1 00:00:01,458 --> 00:00:03,809 काही आठवड्यांपूर्वी एका मैत्रिणीने मला फोन केला. 2 00:00:03,833 --> 00:00:05,768 बातमी वाईट होती. 3 00:00:05,792 --> 00:00:08,170 तिचा मोबाईल संडासात पडला होता. 4 00:00:09,083 --> 00:00:10,934 आपल्यापैकी कोणाचं असं झालं आहे काय? 5 00:00:10,958 --> 00:00:12,643 (हशा) 6 00:00:12,667 --> 00:00:14,226 परिस्थिती वाईट होती. 7 00:00:14,250 --> 00:00:17,601 म्हणजे कसं घडलं, तिने तो बाहेर कसा काढला, 8 00:00:17,625 --> 00:00:19,518 वगैरे तपशिलात न शिरता 9 00:00:19,542 --> 00:00:22,018 आपण इतकंच म्हणूया, की परिस्थिती वाईट होती. 10 00:00:22,042 --> 00:00:24,768 ती पार घाबरून गेली, कारण आपल्या सर्वांप्रमाणे 11 00:00:24,792 --> 00:00:29,226 मोबाईल हे तिच्या आयुष्यातलं सर्वाधिक गरजेचं आणि वापराचं साधन आहे. 12 00:00:29,250 --> 00:00:32,268 पण तो दुरुस्त कसा करायचा, हे काही तिला ठाउक नव्हतं. 13 00:00:32,292 --> 00:00:35,583 कारण ते एक पूर्णपणे गूढ प्रकरण आहे. 14 00:00:36,083 --> 00:00:38,750 विचार करा: तुम्ही काय कराल? 15 00:00:39,583 --> 00:00:42,809 मोबाईलचं कार्य कसं चालतं, हे तुम्हांला कितपत समजतं? 16 00:00:42,833 --> 00:00:46,226 कोणत्या गोष्टीतला बिघाड शोधून तुम्ही ती दुरुस्त करू शकाल? 17 00:00:46,250 --> 00:00:50,059 बरेचसे लोक म्हणतील, "कोणतीच नाही." 18 00:00:50,083 --> 00:00:51,893 एका पाहणीनुसार, 19 00:00:51,917 --> 00:00:55,101 या देशातल्या मोबाईलधारकांपैकी ८०% लोकांनी 20 00:00:55,125 --> 00:00:57,643 कधीच त्यांच्या मोबाईलची बॅटरी स्वतः बदललेली नाही. 21 00:00:57,667 --> 00:01:01,375 आणि २५% लोकांना, ती तशी बदलता येते हेही ठाऊक नाही. 22 00:01:02,500 --> 00:01:04,643 मी एक प्रयोगशील भौतिकशास्त्रज्ञ आहे. 23 00:01:04,667 --> 00:01:06,292 ही माझी खेळणी. 24 00:01:07,458 --> 00:01:12,184 माझं विशेष कार्यक्षेत्र म्हणजे, मूलभूत क्वांटम मेकॅनिकल गुणधर्मांच्या अभ्यासासाठी 25 00:01:12,208 --> 00:01:15,542 नवी सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक साधने बनवणे. 26 00:01:16,208 --> 00:01:21,726 पण माझा मोबाईल बिघडला, तर त्यावर चाचण्या कुठून सुरू कराव्यात, 27 00:01:21,750 --> 00:01:23,226 हे मलाही समजणार नाही. 28 00:01:23,250 --> 00:01:27,226 मोबाईलसारख्या अनेक वस्तूंवर आपलं आयुष्य अवलंबून असतं, 29 00:01:27,250 --> 00:01:31,351 पण त्या कशा चालतात, त्या उघडून कशा तपासाव्यात, हे आपल्याला ठाऊक नसतं. 30 00:01:31,375 --> 00:01:36,309 मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी यांची रचना हल्ली इतकी गुंतागुंतीची आणि प्रगत असते, की 31 00:01:36,333 --> 00:01:38,917 ती उघडून दुरुस्त करण्याची आपल्याला भीती वाटते. 32 00:01:40,375 --> 00:01:42,559 म्हणजे समस्या अशी आहे, की 33 00:01:42,583 --> 00:01:47,375 आपण आणि आपल्या वापरातलं तंत्रज्ञान यामध्ये अंतर आहे. 