WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:05.000 मी इस्लामच्या दृष्टीकोनातून अनुकंपेबद्दल बोलतोय, 00:00:05.000 --> 00:00:08.000 आणि कदाचित माझ्या श्रद्धेमागं खूप गहन विचार नसेलही 00:00:08.000 --> 00:00:12.000 कारण ती दयेच्या भावनेवरच आधारीत आहे. 00:00:12.000 --> 00:00:14.000 पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. NOTE Paragraph 00:00:14.000 --> 00:00:20.000 आमच्या कुराण या पवित्र ग्रंथामध्ये ११४ अध्याय आहेत, 00:00:20.000 --> 00:00:24.000 आणि प्रत्येक अध्यायाचा आरंभ 'बिस्मिल्लाह' नं होतो, 00:00:24.000 --> 00:00:30.000 त्या परमदयाळू, क्षमाशील ईश्वराच्या नामस्मरणानं, 00:00:30.000 --> 00:00:32.000 किंवा, सर रिचर्ड बर्टन यांनी म्हटल्याप्रमाणं, 00:00:32.000 --> 00:00:35.000 हे रिचर्ड बर्टन म्हणजे एलिझाबेथ टेलरचे पती नव्हेत, 00:00:35.000 --> 00:00:38.000 तर हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले सर रिचर्ड बर्टन 00:00:38.000 --> 00:00:40.000 जे जगप्रवासी होते 00:00:40.000 --> 00:00:44.000 आणि कित्येक साहित्यकृतींचे भाषांतरकार होते, 00:00:44.000 --> 00:00:51.000 त्यांच्या शब्दांत, “करुणेनं ओतप्रोत भरलेल्या दयाळू ईश्वराच्या नामस्मरणानं.” NOTE Paragraph 00:00:51.000 --> 00:00:58.000 आणि मुस्लिमांसाठी, ईश्वराचं मानवजातीशी संवाद साधण्याचं माध्यम असणार्या कुराणातील एका वचनात, 00:00:58.000 --> 00:01:01.000 ईश्वर बोलतोय आपल्या प्रेषित मोहम्मदाशी, 00:01:01.000 --> 00:01:04.000 जे अखेरचे प्रेषित मानले जातात, प्रेषितांच्या मालिकेतील, 00:01:04.000 --> 00:01:10.000 जी सुरु होते आदम पासून, नोवा, मोझेस, अब्राहम सहित 00:01:10.000 --> 00:01:14.000 येशू ख्रिस्तासहित, आणि संपते मोहम्मदापाशी, 00:01:14.000 --> 00:01:17.000 तो म्हणाला, “हे मोहम्मदा, आम्ही तुला पाठवलंच नसतं, 00:01:17.000 --> 00:01:23.000 जर आम्हाला मनुष्यजातीबद्दल रहम नसता, करुणा नसती.” NOTE Paragraph 00:01:23.000 --> 00:01:27.000 आणि आपण सर्व मनुष्य प्राण्यांसाठी, आणि आम्हा मुस्लिमांसाठी नक्कीच, 00:01:27.000 --> 00:01:32.000 प्रेषितानं दाखविलेल्या मार्गावर चालण्यामागं ज्यांचं ध्येय, आणि ज्यांचं उद्दिष्ट 00:01:32.000 --> 00:01:36.000 स्वतःला त्या प्रेषितासारखं बनविणं हे आहे, 00:01:36.000 --> 00:01:38.000 आणि त्या प्रेषितानं आपल्या एका वचनात म्हटलं आहे, 00:01:38.000 --> 00:01:43.000 “स्वतःला दैवी गुणांनी अलंकृत करा.” 00:01:43.000 --> 00:01:49.000 आणि ईश्वरानं स्वतःच सूचित केलं आहे की करुणा हा त्याचा मूळ गुणधर्म आहे, 00:01:49.000 --> 00:01:54.000 वास्तविक, कुराण असं सांगतं की, “ईश्वरानं स्वतःला दयाळू बनण्याचा आदेश दिला" 00:01:54.000 --> 00:01:58.000 अथवा, “स्वतःवर करुणेचा अंमल प्रस्थापित केला.” 00:01:58.000 --> 00:02:05.000 म्हणूनच, आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे, करुणेचे स्रोत बनणं, 00:02:05.000 --> 00:02:09.000 करुणेचे संप्रेरक होणं, करुणेचे पाईक बनणं, 00:02:09.000 --> 00:02:13.000 करुणेचे प्रसारक बनणं, आणि करुणेचे कार्यकर्ते बनणं. NOTE Paragraph 00:02:13.000 --> 00:02:16.000 हे सर्व ठीक आहे, 00:02:16.000 --> 00:02:19.000 पण आपलं चुकतं कुठं, 00:02:19.000 --> 00:02:24.000 आणि या जगात करुणाहीनतेचे स्रोत काय आहेत? 00:02:24.000 --> 00:02:29.000 याचं उत्तर आपण अध्यात्मिक मार्गानं शोधूयात. 00:02:29.000 --> 00:02:36.000 प्रत्येक धार्मिक प्रथेमध्ये, एक बाह्य मार्ग असतो आणि एक अंतःमार्ग, 00:02:36.000 --> 00:02:41.000 किंवा उघड मार्ग आणि गुप्त मार्ग. 00:02:41.000 --> 00:02:49.000 इस्लामचा गुप्त मार्ग सुफीवाद, किंवा अरेबिक मध्ये तसव्वुफ म्हणून ओळखला जातो. 00:02:49.000 --> 00:02:52.000 आणि हे पंडीत अथवा गुरु, 00:02:52.000 --> 00:02:56.000 सुफी परंपरेचे धर्मगुरु, 00:02:56.000 --> 00:03:00.000 आमच्या प्रेषिताच्या शिकवणीचा आणि उदाहरणांचा दाखला देतात, 00:03:00.000 --> 00:03:04.000 की आपल्या समस्यांचं मूळ कुठं आहे. NOTE Paragraph 00:03:04.000 --> 00:03:08.000 प्रेषितानं पुकारलेल्या एका लढाईत, 00:03:08.000 --> 00:03:13.000 त्यानं आपल्या अनुयायांना सांगितलं, “आपण छोट्या युद्धाकडून परतत आहोत 00:03:13.000 --> 00:03:17.000 मोठ्या युद्धाकडं, मोठ्या लढाईकडं.” NOTE Paragraph 00:03:17.000 --> 00:03:22.000 आणि ते म्हणाले, “हे देवदूता, आम्ही लढाईला विटलो आहोत. 00:03:22.000 --> 00:03:25.000 अजून मोठ्या लढाईला आम्ही कसं तोंड देणार?” NOTE Paragraph 00:03:25.000 --> 00:03:33.000 तो म्हणाला, “ती स्वतःची लढाई असेल, अहंकाराशी लढाई.” 00:03:33.000 --> 00:03:42.000 मानवी समस्यांचं मूळ स्वार्थामध्येच असलं पाहिजे, 'मी' मध्ये. NOTE Paragraph 00:03:42.000 --> 00:03:48.000 प्रसिद्ध सुफी गुरु रुमी, जे तुमच्यापैकी बर्याचजणांना माहिती असतील, 00:03:48.000 --> 00:03:54.000 त्यांच्या एका गोष्टीत ते एका व्यक्तीबद्दल बोलतात जी एका मित्राच्या घरी जाते 00:03:54.000 --> 00:03:57.000 आणि दार ठोठावते, 00:03:57.000 --> 00:04:00.000 आणि एक आवाज येतो, “कोण आहे?” NOTE Paragraph 00:04:00.000 --> 00:04:05.000 “मी आहे,” किंवा व्याकरणदृष्ट्या अचूक सांगायचं तर, “तो मी आहे,” 00:04:05.000 --> 00:04:07.000 इंग्रजीमध्ये असंच म्हणतात. NOTE Paragraph 00:04:07.000 --> 00:04:10.000 आतून आवाज येतो, “निघून जा.” NOTE Paragraph 00:04:10.000 --> 00:04:18.000 कित्येक वर्षांच्या प्रशिक्षण, शिस्त, शोध व धडपडीनंतर, 00:04:18.000 --> 00:04:20.000 ती व्यक्ती परत येते, 00:04:20.000 --> 00:04:24.000 आणि अतिशय विनम्रतेनं, ती परत दार ठोठावते. NOTE Paragraph 00:04:24.000 --> 00:04:27.000 आतून आवाज येतो, “कोण आहे?” NOTE Paragraph 00:04:27.000 --> 00:04:31.000 ती म्हणते, “तूच आहेस, पाषाणहृदयी.” NOTE Paragraph 00:04:31.000 --> 00:04:35.000 धाडकन दार उघडतं, आणि आवाज येतो, 00:04:35.000 --> 00:04:42.000 “आता आत ये, कारण या घरात दोन 'मी'साठी जागा नाही, 00:04:42.000 --> 00:04:46.000 दोन इंग्रजी आय (I), आय म्हणजे डोळा नव्हे, दोन अहं साठी. NOTE Paragraph 00:04:46.000 --> 00:04:55.000 आणि रुमीच्या कथा अध्यात्मिक वाटेवरील रुपकं आहेत. 00:04:55.000 --> 00:05:01.000 ईश्वराच्या उपस्थितीत, एका अहं पेक्षा जास्त जणांसाठी जागाच नसते, 00:05:01.000 --> 00:05:06.000 आणि तो अहं ईश्वरी असतो. 00:05:06.000 --> 00:05:10.000 एका शिकवणीमध्ये, जिला आमच्या परंपरेत हदिथ कद्सी म्हणतात, 00:05:10.000 --> 00:05:16.000 ईश्वर म्हणतो की, “माझा सेवक,” किंवा "माझी निर्मिती, मनुष्य प्राणी, 00:05:16.000 --> 00:05:22.000 तोपर्यंत माझ्या निकट येत नाहीत, जोपर्यंत ते करत नाहीत, 00:05:22.000 --> 00:05:25.000 जे मी त्यांना करायला सांगितलं आहे.” 00:05:25.000 --> 00:05:29.000 आणि तुमच्यातील मालक लोकांना माझं म्हणणं तंतोतंत कळेल. 00:05:29.000 --> 00:05:33.000 तुमच्या कामगारांनी तुम्ही सांगितलेलं काम करावं अशी तुमची इच्छा असते, 00:05:33.000 --> 00:05:35.000 आणि ते पूर्ण केल्यावर ते अधिक काम करु शकतात, 00:05:35.000 --> 00:05:38.000 पण तुम्ही त्यांना जे करायला सांगितलंय त्याकडं दुर्लक्ष न करता. NOTE Paragraph 00:05:38.000 --> 00:05:44.000 आणि ईश्वर म्हणतो, “माझा सेवक माझ्या अधिकाधिक निकट येत राहतो, 00:05:44.000 --> 00:05:47.000 मी त्यांना सांगितलेलं अधिकाधिक करुन,” 00:05:47.000 --> 00:05:49.000 आपण त्याला जास्तीचं पुण्य म्हणू शकतो, 00:05:49.000 --> 00:05:53.000 “जोपर्यंत मी त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही. 00:05:53.000 --> 00:05:56.000 आणि जेव्हा मी माझ्या सेवकावर प्रेम करतो,” ईश्वर म्हणतो, 00:05:56.000 --> 00:06:02.000 मी ते डोळे बनतो ज्यानं तो किंवा ती पाहू शकतात, 00:06:02.000 --> 00:06:08.000 ते कान ज्यानं तो किंवा ती ऐकू शकतात, 00:06:08.000 --> 00:06:13.000 तो हात ज्यानं तो वा ती पकडू शकतात, 00:06:13.000 --> 00:06:17.000 आणि तो पाय ज्यानं तो वा ती चालू शकतात, 00:06:17.000 --> 00:06:22.000 आणि ते हृदय ज्यानं त्याला वा तिला जाणीव येते.” 