जेव्हा तुम्ही तुमचा कोड लूप करण्यासाठी रिपीट ब्लॉक
वापरता तेव्हा कॉम्प्युटरला कसं कळतं की
किती वेळा लूप करायचं आहे? रिपीट ब्लॉकमध्ये प्रत्यक्षात फॉर लूप नावाचा एक अधिक
सोफेस्टिकेटेड कोड लपवलेला असतो, जो सुरुवातीच्या मूल्यापासून शेवटच्या मूल्यापर्यंत विशिष्ट संख्येने
वाढवत संख्या मोजत असतो. उदा. रिपीट 3 ब्लॉक 1 पासून 3 पर्यंत 1 च्या अंतराने मोजतो. प्रत्येकवेळी
मोजल्यावर तो लूपच्या आतला कोड रन करतो. किती वेळा फॉर लूप रन केला आहे हे त्याला
काऊंटर व्हेरीएबल वापरून कळतं. हा व्हेरीएबल लूपच्या सुरुवातीला सुरुवातीच्या मूल्याला सेट केलेला असतो
आणि प्रत्येक वेळी लूप रन केला की तो
वाढत जातो. काऊंटर व्हेरीएबल
शेवटच्या मूल्यापेक्षा जास्त झाला की लूप रन व्हायचा थांबतो. रिपीट ब्लॉकऐवजी खरा फॉर लूप
वापरायचा फायदा म्हणजे तुम्हाला काऊंटर व्हेरीएबल
प्रत्यक्ष पाहता येतो आणि तो तुमच्या
लूपमध्ये वापरता येतो. उदाहरणार्थ, माझ्याकडे एक फुलांची मालिका आहे आणि पहिल्याला एक परागकण
आहे, दुसऱ्याला दोन आहेत आणि तिसऱ्याला तीन आहेत, मी फॉर लूप वापरून मधमाशीला प्रत्येकवेळी
'काऊंटर' गोळा करायला सांगेन. जो पहिल्या
फुलाजवळ एक, दुसऱ्याजवळ दोन आणि
तिसऱ्याजवळ तीन असेल. तसंच फॉर लूपमध्ये,
तुम्ही काऊंटर
एकच्या व्यतिरिक्त इतर आकड्यानेसुद्धा वाढवू शकता.
म्हणजे तुम्ही 2ने, 4ने काऊंटर वाढवू शकता
किंवा दरवेळी बदलणाऱ्या संख्येनेसुद्धा वाढवू शकता.