अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स: कागदी विमाने या धड्याला प्रत्यक्ष आयुष्यातील अल्गोरीदम्स म्हणतात. अल्गोरीदम्समध्ये लोक दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचे वर्णन करतात. कुकीच्या पाककृती आणि बर्डहाऊस तयार करण्याच्या सूचना हे दोन्ही दैनंदिन जीवनातील अल्गोरीदम्स आहेत. आज आपण कागदी विमाने करण्याचा अल्गोरीदम तयार करणार आहोत आणि तो टेस्ट करणार आहोत. पण सुरुवातीला, आपण या मोठ्या प्रोजेक्टचे सहज करता येण्याजोग्या लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणार आहोत. कागदी विमान बनवण्यासाठी, आपण कोणत्या पायऱ्या करायच्या आणि कोणत्या क्रमाने करायच्या हे ठरवणे आवश्यक आहे. आधी चित्रे कापून तुम्ही तुमचा अल्गोरीदम तयार कराल. नंतर, तुम्ही कागदी विमान तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या दाखवणारी 6 चित्रे निवडाल आणि ती योग्य क्रमाने लावाल. सगळ्या गोष्टी क्रमाने लावल्यावर, तुम्ही विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या टीमला तुमचा अल्गोरीदम चालतो का नाही हे पाहण्यासाठी तो टेस्ट करण्यासाठी द्याल. चांगल्याप्रकारे डिझाईन केलेला अल्गोरीदम सर्वोत्तम कागदी विमान बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्याला चॉकलेट बनवायचे असते, तेव्हा त्या प्रक्रियेत अनेक मोठ्या पायऱ्या असतात आणि त्यातील प्रत्येक पायरीत अनेक लहान पायऱ्या असतात आणि आपल्याला चॉकलेटची चव कशी हवी आहे त्यानुसार त्याच्या विविध पाककृती किंवा अल्गोरिदम आहेत. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, अगदी छोटीशीसुद्धा. त्यामुळे एका पायरीशिवाय, उरलेल्या पूर्ण करता येत नाहीत. इतरांना समजतील असे अल्गोरीदम्स तयार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक पायरी लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजे ती कोणीही केली तरी परिणाम तोच असेल.