00:06:22.000 --> 00:06:27.000 आपली हीच ईश्वराबरोबरची एकरुपता आहे, 00:06:27.000 --> 00:06:35.000 जी आपल्या अध्यात्माची आणि सर्व श्रद्धा परंपरांची शिकवण व उद्दीष्ट आहे. NOTE Paragraph 00:06:35.000 --> 00:06:41.000 मुस्लिम येशूला सूफी गुरु मानतात, 00:06:41.000 --> 00:06:48.000 तो महान प्रेषित व दूत जो अध्यात्मिक मार्गाचं महत्त्व पटवून द्यायला आला. 00:06:48.000 --> 00:06:52.000 जेव्हा तो म्हणतो, “मीच आत्मा आहे, आणि मीच मार्ग आहे,” 00:06:52.000 --> 00:06:57.000 जेव्हा प्रेषित मोहम्मद म्हणाले, “माझं दर्शन घेणार्याला ईश्वराचंच दर्शन घडतं,” 00:06:57.000 --> 00:07:02.000 कारण ते ईश्वराचं इतकं एकरुप साधन बनले, 00:07:02.000 --> 00:07:04.000 की ते ईश्वराचाच अंश बनले, 00:07:04.000 --> 00:07:08.000 इतकं की ईश्वरेच्छा त्यांच्याच माध्यमातून प्रकट झाली 00:07:08.000 --> 00:07:12.000 आणि त्यांनी स्वतंचं अस्तित्व आणि अहंकार सोडून दिले. 00:07:12.000 --> 00:07:19.000 करुणा ही आपल्यामध्ये असतेच. 00:07:19.000 --> 00:07:24.000 आपल्याला फक्त आपल्या अहंकाराला बाजूला सारायचं आहे, 00:07:24.000 --> 00:07:27.000 आपला स्वार्थ दूर लोटायचा आहे. NOTE Paragraph 00:07:27.000 --> 00:07:35.000 मला खात्री आहे, कदाचित तुमच्यापैकी सर्वांनी, किंवा तुमच्यापैकी बहुतेकांनी, 00:07:35.000 --> 00:07:39.000 एक अशी अध्यात्मिक स्थिती अनुभवली आहे, 00:07:39.000 --> 00:07:46.000 तुमच्या आयुष्यातील तो क्षण, काही सेकंद, कदाचित एखादा मिनीट, 00:07:46.000 --> 00:07:52.000 जेव्हा तुमचा अहंकार गळून पडला. 00:07:52.000 --> 00:07:59.000 आणि त्या क्षणी, तुम्ही विश्वाशी एकरुपता अनुभवली, 00:07:59.000 --> 00:08:05.000 त्या पाण्याच्या भांड्याशी एकरुपता, सकल मानव प्राण्यांशी एकरुपता, 00:08:05.000 --> 00:08:09.000 त्या जगनिर्मात्याशी एकरुपता, 00:08:09.000 --> 00:08:14.000 आणि सर्वशक्तीनिशी, तो दरारा, 00:08:14.000 --> 00:08:18.000 गूढतम प्रेम, गूढ करुणेची व दयेची जाणीव 00:08:18.000 --> 00:08:22.000 जी तुमच्या आयुष्यामध्ये आजवर अनुभवली नव्हती. NOTE Paragraph 00:08:22.000 --> 00:08:28.000 हाच क्षण म्हणजे आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे, 00:08:28.000 --> 00:08:32.000 अशी भेट की, एका क्षणासाठी, तो पुसून टाकतो ती सीमारेषा 00:08:32.000 --> 00:08:38.000 जी आपल्याला भरीस पाडते मी, मी, मी, माझं, माझं, माझं म्हणायला, 00:08:38.000 --> 00:08:42.000 आणि त्याऐवजी, रुमीच्या कथेतील व्यक्तीप्रमाणं, 00:08:42.000 --> 00:08:48.000 आपण म्हणतो, “अरेच्चा, हे तर सर्व तूच आहेस.” 00:08:48.000 --> 00:08:50.000 हे सर्व तूच आहेस. आणि हेच सर्व आपण आहोत. 00:08:50.000 --> 00:08:56.000 आणि आम्ही, मी, व आपण सारे तुझाच अंश आहोत. 00:08:56.000 --> 00:09:02.000 सर्व ईश्वरीय, सर्व उद्दिष्टं, आपला जीवनस्रोत, 00:09:02.000 --> 00:09:04.000 आणि आपला अंत. 00:09:04.000 --> 