प्रेस्टन: अभिनंदन! लिझी: अभिनंदन! स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला! स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम भारी काम केलंत! आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे, तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता. तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट काय करतो, ते शिकलात. आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे, इथं तुम्ही डेव्हलपर आहात. उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी. या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या माईनक्राफ्ट जगात Minecraft: Education Edition मध्ये नेऊ शकता. फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा. मजा करा, आणि छान कामगिरी करा! स्टेसी: आणि मी परत आलेय! ओके, लोकहो, हा एजंट आहे! तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते. बघा, बघा, तो काम करतोय! मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना तयार करायला सांगितला आहे, तो वापरून आपण इथून बाहेर पडू शकतो. आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे. मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू शकते आणि तो ते करेल. स्टँपी: तू हे कसं काय केलंस? स्टेसी: खरं म्हणजे ते फार सोपं होतं. मी फक्त कोड वापरला!