हाय, मी आहे लेया आणि मी तान्या. आणि आम्ही नशीबवान आहोत कारण आम्ही संगणक शास्त्र शिकत आहोत. आम्हाला वाटतं की 90% शाळांमध्ये ते शिकवलं जात नाही, हे भयानक आहे. माझ्या हायस्कूलमध्ये नक्कीच हा विषय नव्हता. त्यामुळं कोणीही शिकू शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ तयार करत आहोत. आमची इच्छा आहे की 1 कोटी लोकांनी अवर ऑफ कोड करावा. अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) तुम्ही त्याला सूर्यफुलापर्यंत कसं पोचवाल? त्याला काही कृती कराव्या लागतील. मला जमलं... याहू! ओह! (हसते) आणि मग आपण रन करू आणि बघू काय होतंय हाहा, हे मस्त आहे! वा! झालं! हे खूपच सोपं आहे. - तू आत्ताच तुझा पहिला प्रोग्रॅम लिहिलास मी लिहिला? -हो! हा कोड तू आत्ता लिहिलास -खूप छान. मला वाटायचं, कोड म्हणजे FBI-हॅकर सिम्बॉल्स आणि इतर गोष्टी असतात. थोडंसं समस्या सोडवणं, थोडंसं लॉजिक. हे सूचनांसारखं आहे. प्रोग्रॅमिंग आता खूप सोपं आहे. तुमच्या फोनवर फक्त खेळू नका, तो प्रोग्रॅम करा. ठीक आहे! -मस्त! नोकरी कशी मिळवता येते? ऑनलाईन क्लास लावू शकता - कम्युनिटी कॉलेजमध्ये क्लास शोधा. तुम्हाला जगातील सर्वांत जास्त पगाराच्या नोकऱ्यांपैकी एक मिळेल. मला वाटतेय वैद्यकशास्त्र या सगळ्या संगणक युगात घुसतं आहे. तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करतं आहे. जर तुम्ही तंत्रज्ञान तयार करू शकलात, तर तुम्ही जग बदलू शकता. तर, तुम्ही अवर ऑफ कोडमध्ये सहभागी होण्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. आम्ही आत्ताच 2 ओळींचा कोड लिहिला. 3 ओळींचा कोड! 4 ओळी, 7 ओळी, 5 ओळी, 25 ओळींचा कोड. मी 42 ओळींचा कोड लिहिला. 9 ओळी, 60 ओळींचा कोड, 99 ओळी, 60 ओळी, 18 ओळींचा कोड, 75 ओळींचा कोड. तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, कोणीही शिकू शकतो. अवर ऑफ कोड (पुन्हा म्हणतात) तुम्ही तरुण मुलगा असा किंवा तरुण मुलगी; तुम्ही शहरात राहता असा किंवा ग्रामीण भागात, या देशातल्या प्रत्येकानं कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम कसा लिहायचा हे शिकलं पाहिजे. मी आत्ताच अवर ऑफ कोड पूर्ण केला. खरंतर हे शिकायला खूप सोपं आहे. मुलींनीसुद्धा हे शिकलं पाहिजे. भविष्यासाठी महत्त्वाची असलेली भाषा शिका. संगणक शास्त्र कोणीही शिकू शकतो आणि तुम्हीसुद्धा शिकू शकता. जॅक डोर्सी, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, सगळे आणि तुम्ही सगळे. मी शिकत आहे! प्रयत्न करून पहा. अवर ऑफ कोड आला आहे त्याचा देशभर प्रसार करा