00:09:09.000 तू आमची हृदयं तोडणाराही आहेस. 00:09:09.000 --> 00:09:15.000 तूच आहेस ज्याच्याकडं आम्ही सर्वांनी बघायचं, ज्याच्या हेतूसाठी आम्ही जगायचं, 00:09:15.000 --> 00:09:19.000 आणि ज्याच्या हेतूसाठी आम्ही मरायचं, 00:09:19.000 --> 00:09:23.000 आणि ज्याच्या हेतूसाठी आमचं पुनरुत्थान केलं जाईल 00:09:23.000 --> 00:09:30.000 ईश्वराला उत्तर देण्यासाठी की आम्ही किती करुणामय जीव आहोत. NOTE Paragraph 00:09:30.000 --> 00:09:34.000 आज आमचा संदेश, आणि आमचा उद्देश, 00:09:34.000 --> 00:09:37.000 आणि तुमच्यापैकी जे आज इथं आहेत, 00:09:37.000 --> 00:09:42.000 आणि या करुणेच्या सनदेचा उद्देश आहे, आठवण करुन देणं. 00:09:42.000 --> 00:09:50.000 कारण कुराण नेहमीच आम्हाला लक्षात ठेवायला उद्युक्त करतं, एकमेकांना आठवण करुन देण्यासाठी, 00:09:50.000 --> 00:09:58.000 कारण सत्यज्ञान हे प्रत्येक मनुष्यप्राण्यात असतं. NOTE Paragraph 00:09:58.000 --> 00:10:01.000 आपण हे सर्व जाणतो. 00:10:01.000 --> 00:10:03.000 आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे. 00:10:03.000 --> 00:10:07.000 जंगनं त्याला सुप्त मन संबोधलं असेल. 00:10:07.000 --> 00:10:11.000 आपल्या सुप्त मनातून, तुमच्या स्वप्नांतून, 00:10:11.000 --> 00:10:19.000 ज्याला कुराणमध्ये म्हटलं आहे, आपली निद्रीतावस्था, दुय्यम मृत्यु, 00:10:19.000 --> 00:10:23.000 क्षणिक मृत्यु. 00:10:23.000 --> 00:10:28.000 आपल्या निद्रीतावस्थेत आपल्याला स्वप्नं पडतात, आपल्याला दिव्य दृष्टी मिळते, 00:10:28.000 --> 00:10:34.000 आपण आपल्या शरीराच्या बाहेरही भ्रमण करतो, आपल्यापैकी बरेचजण, 00:10:34.000 --> 00:10:37.000 आणि आपल्याला विस्मयकारक गोष्टी दिसतात. 00:10:37.000 --> 00:10:42.000 आपण आपल्याला ज्ञात अशा अवकाशाच्या मर्यादेबाहेर भ्रमण करतो, 00:10:42.000 --> 00:10:46.000 आणि आपल्याला ज्ञात असणार्या कालमर्यादेबाहेर. 00:10:46.000 --> 00:10:56.000 पण हे सर्व त्या जगनिर्मात्याचं गुणगान गाण्यासाठी 00:10:56.000 --> 00:11:02.000 ज्याचं मूळ नाव आहे करुणेनं ओतप्रोत भरलेला दयाळू ईश्वर. NOTE Paragraph 00:11:02.000 --> 00:11:09.000 ईश्वर, बोख, तुम्हाला जे नाव द्यावं वाटेल ते, अल्लाह, राम, ओम, 00:11:09.000 --> 00:11:12.000 कुठलंही नाव ज्यायोगे तुम्ही संबोधता 00:11:12.000 --> 00:11:16.000 अथवा मिळवता दैवी अस्तित्व, 00:11:16.000 --> 00:11:22.000 तेच निःसंशय अस्तित्वाचं निश्चित स्थान आहे, 00:11:22.000 --> 00:11:26.000 निःसंशय प्रेम आणि दया आणि करुणा, 00:11:26.000 --> 00:11:29.000 आणि निःसंशय ज्ञान व विद्वत्ता, 00:11:29.000 --> 00:11:32.000 ज्याला हिंदू म्हणतात सच्चिदानंद. 00:11:32.000 --> 00:11:35.000 भाषा वेगळी असेल, 00:11:35.000 --> 00:11:39.000 पण उद्देश एकच आहे. NOTE Paragraph 00:11:39.000 --> 00:11:41.000 रुमीची अजून एक कथा आहे 00:11:41.000 --> 00:11:44.000 तिघांबद्दल, एक तुर्क, एक अरब, 00:11:44.000 --> 00:11:48.000 आणि तिसरा कोण ते मी विसरलो, पण माझ्यामते, तो मलय असू शकतो. 