आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात,
ती आपण शिकणार आहोत, तिला
"इव्हेंट्स" म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की
प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही
उदाहरणं द्यायची तर, माऊस क्लिक,
अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं.
इथे आपण प्लेयरनं वर/खालीचे बाण किंवा
वर/खालीची बटणे दाबली की बेमॅक्सला वर जायला लावून हिरोला स्पर्श करायला लावणार आहोत
आणि खाली जायला लावून रापुन्झेलला स्पर्श करायला लावणार आहोत. आपण "when up arrow" ब्लॉक
वापरू आणि त्याला " move actor up" ब्लॉक जोडू, त्यामुळे जेव्हा प्लेयर वरच्या बाणाची की दाबेल, तेव्हा
"when up arrow" ब्लॉकला जोडलेलं सगळं रन होईल. बेमॅक्सला खाली नेण्यासाठी आपण हेच करू.
हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय.