if-else स्टेटमेंट म्हणजे दोन गोष्टींमधली निवड
असते, उदा. जर स्क्रॅट खारीला ओकचे फळ मिळाले
तर ती खुश होईल. नाहीतर ती दु:खी होईल
आणि शोधत राहील. आता आपण
आपल्या स्क्रॅट या मैत्रिणीबरोबर if-else स्टेटमेंट
कसं वापरायचं ते बघूया. हा ब्लॉक "if" ब्लॉकसारखाच
दिसतो पण शेवटी एक जास्त भाग आहे, "else". जर मी "do" मध्ये "move forward" ब्लॉक टाकला
आणि "else" मध्ये "turn left" ब्लॉक टाकला,
तर रस्ता असेल तर स्क्रॅट खार
पुढे जाईल. आणि जर पुढे रस्ता नसेल तर,
स्क्रॅट डावीकडे वळेल. ती निर्णय घेत आहे
आणि त्यानुसार दोनपैकी एक कृती करेल.
आणि "if" ब्लॉक्सप्रमाणेच तुम्ही "repeat"
मध्ये "if-else" ब्लॉक्स घालू शकता.
आता, स्क्रॅट खारीला ओकचे फळ
मिळवायला मदत करूया.