एक शिल्पकार छिन्नी चालवून एखादी मूर्ती घडवतो आहे, अशी कल्पना करा. मायकेलअँजेलोने याचं सुंदर वर्णन केलं आहे. तो म्हणतो, दगडाच्या प्रत्येक तुकड्यात एक मूर्ती दडलेली असते. ती शोधणं हेच शिल्पकाराचं काम.