(टाळ्या)
एड्सचा शोध लागला १९८१ मध्ये आणि विषाणूचा -- १९८३ मध्ये.
हे गॅपमाईंडर चे बुडबुडे तुम्हाला दाखवतात
या विषाणूचा जागतिक प्रसार १९८३ मध्ये,
किंवा कसा आपण आडाखा बांधतो त्या प्रसाराचा.
आम्ही येथे हे दाखवत आहोत--
या अक्षावर लागण झालेल्या प्रौढ लोकांची टक्केवारी.
आणि या अक्षावर, मी दाखवली आहे प्रती माणशी प्राप्ती डॉलर्समध्ये.
आणि या बुडबुड्यांचा आकार, येथील बुडबुड्यांचा आकार,
दाखवतो की प्रत्येक देशात किती लोकांना रोगाची लागण झाली,
आणि रंग म्हणजे खंड आहेत.
आता, संयुक्त संस्थाने पाहा, १९८३ मध्ये,
तेंव्हा खुप बाधित टक्केवारी फार कमी होती,
पण जास्त लोकसंख्येमुळे बुडबुडा ब-यापैकी मोठाच आहे.
तेंव्हा संयुक्त संस्थानातील ब-याच लोकांना बाधा झाली होती.
आणि, तिथे वर, युगांडा पाहा.
त्यांच्यातील अगदी ५ टक्के बाधित होते,
आणि त्यावेळी लहान देश असुनही मोठा बुडबुडा.
आणि त्यावेळी बहुदा जागातील सगळ्यात जास्त बाधा झालेला देश होता.
आता, काय झाले आहे?
आता तुम्हाला आलेख समजला आहे,
आणि आता, पुढच्या ६० सेकंदांत
आपण एच आय व्ही च्या जागतिक साथीबरोबर खेळू.
पण पहिल्यांदा माझा एक नविन शोध आहे.
(हशा)
मी लेसर पॉईंटरची शलाका जाड केली आहे.
(हशा)
(टाळ्या)
एक, दोन, साडे माडे, तीन!
पहिल्यांदा, आपल्याला युगांडा आणि झिंबाब्वेमध्ये गतीमान वाढ दिसते.
अशा पद्धतीने ते वर गेले.
अशियामध्ये, जास्त बाधा झालेला पहिला देश थायलंड होता.
ते एक ते दोन टक्के पर्यंंत पोचले.
मग युगांडाने मागे वळण्यास सुरुवात केली
तर झिंबाब्वेमध्ये प्रचंड वाढ झाली,
आणि काही वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत एच आय व्ही ची भयानक वाढ झाली.
हे पाहा, भारतात बरेच लोक बाधित झाले,
पण पातळी कमी होती.
आणि जवळजवळ तसेच इथे होतेय.
पाहा युगांडा आणि झिंबाब्वे खाली येत आहेत,
रशिया १% ने वर गेला.
गेल्या २ ते ३ वर्षांत,
आपण जगात एच.आय.व्ही साथीची स्थिर स्थिती पाहतो आहे.
२५ वर्षे लागली त्याला.
पण, स्थिर स्थिती असणे म्हणजे गोष्टी चांगल्या होतायत असे नाही.
फक्त एवढेच की त्या खराब होत नाही आहेत.
आणि त्याची -- स्थिती स्थिर आहे -- कमी जास्त प्रमाणत,
जगातील १ टक्का लोक एच.आय.व्ही. ने बाधित आहेत.
याचा अर्थ ३ ते ४ कोटी लोक
संपूर्ण कॅलिफोर्निया, तेथील प्रत्येक माणूस,
आज जगात कमी-जास्त प्रमाणात अशी स्थिती आहे.
आता, बोस्तवानासाठी परत चालवूया.
बोस्तवाना -- अफ्रिकेच्या दक्षिणेतील उच्च-मध्यम प्राप्ती असलेला देश,
लोकशाही सरकार आणि चांगली अर्थव्यवस्था,
आणि हे पाहा काय झाले तिथे.
ते कमी प्रमाणात सुरु झाले आणि मग भयानक वाढले,
२००३ मध्ये त्यांनी शिखर गाठले,
आणि आता ते कमी झाले.
पण ते हळू हळू उतरत आहेत.
कारण बोस्तवानामध्ये, चांगल्या अर्थव्यवस्थेमुळे आणि सरकारमुळे,
लोकांवर उपचार करणे त्यांना शक्य झाले.
आणि बाधा झालेल्या लोकांवर उपचार केले ते एड्सने मरत नाहीत.
ही टक्केवारी खाली येणार नाही.
कारण लोक १० ते २० वर्षे जगू शकतात.
म्हणून या मोजमापात काही त्रुटी आहेत.
पन आफ्रिकेतले गरीब देश, या खालिल बाजूचे कमी प्राप्तीवाले देश,
तेथे बाधित लोकांच्या टक्केवारीचे दर जोरात पडत आहेत
कारण लोक अजुनही मरतात.
PEPFAR असुनही,
सर्व लोकांपर्यंत उपचार पोचत नाहीत,
आणि गरीब देशांतील ज्यांना उपचार मिळतो,
त्यातील फक्त ६० टक्के लोक २ वर्षांनंतर उपचार घेत असतात.
आयुष्यभर उपचार घेणे शक्य नाही
गरीब देशांतील सर्वांना.
पण जे काही केले जाते आहे ते फारच चांगले आहे.
पण लक्ष्य पुन्हा प्रसार रोखण्याकडे दिले पाहिजे.
फक्त संक्रमण रोखूनच
जग याचा सामना करू शकेल.
औषधे खुप महाग आहेत -- लस असती तर
किंवा जेंव्हा जेंव्हा ती तयार होईल, ती जास्त फायदेशीर आसेल --
पण औषधे गरीबांसाठी फार महाग आहेत.
फक्त औषधेच नाहीत तर सगळी उपचार पद्धती
आणि त्यासाठी लागणारी काळजी फार महागडी आहे.
मग जेंव्हा आपण या प्रकाराकडे पाहतो,
एक गोष्ट स्पष्टपणे कळते:
हे निळे बुडबुडे दिसतायत
आणि लोक म्हणतात एच.आय.व्ही. आफ्रिकेत जास्त आहे.
माझ्यामते, आफ्रिकेतला एच.आय.व्ही. फार वेगळा आहे.
एच आय व्ही चे जगातला सर्वात जास्त दर
तुम्हाला आफ्रिकेतील देशांत दिसेल,
आणि तरी सेनेगलमध्ये, येथे खाली,
अमेरीकेएवढाच दर आहे.
तुम्हाला मादागास्करही दिसेल,
आणि अनेक आफ्रिकेतील देश दिसतील
बाकीच्या जगाएवढाच कमी दर असेलेले.
आपल्याला असे वाटते की आफ्रिकेत एवढे प्रमाण आहे
आणि तिथे असेच चालते.
ते आपल्याला थांबवायाला हवं.
हे योग्य नाही किंवा हुशारीचे नाही
तसा विचार करणे
(टाळ्या)
मला नशिबाने खुप दिले आणी संयुक्त संस्थानांसाठी मी काम केले.
मला असे कळाले की सॉल्ट लेक सिटी आणि सॅन फ्रँसिस्को यांत फरक आहे.
(हशा)
तसाच तो आफ्रिकेत आहे -- फारच मोठा.
तर, तेथे एवढे जास्त प्रमाण का? युद्ध?
नाही, हे पाहा
युद्धात गुरफटलेल्या काँगोमध्ये प्रमाण कमी आहे -- दोन, तीन, चार टक्के.
आणि शांततेत नांदणा-या शेजारच्या झांबियात - १५ टक्के.
आणि एक सर्वेक्षण काँगोतून येणा-या नीर्वासितांचे --
त्यांच्यात २ ते ३ टक्के लोक बाधित आहेत,
आणि शांत झांबियात -- त्यापेक्षा बरेच जास्त.
अभ्यास आता स्पष्टपणे दाखवतो की
युद्धे भयंकर असतात, बलात्कार भयंकर असतात.
पण आफ्रिकेतल्या जास्त प्रमाणामागील मुख्य कारण हे नाही आहे.
मग, गरिबी?
पण आपण वरून पाहिले,
तर असे दिसते की जास्त पैसा म्हणजे जास्त एच.आय.व्ही.
पण हे एवढे सोपे नाही आहे,
म्हणून आपण खोलात जाऊ आणि टांझानियात पाहू.
मी टांझानियाचे ५ प्राप्तीगट केले आहेत.
सर्वात अधिक उत्पन्नापासून ते सर्वात कमी पर्यंत
आणी आता पाहा.
ज्यांच्याकडे सरवात जास्त पैसा आहे, मी श्रीमंत म्हणणार नाही.
त्यामच्यात एच.आय.व्ही. जास्त आहे.
हा फरक ११ टक्केपासून ४ टक्केपर्यंत जातो,
आणि महिलांमध्ये तर याहूनही अधिक आहे.
आम्हाला वाटत असलेल्या ब-याच गोष्टी, आता चांगल्या संशोधनामुळे,
आफ्रिकेतील संस्थांनी आणि संशोधकांनी केलल्या
आंतरराष्ट्रीय संशोधकांबरोबर, खोट्या ठरवल्या गेल्या आहेत.
म्हणून आता, टांझानियातील फरक पुढे आला आहे
आणि केनियाची माहिती दाखवल्याशिवार मी राहू शकत नाही.
येथे पाहा केनिया.