34 00:01:48,708 --> 00:01:52,559 ज्या साधनांवर आपण अवलंबून आहोत, त्यांच्याबद्दलच्या या दुराव्यामुळे 35 00:01:52,583 --> 00:01:55,417 आपल्याला असहायता, रितेपणा वाटतो. 36 00:01:56,125 --> 00:01:59,684 एका पाहणीच्या निष्कर्षानुसार, 37 00:01:59,708 --> 00:02:02,893 आज आपल्या सर्वांना तंत्रज्ञानाची भीती 38 00:02:02,917 --> 00:02:05,518 मृत्यूपेक्षाही जास्त वाटते. 39 00:02:05,542 --> 00:02:09,393 (हशा) 40 00:02:09,417 --> 00:02:14,101 पण मला वाटतं या साधनांशी सुसंवाद साधून 41 00:02:14,125 --> 00:02:16,476 आपल्याला त्यांची ओळख करून घेता येईल, 42 00:02:16,500 --> 00:02:19,458 ती प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे. 43 00:02:20,458 --> 00:02:25,143 का? कारण प्रयोगाद्वारे प्रमेयाची पडताळणी, किंवा 44 00:02:25,167 --> 00:02:26,458 प्रात्यक्षिक देता येते. 45 00:02:27,417 --> 00:02:30,393 जसे आपण आपली ज्ञानेंद्रिये, 46 00:02:30,417 --> 00:02:31,726 आपले हात 47 00:02:31,750 --> 00:02:33,393 वापरुन जगाशी संपर्क साधतो 48 00:02:33,417 --> 00:02:35,809 आणि त्याविषयी माहिती घेतो. 49 00:02:35,833 --> 00:02:38,809 हा सुसंवाद हरवलेला आहे. 50 00:02:38,833 --> 00:02:41,351 आता मी एक उदाहरण देते. 51 00:02:41,375 --> 00:02:43,351 नुकताच मी हा प्रयोग केला, 52 00:02:43,375 --> 00:02:45,518 टचस्क्रीनचं कार्य कसं चालतं, ते पाहण्यासाठी. 53 00:02:45,542 --> 00:02:47,434 या दोन धातूच्या तबकड्या आहेत. 54 00:02:47,458 --> 00:02:51,542 बॅटरी वापरून मी यातील एक संभारित केली. 55 00:02:55,917 --> 00:02:57,184 ठीक. 56 00:02:57,208 --> 00:03:00,351 त्या भाराचं विस्थापन मी व्होल्टमीटरद्वारे मोजलं. 57 00:03:00,375 --> 00:03:02,143 आता, ते नीट चालतं आहे का पाहू. 58 00:03:02,167 --> 00:03:04,434 आता मी जेव्हा तबकड्यांजवळ माझा हात हलवेन, 59 00:03:04,458 --> 00:03:06,684 तेव्हा व्होल्टेज बदलल्याचं दिसेल. 60 00:03:06,708 --> 00:03:09,250 टचस्क्रीनने माझ्या हाताला दिलेला हा प्रतिसाद. 61 00:03:09,958 --> 00:03:13,518 पण यात माझ्या हाताचं वैशिष्ट्य काय? आता मला आणखी प्रयोग केले पाहिजेत. 62 00:03:13,542 --> 00:03:15,851 आता समजा मी एखादा लाकडाचा तुकडा घेतला, 63 00:03:15,875 --> 00:03:19,434 आणि एका तबकडीला जोडला, तर फारसं काही घडत नाही. 64 00:03:19,458 --> 00:03:22,101 पण एखादा धातूचा तुकडा तबकडीला जोडला, 65 00:03:22,125 --> 00:03:24,000 तर व्होल्टेजमध्ये मोठा बदल होतो. 66 00:03:24,958 --> 00:03:28,101 आता मी आणखी प्रयोग करून, लाकूड आणि धातू यामधला फरक 67 00:03:28,125 --> 00:03:29,684 शोधून काढू शकते. 68 00:03:29,708 --> 00:03:32,226 मला असं आढळून येईल, की लाकूड हे विद्युतवाहक नाही. 69 00:03:32,250 --> 00:03:34,893 पण माझा हात आणि धातू, हे वाहक आहेत. 70 00:03:34,917 --> 00:03:37,643 आता तुमच्या लक्षात आलं असेल, की यामुळे माझं ज्ञान वाढलं. 71 00:03:37,667 --> 00:03:40,768 टचस्क्रीन वापरताना हातमोजे का घालू नयेत, ते आता मला समजतं. 