सभापती व मंत्रीगण ,
मी आज पुन्हा ऐकत आहे
माझा विभाग किती बेजाबदार झाला आहे .
आपल्याला हेराची काय गरज आहे
हे विचित्र नाही का?
मी काही वेगळे ऐकण्याची अपेक्षा
तुमच्याकडून करीत होत्ये.
पण सत्य ऐकून मी धास्तावले .
मी घाबरले आहे कारण आपल्या
शत्रूची पूर्ण महिती नाही .
ते नकाशावरही दिसत नाहीत .
शत्रू कोणी देश नाही तर
ते काही व्यक्ती आहेत.
तुमच्या भोवती पहा
तुम्ही कोणासं भिता ?
तुम्हाला त्यांचा चेहरा दिसतो ?
गणवेश दिसतो ?झेंडा ?नाहीना ?
आपले जग आता पारदर्शक राहिले नाही.
अपारदर्शक झाले आहे ते .
त्या सावल्या आहेत
आणि आपल्याला
त्यांच्याशी लढायचे आहे
आम्हाला बेजबाबदार ठरविण्यापूर्वी
स्वतःला विचारा
तुम्हास किती सुरक्षित
असल्याचे वाटते ?
आणखी एक सांगायचे आहे मला
माझे स्वर्गवासी पती
काव्यप्रेमी होते .
आणि मी ....'
माझ्या सद्हेतू विषयी काहीजण
साशंक आहेत ,
आज मला टेनिसनच्या ओळी आठवतात.
'आज आम्ही इतके सामर्थ्यवान नाहीत "
जुन्या काळात होतो तसे
पृथ्वी स्वर्गावर अधिराज्य करणारे
तसे होतो आपण पूर्वी :
धैर्यशाली कृती करणारे,
नशीब व काळाने ज्यांना जर्जर केले होते
तरीही प्रयत्नशील होते
मार्ग शोधण्यात