0:00:00.459,0:00:05.200 हॅलो, मी चरिता कार्टर. मी वॉल्ट डिस्ने [br]इमॅजिनिअरिंगमध्ये सिनिअर क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे.[br] 0:00:05.200,0:00:09.550 आमच्या पाहुण्यांना आवडतील अशी आकर्षणे [br]तयार करणाऱ्या टीम्सची मी प्रमुख आहे. 0:00:09.550,0:00:16.569 आम्ही नेहमी अधिक सुधारणा करण्याचे आणि आमच्या पाहुण्यांना अधिक चांगला अनुभव देण्याचे मार्ग 0:00:16.569,0:00:21.220 शोधत असतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे[br]ते म्हणजे तंत्रज्ञान. 0:00:21.220,0:00:27.640 अभिनंदन! छान कामगिरी केलीत! तुम्ही बीबी-8 चे[br]प्रोग्रॅमिंग केले आहे. आता आपण थोडंसं अवघड 0:00:27.640,0:00:33.250 काहीतरी करण्यासाठी तयार आहोत. चला, करूया. तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत गोष्टी शिकला आहात, आपण 0:00:33.250,0:00:40.160 तुमचा स्वत:चा गेम तयार करण्यासाठी मागे जाणार आहोत. यात आर2डी2 आणि सी3पीओ असतील. गेम 0:00:40.160,0:00:45.989 तयार करण्यासाठी गेम प्रोग्रॅमर्स रोज वापरतात ती गोष्ट शिकायला हवी: त्यांना इव्हेंट्स म्हणतात. 0:00:45.989,0:00:51.089 इव्हेंट्स तुमच्या प्रोग्रॅमला ऐकायला किंवा काहीतरी होण्याची वाट पाहायला सांगतात. आणि ते घडले की 0:00:51.089,0:00:56.829 मग प्रोग्रॅम एक कृती करतो. इव्हेंटची उदाहरणे [br]म्हणजे माऊस क्लिक होणे, अॅरो बटण 0:00:56.829,0:01:02.710 किंवा स्क्रीन टॅप केला गेल्याचे ऐकणे. [br]इथे आपण आर2-डी2 ला हलवून बंडखोर पायलटला 0:01:02.710,0:01:07.090 मेसेज द्यायला सांगणार आहोत. मग खाली जाऊन दुसऱ्या बंडखोर पायलटला मेसेज द्यायला सांगणार आहोत. 0:01:07.090,0:01:12.570 त्याला हालचाल करायला लावण्यासाठी आपण इव्हेंट्स वापरणार आहोत. जेव्हा खेळाडू वर/खालीच्या अॅरो 0:01:12.570,0:01:19.549 कीज वापरतो किंवा वर/खालीची बटणे वापरतो, तेव्हा आपण when up event ब्लॉक वापरतो आणि त्याला go up ब्लॉक जोडतो. 0:01:19.549,0:01:25.270 जेव्हा खेळाडू वर ही अॅरो की वापरतो, तेव्हा [br]when up ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो. 0:01:25.270,0:01:28.710 आर2-डी2 ला खालच्या दिशेत पाठवण्यासाठी [br]आपण असेच करणार आहोत. 0:01:28.710,0:01:34.740 आता आपल्या ड्रॉईडचं नियंत्रण करण्यासाठी कोड लिहून ठेवण्याऐवजी आपण आर2-डी2 ला बटण दाबल्याच्या 0:01:34.740,0:01:40.810 इव्हेंटला प्रतिसाद द्यायला लावू शकतो म्हणजे तो स्क्रीनभर फिरेल. हळूहळू तुमचा गेम जास्त 0:01:40.810,0:01:42.510 इंटरअॅक्टीव्ह व्हायला लागला आहे.