00:11:48.000 --> 00:11:51.000 एकजण अंगूर मागत असतो, एक जण, एक इंग्रज समजू, 00:11:51.000 --> 00:11:56.000 एकजण एनेब मागत असतो, आणि एक जण ग्रेप्स मागत असतो. 00:11:56.000 --> 00:11:59.000 आणि त्यांच्यात भांडण आणि वादविवाद होतात कारण, 00:11:59.000 --> 00:12:03.000 मला ग्रेप्स हवेत, मला एनेब हवेत, मला अंगूर हवेत, 00:12:03.000 --> 00:12:06.000 हे न कळाल्यामुळं की ते म्हणत असलेले शब्द 00:12:06.000 --> 00:12:09.000 वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वस्तूबद्दल बोलतात. NOTE Paragraph 00:12:09.000 --> 00:12:15.000 निःसंशय वास्तव ही एकच संकल्पना आहे, 00:12:15.000 --> 00:12:18.000 निःसंशय अस्तित्व ही एकच संकल्पना, 00:12:18.000 --> 00:12:21.000 कारण निःसंशय म्हणजेच, एकमेव, 00:12:21.000 --> 00:12:24.000 आणि परिपूर्ण व एकमेवाद्वितीय. 00:12:24.000 --> 00:12:27.000 हेच परिपूर्ण अस्तित्वाचं केंद्रीकरण, 00:12:27.000 --> 00:12:30.000 हेच परिपूर्ण शुद्धीचं केंद्रीकरण, 00:12:30.000 --> 00:12:40.000 जाणीव, करुणा व प्रेमाचं निःसंशय स्थान 00:12:40.000 --> 00:12:44.000 हेच ठरवतं देवत्वाचे मुलभूत गुणधर्म. NOTE Paragraph 00:12:44.000 --> 00:12:47.000 आणि तेच असले पाहिजेत 00:12:47.000 --> 00:12:52.000 मानवी अस्तित्वाचे मुलभूत गुणधर्म. 00:12:52.000 --> 00:12:58.000 कारण मानवजातीची व्याख्या, बहुदा जीवशास्त्रीयदृष्ट्या 00:12:58.000 --> 00:13:01.000 शरीरविज्ञानशास्त्र म्हणून होते, 00:13:01.000 --> 00:13:09.000 पण ईश्वर मानवतेची व्याख्या करतो आपल्या परमार्थानुसार, आपल्या स्वभावानुसार. NOTE Paragraph 00:13:09.000 --> 00:13:13.000 आणि कुराणात म्हटलंय, तो देवदूतांशी बोलतो व म्हणतो, 00:13:13.000 --> 00:13:17.000 “जेव्हा मी मातीपासून आदम निर्माण केला, 00:13:17.000 --> 00:13:21.000 आणि त्यामध्ये माझे प्राण फुंकले, 00:13:21.000 --> 00:13:25.000 तेव्हा अतिशय थकून गेलो.” 00:13:25.000 --> 00:13:33.000 देवदूत थकतात, मानवी शरीरासमोर नव्हे, 00:13:33.000 --> 00:13:36.000 तर मानवी आत्म्यासमोर. 00:13:36.000 --> 00:13:40.000 का? कारण त्या आत्म्यामध्ये, मानवी आत्म्यामध्ये, 00:13:40.000 --> 00:13:46.000 दैवी श्वासाचा एक अंश असतो, 00:13:46.000 --> 00:13:49.000 ईश्वरीय आत्म्याचा एक अंश. NOTE Paragraph 00:13:49.000 --> 00:13:54.000 हे बायबलच्या शब्दकोशातही व्यक्त केलं आहे 00:13:54.000 --> 00:14:00.000 जेव्हा आपल्याला शिकवलं जातं की ईश्वरीय प्रतिमेतूनच आपली निर्मिती झाली. 