72 00:03:40,792 --> 00:03:42,458 कारण हातमोजे वाहक नसतात. 73 00:03:43,375 --> 00:03:48,476 आता माझ्यासाठी या तंत्रज्ञानामागचं रहस्य थोडंसं उलगडलं आहे. 74 00:03:48,500 --> 00:03:50,601 माझ्या साधनांच्या मूलतत्त्वांशी 75 00:03:50,625 --> 00:03:55,333 वैयक्तिक सुसंवाद साधण्याची माझी क्षमता वाढली आहे. 76 00:03:56,875 --> 00:04:00,351 पण प्रयोग करणं म्हणजे फक्त वस्तूंची मोडतोड करणं नव्हे. 77 00:04:00,375 --> 00:04:04,393 प्रयोग म्हणजे परीक्षण करणे, आणि चिकित्सक विचारांनुसार प्रात्यक्षिक करणे. 78 00:04:04,417 --> 00:04:07,893 प्रयोग कशासाठी केला, हे महत्त्वाचं नाही. टचस्क्रीनचं कार्य तपासणं असो, 79 00:04:07,917 --> 00:04:11,393 कोणता पदार्थ किती वाहक आहे हे शोधणं असो, 80 00:04:11,417 --> 00:04:14,893 किंवा किती जाडीचा पदार्थ हातांनी तोडता येतो, 81 00:04:14,917 --> 00:04:17,351 हे तपासणं असो. 82 00:04:17,375 --> 00:04:20,559 माझ्या साधनांच्या मूलतत्त्वाबद्दलची 83 00:04:20,583 --> 00:04:22,792 माझी समज, त्यावरचं नियंत्रण याद्वारे वाढते. 84 00:04:23,875 --> 00:04:25,601 यामागे संशोधन आहे. 85 00:04:25,625 --> 00:04:27,518 पहिली गोष्ट, मी माझे हात वापरते आहे. 86 00:04:27,542 --> 00:04:29,583 याचा संबंध आरोग्य सुधारण्याशी आहे. 87 00:04:30,417 --> 00:04:32,768 दुसरी गोष्ट, मी प्रात्यक्षिकाद्वारे शिकते आहे. 88 00:04:32,792 --> 00:04:36,768 यामुळे समज आणि स्मरणशक्ती वाढते, असं सिद्ध झालेलं आहे. 89 00:04:36,792 --> 00:04:39,333 यामुळे मेंदूच्या जास्त भागांना चालना मिळते. 90 00:04:40,125 --> 00:04:43,518 म्हणजे प्रयोग आणि प्रात्यक्षिकाद्वारे 91 00:04:43,542 --> 00:04:45,768 विचार केल्याने आपल्याला 92 00:04:45,792 --> 00:04:47,893 भोवतालच्या जगाचं, आपल्या अस्तित्वाचं, 93 00:04:47,917 --> 00:04:50,833 आणि आपल्या साधनांचं आकलन होतं. 94 00:04:51,833 --> 00:04:53,559 आंतरजालावर माहिती शोधण्याचा 95 00:04:53,583 --> 00:04:55,208 असा परिणाम होत नाही. 96 00:04:57,500 --> 00:05:00,268 माझ्या बाबतीत प्रयोगाला 97 00:05:00,292 --> 00:05:01,976 वैयक्तिक पातळीवर महत्त्व आहे. 98 00:05:02,000 --> 00:05:04,018 मी लहानपणापासून प्रयोग करत नव्हते. 99 00:05:04,042 --> 00:05:05,934 भौतिकशास्त्रज्ञांविषयी माहिती नव्हती. 100 00:05:05,958 --> 00:05:09,184 माझ्या बहिणीजवळ रसायनशास्त्राची उपकरणं होती, पण तिने मला 101 00:05:09,208 --> 00:05:10,542 कधीच हात लावू दिला नाही. 102 00:05:11,708 --> 00:05:14,351 मला जगाशी मानसिकदृष्टया संपर्क तुटल्यासारखं वाटत असे, 103 00:05:14,375 --> 00:05:16,393 आणि असं का वाटतं ते समजत नसे. 104 00:05:16,417 --> 00:05:18,268 मी नऊ वर्षांची होते, तेव्हा 105 00:05:18,292 --> 00:05:20,601 माझी आजी मला अहंमात्र म्हणत असे. 106 00:05:20,625 --> 00:05:22,393 या शब्दाचा अर्थ मला शोधावा लागला. 107 00:05:22,417 --> 00:05:26,292 याचा अर्थ, जगात फक्त आपण एकटेच अस्तित्वात आहोत, असं वाटणं. 