आता आपण इफ स्टेटमेंट्स शिकणार आहोत.
इफ स्टेटमेंट्स प्रोग्रॅमचा
मूलभूत भाग आहेत. ती कॉम्प्युटरला निर्णय घ्यायला मदत करतात.
माझ्या फोनसह सर्व कॉम्प्युटर्स इफ स्टेटमेंट्सचा
वापर करतात. उदा. जेव्हा मी माझा फोन अनलॉक करते
तेव्हा तो काही कोड रन करतो, तो म्हणजे जर
मी पासवर्ड बरोबर एंटर केला असेल, तर फोन अनलॉक
करा. नाहीतर, तो एरर मेसेज दाखवतो.
तुम्ही तुमच्या कोडमध्ये इफ स्टेटमेंट्स वापरून स्टीव्ह आणि अलेक्सला
ते जगात काय पाहतात त्यासाठी
प्रतिक्रिया द्यायला लावू शकता. उदा. जर त्यांच्यासमोर दगड असेल, तर ते डावीकडे वळतील. किंवा जर
झाडाला आपटले तर उजवीकडे वळतील. अशावेळी, तुम्हाला लाव्हामध्ये पडायचे नाही आहे.
त्यासाठी नियोजन करणे सोपे आहे. आपण तो स्क्रीनवर पाहू शकतो. पण दगडाखाली असलेल्या
न दिसणाऱ्या लाव्हाचे काय?
आपण दगड काढल्यावर, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला
पाहायला हवे की तिथं लाव्हा आहे का?
लाव्हा असेल तर, आपल्याला आपल्या
कॅरॅक्टरच्या पुढे एक दगड ठेवायला हवा. म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकू.
अजून मायनिंग करूया! आणि आपल्या पावलांकडे लक्ष ठेवण्यासाठी इफ स्टेटमेंट वापरायचे लक्षात ठेवूया.