मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट.
माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे.
मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय
सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,
मला माईनक्राफ्टचे
धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते.
शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड
चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात
कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे
मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण
छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला.
रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे.
रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत.