1 00:00:22,640 --> 00:00:25,500 या धड्याचं नाव आहे पाकीटातली व्हेरीएबल्स. 2 00:00:26,000 --> 00:00:29,620 आपल्याकडं काही माहिती उपलब्ध नसतानासुद्धा आपण वाक्यं कशी तयार करू शकतो, हे आपण शिकणार आहोत. 3 00:00:30,460 --> 00:00:34,020 आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गाळलेल्या जागा भरा ही संकल्पना माहिती आहे. 4 00:00:34,480 --> 00:00:36,840 आपण आपलं नाव गृहपाठात लिहितानासुद्धा हे करतो. 5 00:00:37,420 --> 00:00:41,020 कधीकधी, एकापेक्षा जास्त गाळलेल्या जागा भरायच्या असतात आणि अशावेळी 6 00:00:41,760 --> 00:00:46,360 आपण त्या रिकाम्या जागेला एक नाव देतो म्हणजे आपल्याला कुठली माहिती कुठं भरायची ते कळेल. 7 00:00:47,480 --> 00:00:50,740 आपण जी माहिती बदलू शकतो त्या जागी प्लेसहोल्डर्स म्हणून व्हेरीएबल्स वापरले जातात. 8 00:00:51,440 --> 00:00:55,740 नसलेल्या माहितीसाठी व्हेरीएबल वापरून, आपण जे काही करत होतो त्यावर काम करण्याकडे परत जाऊ शकतो 9 00:00:56,300 --> 00:00:59,520 आणि कोणालातरी ती माहिती नंतर भरायला सांगू शकतो. 10 00:00:59,920 --> 00:01:01,920 सॉफ्टवेअरमध्ये, आपण खूप वेळा व्हेरीएबल्स वापरतो. 11 00:01:02,520 --> 00:01:06,860 आपण नाव, इमेल पत्ता आणि अगदी युजरच्या नावासाठीसुद्धा प्लेसहोल्डर्स म्हणून व्हेरीएबल्स वापरतो. 12 00:01:06,860 --> 00:01:09,660 अशाप्रकारे, आपण हा तपशील युजरने भरल्यावर कुठे दिसेल, 13 00:01:10,140 --> 00:01:12,240 ते प्रोग्रॅमला सांगतो. 14 00:01:12,980 --> 00:01:15,280 आम्ही आमच्या कामात नेहमी व्हेरीएबल्स वापरतो. 15 00:01:15,280 --> 00:01:19,760 तुम्हाला कोणत्याही वेळी नंतर वापरण्यासाठी माहिती साठवायची असेल तर आपण व्हेरीएबल वापरतो. 16 00:01:20,520 --> 00:01:24,300 समजा आपल्याला युजरनं कितीवेळा ट्विट केलं आहे हे मोजायचं आहे. 17 00:01:26,040 --> 00:01:28,760 युजरनं प्रत्येकवेळा ट्विट केलं की आपण त्या संख्येत एक मिळवू. 18 00:01:28,760 --> 00:01:32,060 आणि प्रत्येकवेळी युजरनं ट्विट डीलीट केलं की आपण त्या संख्येतून एक वजा करू. 19 00:01:32,860 --> 00:01:35,920 आपल्याला कोणात्याही वेळी युजरनं कितीवेळा ट्विट केलं ती संख्या हवी असेल तेव्हा 20 00:01:36,080 --> 00:01:37,560 आपण फक्त तो व्हेरीएबल बघू.