अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | स्पॉन
गेम्समध्ये, स्पॉन म्हणजेच क्रीएट.
या पातळीला, आपण जेव्हा सूर्यास्त होईल
तेव्हा झोंबींना स्पॉन करायला लावू.
हे करण्यासाठी, आपण "when night"
ब्लॉक वापरू.
आपल्याला झोबींनी रात्री स्पॉन करायला पाहिजे
असल्यानं आपण "spawn zombie" ब्लॉक
"when night" ब्लॉकच्या खाली जोडू.
ते स्पॉन झाल्या झाल्या, प्रत्येक झोंबी
त्याच्या "when spawned" इव्हेंट
स्लॉटमधला कोड रन करेल.
झोंबीना स्पॉन करण्याची मजा अनुभवा!