वर्डप्रेस ४.७ "वॉन", जॅझ तज्ञ सारा "sassy" वॉन नामाधारीत वेबसाईट सेटअप पूर्वीपेक्षा अधिक सोपे करते कॅर्लीला भेटा. कॅर्ली पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकान चालवते, आणि तिला वेबसाईटची गरज आहे. कॅर्ली तिच्याकडील उपलब्ध पर्याय पहाते... ... आणि तिला वर्डप्रेसचा पर्याय सापडतो. वर्डप्रेस मध्ये कॅर्ली निवडू शकते हजारांमधून एक थिम जी तिची गरज भागविते. कॅर्लीने ट्वेंटी सेव्हन्टीन निवडली जी वर्डप्रेस मधील सर्वांत नवीन थिम आहे, जी व्यावसायिक वापरासाठी बनविली आहे. ट्वेंटी सेव्हन्टीन हे एक गोंडस डिझाइन आहे मोठ्या प्रतिमांसहित - छोट्या व मोठ्या व्यवसायांसाठी ही एक परिपूर्ण थिम आहे. कारण ही एक पूर्णतः नवीन साईट आहे, ट्वेंटी सेव्हन्टीन स्टार्टर कन्टेन्ट दाखविते कॅर्लीस दृश्यमान मदत करण्यासाठी आणि तिचे दुकान कस्टमाईझ करुन सुरु करण्यासाठी. नवीन दृश्यमान शॉर्टकट्स तिच्या साईटचे कोणते भाग बदलले जाऊ शकतात ते दाखविते थेट पुनरावलोकनाद्वारे. जशी ती आपली थिम कस्टमाईझ करते, कॅर्ली ला कळते कि ती शीर्षक व्हिडिओ जोडू शकते. ती तिच्या भाचीचा पपीबरोबर शूट केलेला व्हिडिओ निवडते आणि थेट टॅबलेट द्वारे ती तो शीर्षक व्हिडिओ जोडते. मेनू संपादित करत असतानाच तुम्ही पेजेस बनवू शकत असल्याने वर्डप्रेस ४.७ च्या कस्टमाईझर मध्ये, कॅर्ली तिची साईट बनविणे चालू ठेवू शकते तिच्या सध्याच्या कार्यपद्धतीचा विध्वंस न करता. कॅर्लीला आणखी एक बदल करायचा आहे ती तिची साईट दुसऱ्यांशी शेअर करण्या अगोदर - दुकानाचे नाव अधिक उठावदार बनवायचे. नवीन CSS पॅनल हे सोपं करते, आणि तुम्ही केलेले बदल - थेट दाखविते तुम्ही बदल करत असतानाच. आणि ती प्राण्यांच्या खाद्य दुकानाची नवीन कोरी साईट प्रकाशित करते. आता कॅर्ली आनंदी आहे. वर्डप्रेस ४.७ मध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश आहे आणि विकासकांशी संबंधित इतर बरीच वैशिष्ट्ये जसे कि रेस्ट एपीआय कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स. वर्डप्रेस ४.७ वॉन - तुम्हाला हवी तशी साईट सेटअप करण्यास मदत करते.