WEBVTT 00:00:05.399 --> 00:00:10.309 जेव्हा तुम्ही तुमचा कोड लूप करण्यासाठी रिपीट ब्लॉक वापरता तेव्हा कॉम्प्युटरला कसं कळतं की 00:00:10.309 --> 00:00:15.860 किती वेळा लूप करायचं आहे? रिपीट ब्लॉकमध्ये प्रत्यक्षात फॉर लूप नावाचा एक अधिक 00:00:15.860 --> 00:00:22.090 सोफेस्टिकेटेड कोड लपवलेला असतो, जो सुरुवातीच्या मूल्यापासून शेवटच्या मूल्यापर्यंत विशिष्ट संख्येने 00:00:22.090 --> 00:00:30.580 वाढवत संख्या मोजत असतो. उदा. रिपीट 3 ब्लॉक 1 पासून 3 पर्यंत 1 च्या अंतराने मोजतो. प्रत्येकवेळी 00:00:30.580 --> 00:00:35.750 मोजल्यावर तो लूपच्या आतला कोड रन करतो. किती वेळा फॉर लूप रन केला आहे हे त्याला 00:00:35.750 --> 00:00:40.129 काऊंटर व्हेरीएबल वापरून कळतं. हा व्हेरीएबल लूपच्या सुरुवातीला सुरुवातीच्या मूल्याला सेट केलेला असतो 00:00:40.129 --> 00:00:44.309 आणि प्रत्येक वेळी लूप रन केला की तो वाढत जातो. काऊंटर व्हेरीएबल 00:00:44.309 --> 00:00:51.360 शेवटच्या मूल्यापेक्षा जास्त झाला की लूप रन व्हायचा थांबतो. रिपीट ब्लॉकऐवजी खरा फॉर लूप 00:00:51.360 --> 00:00:55.470 वापरायचा फायदा म्हणजे तुम्हाला काऊंटर व्हेरीएबल प्रत्यक्ष पाहता येतो आणि तो तुमच्या 00:00:55.470 --> 00:01:01.720 लूपमध्ये वापरता येतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे एक फुलांची मालिका आहे आणि पहिल्याला एक परागकण 00:01:01.720 --> 00:01:06.740 आहे, दुसऱ्याला दोन आहेत आणि तिसऱ्याला तीन आहेत, मी फॉर लूप वापरून मधमाशीला प्रत्येकवेळी 00:01:06.740 --> 00:01:12.470 'काऊंटर' गोळा करायला सांगेन. जो पहिल्या फुलाजवळ एक, दुसऱ्याजवळ दोन आणि 00:01:12.470 --> 00:01:18.170 तिसऱ्याजवळ तीन असेल. तसंच फॉर लूपमध्ये, तुम्ही काऊंटर 00:01:18.170 --> 00:01:22.940 एकच्या व्यतिरिक्त इतर आकड्यानेसुद्धा वाढवू शकता. म्हणजे तुम्ही 2ने, 4ने काऊंटर वाढवू शकता 00:01:22.940 --> 00:01:26.780 किंवा दरवेळी बदलणाऱ्या संख्येनेसुद्धा वाढवू शकता.