इथं 50 पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढणारं
फंक्शन आहे. ते छान आहे पण मला 50 पिक्सेल्स बाजू
असलेला चौरस काढायचा असेल आणि दुसरा 100
पिक्सेल्स बाजू असलेला चौरस काढायचा असेल तर?
जवळजवळ सारखीच गोष्ट करण्यासाठी आपल्याला दोन वेगळी फंक्शन्स लिहायला लागू नयेत. त्याऐवजी,
आपण एकच फंक्शन पॅरामीटरसह वापरू शकतो. पॅरामीटरमधून आपण फंक्शनला एक व्हॅल्यू पाठवू
शकतो, जी फंक्शनमध्ये व्हेरीएबल म्हणून वापरली जाते. या फंक्शनला एक पॅरामीटर पाठवायचा प्रयत्न
करूया म्हणजे आपण ते वेगवेगळ्या आकाराचे चौरस काढायला वापरू शकू. फंक्शन एडीटरमध्ये,
तुम्ही आधीप्रमाणेच नाव आणि वर्णन एडीट करू शकता.
पण आता तुम्ही एक पॅरामीटरसुद्धा जोडू शकता.
तुमच्या पॅरामीटरचं नाव रिकाम्या जागी लिहा आणि Add Parameter क्लिक करा, म्हणजे तुम्ही आत्ता
तयार केलेल्या पॅरामीटरच्या नावाचा एक लाल ब्लॉक तयार होईल. आता आपण move forward by 100 block च्या जागी
लेंग्थ हा पॅरामीटर लिहू शकतो म्हणजे
तो तेवढ्या लांबीने पुढे सरकेल.
save and close क्लिक करा आणि तुमचा नवा create a square ब्लॉक फंक्शन्स कॅटेगरीमधून बाहेर
ड्रॅग करा. length च्या पुढे रिकामी जागा आहे, हे तुमच्या लक्षात येईल कारण फंक्शनला लेंग्थ
पॅरामीटरसाठी काय व्हॅल्यू आहे, हे हवं आहे. मॅथमधून
नंबर ब्लॉक ड्रॅग करा.
आणि तो या जागी ठेवा. वेगवेगळी लांबी वापरून तुम्ही
एकच फंक्शन पुन्हा पुन्हा वापरून वेगवेगळ्या लांबीचे
चौरस कसे काढू शकता, ते पहा.