WEBVTT 00:00:01.280 --> 00:00:03.940 अवर ऑफ कोडमध्ये स्वागत... 00:00:14.070 --> 00:00:20.470 हाय, मी कॅथलीन केनेडी. मी स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्सची निर्माती आहे. आज तुम्ही 00:00:20.470 --> 00:00:27.910 आमच्या एका स्टारबरोबर काम करणार आहात, बीबी-8. बीबी-8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. तो करतो 00:00:27.910 --> 00:00:34.830 ती प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हालचाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. कॉम्प्युटर सायन्सचा 00:00:34.830 --> 00:00:41.220 प्रभाव प्रत्येक उद्योगावर आहे, मार्केटिंगपासून ते आरोग्य निगा ते चित्रपट. खरं म्हणजे शेकडो कॉम्प्युटर 00:00:41.220 --> 00:00:45.290 इंजिनिअर्स 'द फोर्स अवेकन्स' सारखा चित्रपट बनवण्यासाठी एकत्र काम करत असतात. 00:00:45.290 --> 00:00:51.899 हाय, मी राचेल रोज, मी आयएलएममध्ये सिनियर आर अँड डी इंजिनियर आहे. मी अॅनिमेशन आणि प्राणी 00:00:51.899 --> 00:00:57.340 तयार करणाऱ्या टीमची प्रमुख आहे. 'द फोर्स अवेकन्स' मध्ये रिग्ज तयार करण्यासाठी कलाकाराला मदत 00:00:57.340 --> 00:01:03.289 करण्याची जबाबदारी माझी होती, हे पात्राचे हलणारे भाग असतात, त्यामुळेच ते पात्र खूप खूप लांबच्या 00:01:03.289 --> 00:01:08.630 आकाशगंगेतलं अतिशय खरंखुरं पात्र वाटतं. पुढच्या तासात, आपण आपला स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार 00:01:08.630 --> 00:01:13.679 करणार आहोत. त्यात तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत संकल्पना शिकाल. सामान्यपणे प्रोग्रॅमिंग 00:01:13.679 --> 00:01:17.240 म्हणजे सगळं टेक्स्ट पण आपण इथं ब्लॉक्स वापरणार आहोत. आपण ते ओढून आणि सोडून प्रोग्रॅम्स लिहीणार 00:01:17.240 --> 00:01:23.200 आहोत. सुरुवातीला, आपण बीबी-8 चालून सगळे भंगाराचे भाग गोळा करेल, यासाठी प्रोग्रॅम करण्यासाठी 00:01:23.200 --> 00:01:27.700 रेबरोबर काम करणार आहोत. तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे स्टार वॉर्स गेम स्पेस आहे. 00:01:27.700 --> 00:01:32.259 इथं कोड रन होईल. प्रत्येक पातळीसाठी सूचना गेम स्पेसच्या खाली आहेत. हा मधला भाग म्हणजे 00:01:32.259 --> 00:01:37.259 टूलबॉक्स आणि यातील प्रत्येक ब्लॉक 00:01:37.259 --> 00:01:42.009 म्हणजे बीबी-8 ला समजणारी कमांड आहे. उजवीकडची पांढरी जागा म्हणजे वर्कस्पेस. 00:01:42.009 --> 00:01:44.649 इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. 00:01:44.649 --> 00:01:51.860 मी moveLeft ब्लॉक आपल्या वर्कस्पेसमध्ये ओढते, काय होतेय? बीबी-8 ग्रीडवर एक ब्लॉक डावीकडे जातो. 00:01:51.860 --> 00:01:56.990 आणि moveLeft ब्लॉकनंतर बीबी-8 ला काही करायचं असेल तर? मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक 00:01:56.990 --> 00:02:02.280 जोडू शकते. मी moveUp ब्लॉक निवडणार आहे आणि तो माझ्या 00:02:02.280 --> 00:02:06.180 moveLeft ब्लॉकखाली ओढणार आहे, हायलाईट दिसेपर्यंत. मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स 00:02:06.180 --> 00:02:10.549 एकत्र जोडले जातील. मी पुन्हा रन दाबल्यावर, बीबी-8 आपल्या वर्कस्पेसमध्ये वरपासून 00:02:10.549 --> 00:02:15.989 खालपर्यंत दिलेल्या कमांड्स करेल. जर तुम्हाला एखादा ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तो 00:02:15.989 --> 00:02:20.560 स्टॅकमधून काढा आणि टूलबॉक्समध्ये न्या. रन बटण दाबल्यावर, रीसेट बटण दाबून तुम्ही 00:02:20.580 --> 00:02:27.600 बीबी-8 ला पुन्हा सुरुवातीला आणू शकता. चला, कामाला लागूया!