अवर ऑफ कोडमध्ये स्वागत...
हाय, मी कॅथलीन केनेडी. मी स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्सची निर्माती आहे. आज तुम्ही
आमच्या एका स्टारबरोबर काम करणार आहात, बीबी-8. बीबी-8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. तो करतो
ती प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हालचाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. कॉम्प्युटर सायन्सचा
प्रभाव प्रत्येक उद्योगावर आहे, मार्केटिंगपासून ते आरोग्य निगा ते चित्रपट. खरं म्हणजे शेकडो कॉम्प्युटर
इंजिनिअर्स 'द फोर्स अवेकन्स' सारखा चित्रपट
बनवण्यासाठी एकत्र काम करत असतात.
हाय, मी राचेल रोज, मी आयएलएममध्ये सिनियर आर अँड डी इंजिनियर आहे. मी अॅनिमेशन आणि प्राणी
तयार करणाऱ्या टीमची प्रमुख आहे. 'द फोर्स अवेकन्स' मध्ये रिग्ज तयार करण्यासाठी कलाकाराला मदत
करण्याची जबाबदारी माझी होती, हे पात्राचे हलणारे
भाग असतात, त्यामुळेच ते पात्र खूप खूप लांबच्या
आकाशगंगेतलं अतिशय खरंखुरं पात्र वाटतं. पुढच्या तासात, आपण आपला स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार
करणार आहोत. त्यात तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या
मूलभूत संकल्पना शिकाल. सामान्यपणे प्रोग्रॅमिंग
म्हणजे सगळं टेक्स्ट पण आपण इथं ब्लॉक्स वापरणार आहोत. आपण ते ओढून आणि सोडून प्रोग्रॅम्स लिहीणार
आहोत. सुरुवातीला, आपण बीबी-8 चालून सगळे भंगाराचे भाग गोळा करेल, यासाठी प्रोग्रॅम करण्यासाठी
रेबरोबर काम करणार आहोत. तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे स्टार वॉर्स गेम स्पेस आहे.
इथं कोड रन होईल. प्रत्येक पातळीसाठी सूचना गेम स्पेसच्या खाली आहेत. हा मधला भाग म्हणजे
टूलबॉक्स आणि यातील प्रत्येक ब्लॉक
म्हणजे बीबी-8 ला समजणारी कमांड आहे.
उजवीकडची पांढरी जागा म्हणजे वर्कस्पेस.
इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
मी moveLeft ब्लॉक आपल्या वर्कस्पेसमध्ये ओढते, काय होतेय? बीबी-8 ग्रीडवर एक ब्लॉक डावीकडे जातो.
आणि moveLeft ब्लॉकनंतर बीबी-8 ला काही करायचं असेल तर? मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक
जोडू शकते. मी moveUp ब्लॉक निवडणार आहे
आणि तो माझ्या
moveLeft ब्लॉकखाली ओढणार आहे, हायलाईट दिसेपर्यंत. मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स
एकत्र जोडले जातील. मी पुन्हा रन दाबल्यावर, बीबी-8 आपल्या वर्कस्पेसमध्ये वरपासून
खालपर्यंत दिलेल्या कमांड्स करेल. जर तुम्हाला
एखादा ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तो
स्टॅकमधून काढा आणि टूलबॉक्समध्ये न्या.
रन बटण दाबल्यावर, रीसेट बटण दाबून तुम्ही
बीबी-8 ला पुन्हा सुरुवातीला आणू शकता.
चला, कामाला लागूया!