कार्यक्षम प्रोग्रॅमचा भाग म्हणून तुम्ही फंक्शन्स
वापरायला आणि संपादित करायला
शिकला आहात. आता, आपण एखादे फंक्शन पहिल्यापासून कसे तयार करायचे आणि वापरायचे हे शिकू.
त्यासाठी, टूलबॉक्समध्ये फंक्शन्स कॅटेगरी शोधा.
इथे तुम्हाला "do something" नावाचा ब्लॉक दिसेल.
तो ड्रॅग करून तुमच्या वर्कस्पेसमध्ये आणा
आणि त्याला दुसरे नाव द्या
ज्यातून ते फंक्शन काय करते आहे, याचे अधिक
चांगले वर्णन केले जाईल. मी त्याला
"make a square" म्हणत आहे. इथून तुम्ही ब्लॉक्स ड्रॅग करून फंक्शनमध्ये आणू शकता
आणि फंक्शन वापरल्यावर काय व्हायला हवे आहे, ते सांगू शकता. आपले फंक्शन तयार झाल्यामुळे
तुम्हाला दिसेल की टूलबॉक्समध्ये फंक्शन्स लेबलच्या
खाली नवीन make a square ब्लॉक
दिसायला लागला आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रोग्रॅममध्ये आपण तयार केलेले फंक्शन वापरू किंवा
"call" करू शकतो. ही महत्त्वाची पायरी आहे आणि विसरली जाऊ शकते. आता, वेळ आहे पुढे जाण्याची
आणि तुमची स्वत:ची फंक्शन्स बनवण्यासाठी कल्पकता दाखवण्याची!