108 00:05:27,875 --> 00:05:29,768 त्यावेळी मला फार राग आला होता. 109 00:05:29,792 --> 00:05:31,893 कारण, कोणती आजी आपल्या नातीला असं म्हणेल? 110 00:05:31,917 --> 00:05:34,601 (हशा) 111 00:05:34,625 --> 00:05:38,476 पण मला वाटतं, ते खरं आहे. 112 00:05:38,500 --> 00:05:40,601 त्यानंतर अनेक वर्षांनी 113 00:05:40,625 --> 00:05:43,559 जेव्हा मी विद्यापीठात मूलभूत भौतिकशास्त्र शिकत होते, 114 00:05:43,583 --> 00:05:44,976 तेव्हा मला समजलं, 115 00:05:45,000 --> 00:05:46,268 की या जगाच्या, 116 00:05:46,292 --> 00:05:48,143 निदान भौतिक जगाच्या 117 00:05:48,167 --> 00:05:50,601 चाचण्या करून ते समजून घेता येतं. 118 00:05:50,625 --> 00:05:53,059 जगाचं कार्य कसं चालतं, 119 00:05:53,083 --> 00:05:54,393 आणि त्यात माझं स्थान काय, 120 00:05:54,417 --> 00:05:56,393 याची एक निराळी जाण मला येऊ लागली. 121 00:05:56,417 --> 00:05:59,601 त्यानंतर जेव्हा स्वतः चाचण्या आणि संशोधन केल्याने 122 00:05:59,625 --> 00:06:01,434 माझं आकलन वाढलं, 123 00:06:01,458 --> 00:06:04,208 तेव्हा जगाशी सुसंवाद साधण्यामधला एक मोठा भाग पूर्ण झाला. 124 00:06:05,000 --> 00:06:10,309 प्रत्येकजण प्रयोगशील भौतिकशास्त्र नसतो, हे मला ठाऊक आहे. 125 00:06:10,333 --> 00:06:13,917 पण मला वाटतं, प्रत्येकाने प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 126 00:06:14,792 --> 00:06:16,601 आणि मला वाटतं -- 127 00:06:16,625 --> 00:06:18,917 मी आणखी एक उदाहरण देते. 128 00:06:20,439 --> 00:06:23,059 नुकतीच मी माध्यमिक शाळेतल्या मुलांसोबत काम करत होते. 129 00:06:23,083 --> 00:06:25,059 चुंबकत्व शिकण्यात मदत करत होते. 130 00:06:25,083 --> 00:06:29,434 मी त्यांना मॅग्ना डूडल [चुंबकीय पाटी] देऊन ती तोडायला सांगितली. 131 00:06:29,458 --> 00:06:31,542 आठवते का ती तुम्हांला? 132 00:06:34,958 --> 00:06:38,809 सुरुवातीला तिला हात लावायला कोणीच तयार नव्हतं. 133 00:06:38,833 --> 00:06:41,601 वस्तू तोडू नका, असं सतत सांगितल्यामुळे 134 00:06:41,625 --> 00:06:44,768 त्या निष्क्रियपणे वापरण्याची सवय मुलांना लागली आहे. 135 00:06:44,792 --> 00:06:46,809 पण मग मी त्यांना प्रश्न विचारू लागले. 136 00:06:46,833 --> 00:06:49,351 या पाटीचं कार्य कसं चालतं? कोणते भाग चुंबकीय आहेत? 137 00:06:49,375 --> 00:06:51,476 याबद्दल एक गृहीतक मांडून ते सिद्ध कराल का? 138 00:06:51,500 --> 00:06:53,809 तरीसुद्धा पाटी तोडायला मुलं तयार नव्हती. 139 00:06:53,833 --> 00:06:56,059 खरं तर त्यांना ती घरी न्यावीशी वाटत होती. 140 00:06:56,083 --> 00:07:01,309 शेवटी एका मुलाने ती कापली, आणि त्याला तिच्यात काहीतरी अद्भुत आढळलं. 141 00:07:01,333 --> 00:07:03,684 आता आपण सर्वजण हे इथे करून पाहू. 142 00:07:03,708 --> 00:07:05,375 या पाट्या तोडायला सोप्या असतात. 143 00:07:08,958 --> 00:07:14,125 हे पहा, यात एक लोहचुंबक आहे. मी हे असं कापणार आहे. 