मी केनियाचे प्रांतांनुसार भआग केले आहेत
हे पाहा
एकाच आफ्रिकेतील देशात किती फरक आहे --
अगदी कमी प्रमाणापासून जास्त प्रमाणापर्यंत,
आणि ब-याच प्रांतात मध्यम ते कमी प्रमाण आहे.
मग, काय?
काही देशात प्रचंड प्रमाण का दिसते?
तर, जास्त लोकांबरोबर शारीरिक संबंध असूनही,
निरोधचा वापर कमी आहे,
आणि संभोग करणा-यांच्या वयातील फरकही जास्त आहे --
म्हणजे वयाने जास्त असलेले पुरूक्ष वयाने तरूण असलेल्या स्त्रियांशी संभोग करतात.
आपल्याला तरूण स्त्रियांमध्ये जास्त बाधा दिसते तरूण पुरुषांपेक्षा
या जास्त बाधा झालेल्या देशांत.
पण ते कुठे वसले आहेत?
मी बुडबुडे एक नकाशावर दाखवतो.
सर्वात जास्त प्रमाण असलेले लोकसंख्येतील ४ टक्के आहेत
आणि त्यांत एच आय व्ही बाधित ५० टक्के आहेत.
एच.आय.व्ही. सर्व जगात आहे.
पाहा, सर्व जगभरातील बुडबुडे.
ब्राझीलमध्ये बरेच एचआयव्ही बाधित लोक आहेत.
अरब देशात जास्त नाहीत पण इराण मध्ये बरेच जास्त.
तिथे गर्द आणि वेश्याव्यवसाय जास्त चालतो.
भारतात जास्त आहे जास्त लोकसंख्येमुळे.
अग्नेय-अशिया आणि बाकीचे.
पण आफ्रिकेचा एक भाग आहे --
आणि अवघड गोष्ट ही आहे की, त्याचवेळी,
आफ्रिकेबद्दल एकच म्हणणे मांडता येणार नाही,
तेथिल प्रमाणाचे कारण सांगता येणार नाही एका बाजूला
आणि दुस-या बाजुला, [परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करणे],
कारण या गोष्टीबद्दल शास्त्रीय एकमत आहे.
UNAIDS हे बरीच माहिती उपलब्ध करून दिली आहे,
एचआयव्हीच्या प्रसाराबद्दल.
एकाच वेळी अनेकांशी केलेल्या संभोगामुळे असेल.
विशिष्ट प्रकारचा विषाणू असेल.
किंवा आणि काही गोष्टी असतील
ज्यामुळे संक्रमणाची वारंवारत जास्त आहे.
जर तुम्ही निरोगी असाल आणि विषमलिंगी संभोग करत असाल,
तर लागण होण्याची शक्यता हजारात एक असते.
लगेच अनुमान काढू नका.
आज रात्रीपासूनच व्यवस्थित वागा.
(हशा)
पण -- आणि तुम्ही वाईट परिस्थिती असाल,
तर हीच शक्यता शंभरात एक एवढी असते.
पण आम्हाला असे वाटते हे एकाच वेळी अनेक साथीदारांंमुळे आहे.
आणि एकाचवेळी अनेक साथीदार म्हणजे काय?
स्वीडनमध्ये, एकाचवेळी अनेक साथीदार नसतात.
तेथे एकानंतर एक साथीदार बदलातात.
वोडका, नववर्ष -- वसंतात नविन साथीदार
पुन्हा अर्ध्या उन्हाळ्यानंतर - आणी एक साथीदार
आणि हे असेच चालू राहते.
आणि तुमचे बरेच जुने साथीदार असतात.
आणि त्यामुळे च्लॅमिडीया रोगाची भयंकर साथ तेथे आहे --
जी साथ वर्षानुवर्षे सुरू राहते.
एचआयव्ही ३ ते ६ आठवड्यात शिगेला पोहचतो
आणि म्हणून, एकाच महिन्यात एकापेक्षा जास्त साथीदार असणे
एचआयव्हीच्या संक्रमणासाठी धोकादायक असते इतर रोगांपेक्षा.
बहुदा या सर्व गोष्टीमचा एकत्र परिणां असेल.
आणि मी आनंदी आहे कारण आपण पुढे जात आहोत
आपण ही माहिती पाहू शकतो ही त्यातील पहिली पायरी आहे.
हा आलेख तुम्हाला विनामुल्य मिळू शकतो.
आम्ही UNAIDS ची सर्व माहिती gapminder.org वर टाकली आहे.
अशी आशा आहे की जेंव्हा आपण जागतीक मुद्दयांवर विचार करू
तेंव्हा फक्त मनच नाही,
फक्त पैसाच नाही,
तर आपण आपली बुद्धीही वापरायला हवी.
मी तुमचा आभारी आहे.
(टाळ्या)