मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकले. मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला. आपण हे धडे शिकतो आणि ते फार नसतात, आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ काय पाहिजे ते करू शकतो. संगणक शास्त्र म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला शिकवू शकतो. हल्ली संगणक शास्त्रात आपण अनेक अद्भुत गोष्टी करू शकतो. मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे . (तान्या: संगणक शास्त्र विद्यार्थिनी) पुढच्या तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत संकल्पना शिकाल. सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत, यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत. ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो. त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता. सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड लिहीणार आहोत, तो वापरून हा अँग्री बर्ड या चक्रव्यूहामध्ये जाईल आणि त्याची अंडी चोरणाऱ्या दुष्ट डुकराला पकडेल. ब्लॉकलीचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे बर्डचा चक्रव्यूह आहे, इथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना चक्रव्यूहाखाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे टूलबॉक्स. आणि यातला प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक कमांड आहे, जी बर्डला समजू शकते. उजवीकडचा पांढरा भाग म्हणजे वर्कस्पेस. आणि इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. मी "move" ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढला आणि "run" बटण दाबले, तर काय होतं? बर्ड ग्रीडवर एक बॉक्स पुढे जातो. आणि एक बॉक्स पुढे गेल्यावर मला बर्डला काही करायला लावायचं असेल तर? मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकते. मी "turn right" ब्लॉक निवडणार आहे आणि तो माझ्या "move" ब्लॉकखाली ओढणार आहे , पिवळा बाण येईपर्यंत आणि मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स एकमेकांना जोडले जातील. मी पुन्हा "run" दाबल्यावर, बर्ड स्टॅकमधल्या कमांड्स वर ते खाली या क्रमाने आपल्या वर्कस्पेसमध्ये करेल. जर तुम्हाला कधी ब्लॉक काढून टाकायचा असेल तर तो स्टॅकमधून काढून ट्रॅश कॅनमध्ये टाका. "run" बटण दाबल्यावर, तुम्ही नेहमी "reset" बटण दाबून बर्डला पुन्हा सुरुवातीला नेऊ शकता. चला, आता त्या डुकरांना पकडूया!