हा धडयात इंटरनेटबद्दल सगळं काही आहे. इंटरनेट ही एक गर्दीची जागा आहे आणि या गर्दीच्या रस्त्यासारखी
आहे. मेसेजेस म्हणजे ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी वेगात जाणाऱ्या गाड्यांसारखे आहेत.
मेसेजेस इंटरनेटमधून अतिशय वेगानं प्रवास करतात.
इंटरनेट कसं काम करतं, हे समजून घेतल्यावर तुम्हाला
तुम्ही इंटरनेट वापरत असता, तेव्हा काय होत आहे
हे समजेल. तुमच्या कॉम्प्युटरवरून तुमच्या आवडत्या
वेबसाईटला किंवा तुमच्या मित्राकडून ईमेल इनबॉक्सला मेसेजेस कसे जातात, ते तुम्हाला कळेल. जेव्हा
आपल्याला रस्ते माहिती असतात आणि खुणा वाचता येतात तेव्हा गर्दीच्या रस्त्यांवरून जाणं सोपं असतं, तसंच
जेव्हा प्रत्यक्षात काय घडतं हे माहिती असतं तेव्हा इंटरनेट इतकं गुंतागुंतीचं नसतं. इंटरनेटवर मेसेजेस
पाठवणं हे थोडंसं पोस्टानं मेसेजेस पाठवण्यासारखं
आहे पण थोडासा फरक आहे.
मी इथे Google.com वर आहे. या वेबसाईटचा आयपी ॲड्रेस हा नंबर आहे. तुम्ही आयपी ॲड्रेस म्हणजे
प्रेषकाचा पोस्टाचा पत्ता असा विचार करू शकता. अशी कल्पना करूया की
मला मेलमधून तिथल्या ऑफिसमधल्या कोणालातरी
मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला त्या दारावर आयपी
ॲड्रेस आणि युआरएल दिसते आहे का? मी हा मेसेज लिहिला आहे आणि सेंड बटण दाबले आहे. पोस्टाच्या
सेवेपेक्षा यात वेगळे घडते ते म्हणजे इंटरनेट
मेसेजचे छोट्या भागांमध्ये रूपांतर करतो
म्हणजे मेसेज अधिक सहजपणे पाठवता येईल. या छोट्या भागांना पॅकेट्स असे म्हणतात. मेसेजेसचे
प्रत्येक पॅकेट एकावेळी एक याप्रमाणे इच्छित ठिकाणी पाठवले जाते. ही सगळी पॅकेट्स योग्य क्रमाने लावली
जातात म्हणजे प्राप्तकर्त्याला मेसेज योग्यप्रकारे वाचता येईल. अर्थातच, इंटरनेट कसे काम करते
याबद्दल शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण
ही एक चांगली सुरुवात आहे.
तुम्ही एक जाणकार इंटरनेट युजर बनणार आहात!
तुम्ही काय शिकलात ते तुमच्या कुटुंबियांना आणि
मित्रमैत्रिणींना नक्की सांगा! माझं नाव आहे अमांडा कँप आणि मी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
मी प्रोफाईल्स आणि संपर्क स्टोअर करणाऱ्या बॅकएंड सर्व्हरवर काम करणाऱ्या टीममध्ये आहे. माझ्या कामात
आम्ही इतर डिव्हायसेसना उदा. तुमचा फोन संपर्क कसे पाठवता येतील, यचा खूप विचार करतो. बहुतेक लोकांकडे
खूप संपर्क असतात, तुमच्याकडे समजा 1000 संपर्क आहेत आणि ते सगळे संपर्क तुमच्या फोनवर आम्हाला एकदम
पाठवायचे नाहीत कारण तो खूप मोठा मेसेज होईल. इंटरनेट मोठ्या मेसेजेसचं
पॅकेट्समध्ये रूपांतर करतं तसंच आम्ही पेजिंग नावाची संकल्पना वापरतो, ज्यामध्ये आम्ही फक्त तुमचे
100 फोन संपर्क एकावेळी पाठवतो आणि तुमच्या फोनला आम्हाला प्रतिसाद देऊ देतो आणि पुढच्या 100ची
मागणी करायला लावतो. सॉफ्टवेअरची सर्वांत
आकर्षक गोष्ट ही आहे की ते संपूर्ण
जगावर परिणाम करू शकते. मी साधारण एकोणीस वर्षांची असताना प्रोग्रॅमिंग करायला शिकले.
मला वाटतं मी सोफोमोर किंवा कॉलेजमध्ये ज्युनिअर होते. मी लिहिलेला पहिला प्रोग्रॅम मला आठवतो आहे
तो म्हणजे सेल्शियसचे फॅरेनहाईटमध्ये रूपांतर. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला लोकांना मदत करायला
आवडते. मी जगभरातल्या लोकांना मदत करतील
असे प्रोग्रॅम्स मी गुगलमध्ये लिहिते.
आणि हे खरंच अविश्वसनीय आणि उत्साहवर्धक
आहे.