144 00:07:17,833 --> 00:07:19,851 आता ते उघडून त्याचे भाग अलग करणार आहे. 145 00:07:19,875 --> 00:07:23,393 आता तुम्हांला आतलं दिसत नसेल, 146 00:07:23,417 --> 00:07:27,226 पण इथे आत एक पांढरा पातळ पदार्थ दिसतो आहे. 147 00:07:27,250 --> 00:07:28,934 तो माझ्या बोटावर तुम्हांला दिसेल. 148 00:07:28,958 --> 00:07:32,542 यावर हे पेन ओढताच त्याला 149 00:07:35,375 --> 00:07:39,393 हे तंतू चिकटलेले तुम्हांला दिसतील. 150 00:07:39,417 --> 00:07:40,976 हे बघताच मुलांना वाटलं, 151 00:07:41,000 --> 00:07:43,434 हे काहीतरी छान मजेदार दिसतं आहे. 152 00:07:43,458 --> 00:07:44,726 त्यांचा उत्साह वाढला. 153 00:07:44,750 --> 00:07:47,684 त्यांनी पाट्या तोडायला, फाडायला सुरवात केली. 154 00:07:47,708 --> 00:07:50,559 आणि आत काय सापडलं, 155 00:07:50,583 --> 00:07:54,351 चुंबकीय तंतू लोहचुंबकाला कसे चिकटतात, त्यामुळे पाटीवर लिहिलं कसं जातं 156 00:07:54,375 --> 00:07:55,684 हे ती ओरडून सांगू लागली. 157 00:07:55,708 --> 00:07:59,042 किंवा तो पांढरा पदार्थ कसा सगळीकडे पसरतो, त्यामुळे लिहिता येतं, असं. 158 00:08:00,167 --> 00:08:01,851 खोलीतून बाहेर जाताजाता 159 00:08:01,875 --> 00:08:03,893 त्यापैकी दोघी वळून मला म्हणाल्या, 160 00:08:03,917 --> 00:08:05,476 "आम्हांला हे फार आवडलं. 161 00:08:05,500 --> 00:08:08,976 आम्ही दोघी आठवड्याच्या शेवटी घरी आणखी प्रयोग करणार." 162 00:08:09,000 --> 00:08:11,583 (हशा) 163 00:08:14,542 --> 00:08:17,226 मला ठाऊक आहे, हे ऐकून पालक काळजीत पडले असतील. 164 00:08:17,250 --> 00:08:19,601 पण ही एक चांगली गोष्ट आहे. 165 00:08:19,625 --> 00:08:23,143 प्रयोग करणं चांगलंच. मला त्यातून मोठं समाधान मिळालं. 166 00:08:23,167 --> 00:08:28,309 आणि त्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फायदा झाला असेल, अशी आशा आहे. 167 00:08:28,333 --> 00:08:31,059 कारण, एक साधा लोहचुंबक वापरून 168 00:08:31,083 --> 00:08:33,726 आपण घरी प्रयोग करू शकतो. 169 00:08:33,750 --> 00:08:37,559 साध्यासोप्या प्रयोगांप्रमाणेच आपण जास्त गुंतागुंतीचे प्रयोगही करू शकतो. 170 00:08:37,583 --> 00:08:39,268 उदाहरणार्थ, स्वतःला प्रश्न विचारा, 171 00:08:39,292 --> 00:08:42,643 या एका पदार्थामुळे आकर्षण आणि अपकर्षण दोन्ही क्रिया कशा होतात? 172 00:08:42,667 --> 00:08:46,184 एक लोहचुंबक वापरून दुसऱ्याचं परिभ्रमण घडवून आणता आलं, 173 00:08:46,208 --> 00:08:49,393 तर त्याचा काही उपयोग होईल का? 174 00:08:49,417 --> 00:08:52,893 किंवा, ही डॉलरची नोट घ्या. 175 00:08:52,917 --> 00:08:54,518 मी हे लोहचुंबक घेते. 176 00:08:54,542 --> 00:08:58,976 लोहचुंबकामुळे ही नोट कशी उचलली जाते, पहा. 177 00:08:59,000 --> 00:09:03,309 या नोटेत चुंबकीय शाई दडली आहे. त्यामुळे बनवटगिरीला आळा बसतो. 178 00:09:03,333 --> 00:09:06,684 इथे ही ब्रान सिरीयल [गव्हाच्या कोंड्याचा पदार्थ] आहे. 