कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधली एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही कॉम्प्युटरला एखादी कृती कशी करायची ते सांगितल्यावर तुम्ही ते फंक्शन पुन्हा कॉल करू शकता. तुम्ही त्याला एक नाव देऊ शकता आणि मग ते कॉल करू शकता. हे एखाद्या भाषेचा विस्तार केल्यासारखे आहे. आपण तयार केलेल्या प्रोग्रॅममध्ये, आपण चार वेळा पुढे जाऊन आणि वळून चौरस कसा काढायचा ते शिकलो. आपण या फंक्शनला 'चौरस काढा' असं नाव देऊ शकतो म्हणजे आपल्याला तसं जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण फक्त 'चौरस काढा' असं म्हणून शकतो आणि ते फंक्शन, तो कोड कॉल करू शकतो, की आपलं काम होईल. आपण आपल्या प्रोग्रॅमिंग भाषेत ती संकल्पना समाविष्ट केली आहे.