00:14:00.000 --> 00:14:02.000 ईश्वराचं वर्णन कसं कराल? 00:14:02.000 --> 00:14:06.000 ईश्वराचं वर्णन म्हणजे परिपूर्ण अस्तित्व, 00:14:06.000 --> 00:14:09.000 परिपूर्ण जाणीव आणि ज्ञान आणि विद्वत्ता 00:14:09.000 --> 00:14:12.000 आणि परिपूर्ण करुणा व प्रेम. NOTE Paragraph 00:14:12.000 --> 00:14:16.000 आणि, म्हणूनच, आपल्याला मनुष्य बनण्यासाठी, 00:14:16.000 --> 00:14:20.000 मनुष्य बनण्याच्या व्यापक अर्थानं, 00:14:20.000 --> 00:14:23.000 मानवतेच्या सर्वात सुखी कल्पनेनं, 00:14:23.000 --> 00:14:29.000 म्हणजेच आपल्यालाही बनावं लागेल योग्य वाहक 00:14:29.000 --> 00:14:33.000 आपल्यातील ईश्वरी श्वासाचे, 00:14:33.000 --> 00:14:38.000 आणि अस्तित्वाच्या परिपूर्णतेचा स्वतःमध्ये शोध घेत, 00:14:38.000 --> 00:14:41.000 जगण्याचे, अस्तित्वाचे, 00:14:41.000 --> 00:14:46.000 विद्वत्तेच्या, शुद्धीच्या, जाणीवेच्या गुणधर्माचे, 00:14:46.000 --> 00:14:51.000 आणि करुणामय व प्रेमळ बनण्याच्या गुणधर्माचे. NOTE Paragraph 00:14:51.000 --> 00:14:57.000 माझ्या श्रद्धा परंपरांमधून मला हेच समजतं, 00:14:57.000 --> 00:15:04.000 आणि इतर श्रद्धा परंपरांच्या माझ्या अभ्यासातून मला हेच समजतं, 00:15:04.000 --> 00:15:10.000 आणि अशा समान व्यासपीठावर आपण एकत्र आलं पाहिजे, 00:15:10.000 --> 00:15:13.000 आणि जेव्हा आपण यासारख्या व्यासपीठावर एकत्र येतो, 00:15:13.000 --> 00:15:19.000 तेव्हा मला खात्री पटते की आपण एक सुंदर जग निर्माण करु शकतो. NOTE Paragraph 00:15:19.000 --> 00:15:25.000 आणि माझा वैयक्तिक विश्वास आहे की, आपण ती मर्यादा गाठली आहे, 00:15:25.000 --> 00:15:29.000 आणि तुमच्यासारख्या लोकांच्या उपस्थितीनं व मदतीनं, 00:15:29.000 --> 00:15:35.000 आपण ईसाही चं भाकीत सत्यात उतरवू शकतो. 00:15:35.000 --> 00:15:39.000 कारण त्यानं सांगून ठेवलाय असा काळ 00:15:39.000 --> 00:15:46.000 जेव्हा लोक त्यांच्या तलवारींचे नांगर बनवतील 00:15:46.000 --> 00:15:52.000 आणि अजून परत युद्ध करणार नाहीत. NOTE Paragraph 00:15:52.000 --> 00:15:58.000 आपण मानवी इतिहासाच्या त्या स्थितीप्रत आलो आहोत, जिथं आपल्याकडं पर्याय नाही. 00:15:58.000 --> 00:16:07.000 आपल्याला आपला अहंकार उतरवलाच पाहिजे 00:16:07.000 --> 00:16:12.000 अहंकारावर नियंत्रण आणलंच पाहिजे, मग तो वैयक्तिक अहंकार असेल, व्यक्तिगत अहंकार असेल, 00:16:12.000 --> 00:16:18.000 कौटुंबिक अहंकार, की राष्ट्रीय अहंकार, 00:16:18.000 --> 00:16:23.000 आणि सर्वजण त्या एकमेवाद्वितीयाचं गुणगान गावोत. NOTE Paragraph 00:16:23.000 --> 00:16:25.000 धन्यवाद, आणि देव तुमचं भलं करो. 00:16:25.000 --> 00:16:26.000 (टाळ्या)