179 00:09:06,708 --> 00:09:09,601 ही सुद्धा चुंबकीय आहे. हो ना? 180 00:09:09,625 --> 00:09:12,101 कारण त्यात लोह आहे. 181 00:09:12,125 --> 00:09:13,476 (हशा) 182 00:09:13,500 --> 00:09:15,768 आणि ते आरोग्याला चांगलं. हो ना? 183 00:09:15,792 --> 00:09:17,809 आता आणखी एक. 184 00:09:17,833 --> 00:09:19,684 ही वस्तू चुंबकीय नाही. 185 00:09:19,708 --> 00:09:22,684 लोहचुंबक वापरून ती उचलली जात नाही. 186 00:09:22,708 --> 00:09:24,476 पण मी आता ती थंड करणार आहे. 187 00:09:24,500 --> 00:09:26,851 हीच इथली वस्तू, पण थंड. 188 00:09:26,875 --> 00:09:28,417 ती वस्तू थंड करून 189 00:09:33,000 --> 00:09:34,917 या लोहचुंबकावर ठेवल्यावर, 190 00:09:37,458 --> 00:09:38,851 पहा.. 191 00:09:38,875 --> 00:09:40,143 (टाळ्या) 192 00:09:40,167 --> 00:09:41,417 हे अद्भुत आहे. 193 00:09:45,792 --> 00:09:47,934 ती वस्तू चुंबकीय नाही, 194 00:09:47,958 --> 00:09:50,768 पण तरीही लोहचुंबकाशी सुसंवाद साधते आहे. 195 00:09:50,792 --> 00:09:54,684 हे नीट समजून घ्यायला आणखी बरेच प्रयोग करावे लागतील. 196 00:09:54,708 --> 00:09:58,018 खरं तर माझ्या व्यावसायिक आयुष्यातला बराच काळ मी हे शिकत आहे. 197 00:09:58,042 --> 00:09:59,500 याला सुपरकंडक्टर म्हणतात. 198 00:10:00,083 --> 00:10:03,518 सुपरकंडक्टर ही कल्पना क्लिष्ट आहे. 199 00:10:03,542 --> 00:10:08,101 पण अगदी साधे प्रयोग सुद्धा आपल्याला जगाची चांगली माहिती करून देऊ शकतात. 200 00:10:08,125 --> 00:10:12,976 मी जर म्हटलं, की फ्लॅश मेमरीचं कार्य छोट्या लोहचुंबकांच्या परिभ्रमणामुळे चालतं, 201 00:10:13,000 --> 00:10:15,518 तर तुम्हांला कल्पना येईल. कारण हे तुम्ही पाहिलेलं आहे. 202 00:10:15,542 --> 00:10:17,768 किंवा मी म्हटलं, की एम आर आय यंत्रं 203 00:10:17,792 --> 00:10:22,226 चुंबकत्व वापरून आपल्या शरीरातल्या चुंबकीय कणांचं परिभ्रमण घडवून आणतात, 204 00:10:22,250 --> 00:10:24,101 तर ते तुम्ही पाहिलेलं आहे. 205 00:10:24,125 --> 00:10:31,250 म्हणजे तंत्रज्ञानाशी तुमचा सुसंवाद होऊन, या साधनांचं मूलतत्त्व तुम्हांला समजलं आहे. 206 00:10:33,958 --> 00:10:39,768 मला ठाऊक आहे, की आपल्या रोजच्या आयुष्यात जास्तीची कामं वाढवून घेणं कठीण आहे. 207 00:10:39,792 --> 00:10:42,143 विशेष करून प्रयोग. 208 00:10:42,167 --> 00:10:45,101 पण मला वाटतं, हे आव्हान घेऊन पाहण्यासारखं आहे. 209 00:10:45,125 --> 00:10:49,226 एखाद्या गोष्टीच्या कार्याबद्दल कल्पना करा. ती गोष्ट तोडा, आणि तपासून पहा. 210 00:10:49,250 --> 00:10:53,375 एखादी गोष्ट हाताळून पहा, आणि एखादं भौतिक तत्त्व स्वतःशी सिद्ध करा. 211 00:10:54,292 --> 00:10:57,333 तंत्रज्ञानाला मानवतेची जोड द्या. 212 00:10:58,250 --> 00:11:01,143 यामुळे साधला जाणारा सुसंवाद तुम्हांला थक्क करून टाकेल. 213 00:11:01,167 --> 00:11:03,143 धन्यवाद. 214 00:11:03,167 --> 00:11:05,333 (टाळ्या)