॉम्प्युटर न वापरता प्रोग्रॅमिंग शिकवतो. तर आम्ही लोकांना एकत्र आणतो आणि जिथे लोक त्यांच्या रोबोटिक्स मित्रांना कपांचा स्टॅक करण्यासाठी आणि विशिष्ट कॉन्फीगरेशनसाठी प्रोग्रॅम करतात, फक्त कागदावर बाण जोडून. तर आता आम्ही ते ज्या ॲक्टीव्हिटीवर काम करत आहेत, तिचे इम्प्लीमेंटेशन करत आहोत आमच्याकडे एक प्रोग्रॅमर होता त्याने बाण वापरून हा प्रोग्रॅम लिहिला आणि आमच्याकडे एक रोबो आहे जो बाण वाचतो आहे आणि कप वापरून कसे स्टॅक करायचे याचा विचार करतो आहे. तर आम्ही बाणांचे रूपांतर विशिष्ट हालचालींमध्ये करू आणि असा एक स्टॅक तयार करण्याचा प्रयत्न करू.