नमस्कार सर्वांना.
या आठवड्यात विद्यार्थी, उद्योजक आणि स्वयंसेवी
संस्थांबरोबर अमेरिकेतल्या शाळांमध्ये
संगणक शास्त्राला पाठिंबा देण्यासाठी
मोठी नवीन पावले उचलण्यासाठी
सहभागी होताना मला आनंद होत आहे.
ही कौशल्यं शिकणं केवळ तुमच्या भविष्यासाठीच
महत्त्वाचं नाही तर
तुमच्या देशाच्या भविष्यासाठीसुद्धा महत्त्वाचं
आहे.
जर आपल्याला अमेरिकेला आघाडीवर ठेवायचं असेल
तर तुमच्यासारख्या लहान अमेरिकन मुलांनी
आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत
बदल करणारी साधनं आणि तंत्रज्ञान
यात तज्ज्ञता मिळवणं आवश्यक आहे.
म्हणूनच मी तुम्हाला सहभागी व्हायला सांगतो आहे.
फक्त नवीन व्हिडीओ गेम खरेदी करू नका,
एखादा गेम तयार करा.
फक्त नवीन ॲप डाऊनलोड करू नका,
ते डिझाईन करायला मदत करा.
तुमच्या फोनवर फक्त खेळू नका,
तो प्रोग्रॅम करा.
कोणीही संगणक शास्त्रज्ञ म्हणून जन्माला
येत नाही,
पण थोडे कष्ट घेऊन आणि थोडे गणित
आणि शास्त्र शिकून
कोणीही संगणक शास्त्रज्ञ होऊ शकतो.
या आठवड्यात तुम्हाला शिकण्याची संधी आहे.
आणि "तुम्ही करू शकणार नाही" असं कोणालाही
म्हणू देऊ नका.
तुम्ही तरुण मुलगा असाल किंवा तरुण मुलगी,
तुम्ही शहरात राहत असाल किंवा ग्रामीण भागात,
कॉम्प्युटर्स तुमच्या भविष्याचा मोठा भाग
असणार आहेत.
आणि जर तुमची कष्ट करायची आणि खूप अभ्यास करायची तयारी असेल
तर तुमचं भविष्य तुम्ही घडवू शकता.
सर्वाना धन्यवाद!