हॅलो, मी चरिता कार्टर. मी वॉल्ट डिस्ने इमॅजिनिअरिंगमध्ये सिनिअर क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. आमच्या पाहुण्यांना आवडतील अशी आकर्षणे तयार करणाऱ्या टीम्सची मी प्रमुख आहे. आम्ही नेहमी अधिक सुधारणा करण्याचे आणि आमच्या पाहुण्यांना अधिक चांगला अनुभव देण्याचे मार्ग शोधत असतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे तंत्रज्ञान. अभिनंदन! छान कामगिरी केलीत! तुम्ही बीबी-8 चे प्रोग्रॅमिंग केले आहे. आता आपण थोडंसं अवघड काहीतरी करण्यासाठी तयार आहोत. चला, करूया. तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत गोष्टी शिकला आहात, आपण तुमचा स्वत:चा गेम तयार करण्यासाठी मागे जाणार आहोत. यात आर2डी2 आणि सी3पीओ असतील. गेम तयार करण्यासाठी गेम प्रोग्रॅमर्स रोज वापरतात ती गोष्ट शिकायला हवी: त्यांना इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट्स तुमच्या प्रोग्रॅमला ऐकायला किंवा काहीतरी होण्याची वाट पाहायला सांगतात. आणि ते घडले की मग प्रोग्रॅम एक कृती करतो. इव्हेंटची उदाहरणे म्हणजे माऊस क्लिक होणे, अॅरो बटण किंवा स्क्रीन टॅप केला गेल्याचे ऐकणे. इथे आपण आर2-डी2 ला हलवून बंडखोर पायलटला मेसेज द्यायला सांगणार आहोत. मग खाली जाऊन दुसऱ्या बंडखोर पायलटला मेसेज द्यायला सांगणार आहोत. त्याला हालचाल करायला लावण्यासाठी आपण इव्हेंट्स वापरणार आहोत. जेव्हा खेळाडू वर/खालीच्या अॅरो कीज वापरतो किंवा वर/खालीची बटणे वापरतो, तेव्हा आपण when up event ब्लॉक वापरतो आणि त्याला go up ब्लॉक जोडतो. जेव्हा खेळाडू वर ही अॅरो की वापरतो, तेव्हा when up ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो. आर2-डी2 ला खालच्या दिशेत पाठवण्यासाठी आपण असेच करणार आहोत. आता आपल्या ड्रॉईडचं नियंत्रण करण्यासाठी कोड लिहून ठेवण्याऐवजी आपण आर2-डी2 ला बटण दाबल्याच्या इव्हेंटला प्रतिसाद द्यायला लावू शकतो म्हणजे तो स्क्रीनभर फिरेल. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह व्हायला लागला आहे.