WEBVTT 00:00:00.430 --> 00:00:05.899 आता आपण इफ स्टेटमेंट्स शिकणार आहोत. इफ स्टेटमेंट्स प्रोग्रॅमचा 00:00:05.899 --> 00:00:12.760 मूलभूत भाग आहेत. ती कॉम्प्युटरला निर्णय घ्यायला मदत करतात. माझ्या फोनसह सर्व कॉम्प्युटर्स इफ स्टेटमेंट्सचा 00:00:12.760 --> 00:00:19.310 वापर करतात. उदा. जेव्हा मी माझा फोन अनलॉक करते तेव्हा तो काही कोड रन करतो, तो म्हणजे जर 00:00:19.310 --> 00:00:26.210 मी पासवर्ड बरोबर एंटर केला असेल, तर फोन अनलॉक करा. नाहीतर, तो एरर मेसेज दाखवतो. 00:00:26.210 --> 00:00:30.880 तुम्ही तुमच्या कोडमध्ये इफ स्टेटमेंट्स वापरून स्टीव्ह आणि अलेक्सला ते जगात काय पाहतात त्यासाठी 00:00:30.880 --> 00:00:38.270 प्रतिक्रिया द्यायला लावू शकता. उदा. जर त्यांच्यासमोर दगड असेल, तर ते डावीकडे वळतील. किंवा जर 00:00:38.270 --> 00:00:45.790 झाडाला आपटले तर उजवीकडे वळतील. अशावेळी, तुम्हाला लाव्हामध्ये पडायचे नाही आहे. 00:00:45.790 --> 00:00:50.800 त्यासाठी नियोजन करणे सोपे आहे. आपण तो स्क्रीनवर पाहू शकतो. पण दगडाखाली असलेल्या 00:00:50.800 --> 00:00:55.110 न दिसणाऱ्या लाव्हाचे काय? आपण दगड काढल्यावर, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला 00:00:55.110 --> 00:01:02.110 पाहायला हवे की तिथं लाव्हा आहे का? लाव्हा असेल तर, आपल्याला आपल्या 00:01:02.110 --> 00:01:08.650 कॅरॅक्टरच्या पुढे एक दगड ठेवायला हवा. म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकू. 00:01:08.650 --> 00:01:15.500 अजून मायनिंग करूया! आणि आपल्या पावलांकडे लक्ष ठेवण्यासाठी इफ स्टेटमेंट वापरायचे लक्षात ठेवूया.