हाय, मी अॅलीस. मी code.org मध्ये
प्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे.
तुम्ही आत्ता खेळत असलेले ट्युटोरियल मी तयार
केलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात.
अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार
करण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या
सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा
गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि
नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात
तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात.
गंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की
एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी
भरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना
स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात
तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे मारलं त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी,
मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की
डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे
डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू!
तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा
किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!