0:00:01.458,0:00:03.809 काही आठवड्यांपूर्वी [br]एका मैत्रिणीने मला फोन केला. 0:00:03.833,0:00:05.768 बातमी वाईट होती. 0:00:05.792,0:00:08.170 तिचा मोबाईल संडासात पडला होता. 0:00:09.083,0:00:10.934 आपल्यापैकी कोणाचं असं झालं आहे काय? 0:00:10.958,0:00:12.643 (हशा) 0:00:12.667,0:00:14.226 परिस्थिती वाईट होती. 0:00:14.250,0:00:17.601 म्हणजे कसं घडलं, तिने तो बाहेर कसा काढला, 0:00:17.625,0:00:19.518 वगैरे तपशिलात न शिरता 0:00:19.542,0:00:22.018 आपण इतकंच म्हणूया, की [br]परिस्थिती वाईट होती. 0:00:22.042,0:00:24.768 ती पार घाबरून गेली, [br]कारण आपल्या सर्वांप्रमाणे 0:00:24.792,0:00:29.226 मोबाईल हे तिच्या आयुष्यातलं [br]सर्वाधिक गरजेचं आणि वापराचं साधन आहे. 0:00:29.250,0:00:32.268 पण तो दुरुस्त कसा करायचा, [br]हे काही तिला ठाउक नव्हतं. 0:00:32.292,0:00:35.583 कारण ते एक पूर्णपणे गूढ प्रकरण आहे. 0:00:36.083,0:00:38.750 विचार करा: तुम्ही काय कराल? 0:00:39.583,0:00:42.809 मोबाईलचं कार्य कसं चालतं, [br]हे तुम्हांला कितपत समजतं? 0:00:42.833,0:00:46.226 कोणत्या गोष्टीतला बिघाड शोधून [br]तुम्ही ती दुरुस्त करू शकाल? 0:00:46.250,0:00:50.059 बरेचसे लोक म्हणतील, "कोणतीच नाही." 0:00:50.083,0:00:51.893 एका पाहणीनुसार, 0:00:51.917,0:00:55.101 या देशातल्या मोबाईलधारकांपैकी ८०% लोकांनी 0:00:55.125,0:00:57.643 कधीच त्यांच्या मोबाईलची बॅटरी [br]स्वतः बदललेली नाही. 0:00:57.667,0:01:01.375 आणि २५% लोकांना, [br]ती तशी बदलता येते हेही ठाऊक नाही. 0:01:02.500,0:01:04.643 मी एक प्रयोगशील भौतिकशास्त्रज्ञ आहे. 0:01:04.667,0:01:06.292 ही माझी खेळणी. 0:01:07.458,0:01:12.184 माझं विशेष कार्यक्षेत्र म्हणजे, मूलभूत [br]क्वांटम मेकॅनिकल गुणधर्मांच्या अभ्यासासाठी 0:01:12.208,0:01:15.542 नवी सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक साधने बनवणे. 0:01:16.208,0:01:21.726 पण माझा मोबाईल बिघडला, [br]तर त्यावर चाचण्या कुठून सुरू कराव्यात, 0:01:21.750,0:01:23.226 हे मलाही समजणार नाही. 0:01:23.250,0:01:27.226 मोबाईलसारख्या अनेक वस्तूंवर [br]आपलं आयुष्य अवलंबून असतं, 0:01:27.250,0:01:31.351 पण त्या कशा चालतात, त्या उघडून [br]कशा तपासाव्यात, हे आपल्याला ठाऊक नसतं. 0:01:31.375,0:01:36.309 मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी यांची रचना[br]हल्ली इतकी गुंतागुंतीची आणि प्रगत असते, की 0:01:36.333,0:01:38.917 ती उघडून दुरुस्त करण्याची [br]आपल्याला भीती वाटते. 0:01:40.375,0:01:42.559 म्हणजे समस्या अशी आहे, की 0:01:42.583,0:01:47.375 आपण आणि आपल्या वापरातलं तंत्रज्ञान[br]यामध्ये अंतर आहे. 0:01:48.708,0:01:52.559 ज्या साधनांवर आपण अवलंबून आहोत, [br]त्यांच्याबद्दलच्या या दुराव्यामुळे 0:01:52.583,0:01:55.417 आपल्याला असहायता, रितेपणा वाटतो. 0:01:56.125,0:01:59.684 एका पाहणीच्या निष्कर्षानुसार, 0:01:59.708,0:02:02.893 आज आपल्या सर्वांना तंत्रज्ञानाची भीती 0:02:02.917,0:02:05.518 मृत्यूपेक्षाही जास्त वाटते. 0:02:05.542,0:02:09.393 (हशा) 0:02:09.417,0:02:14.101 पण मला वाटतं या साधनांशी सुसंवाद साधून 0:02:14.125,0:02:16.476 आपल्याला त्यांची ओळख करून घेता येईल, 0:02:16.500,0:02:19.458 ती प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे. 0:02:20.458,0:02:25.143 का? कारण प्रयोगाद्वारे [br]प्रमेयाची पडताळणी, किंवा 0:02:25.167,0:02:26.458 प्रात्यक्षिक देता येते. 0:02:27.417,0:02:30.393 जसे आपण आपली ज्ञानेंद्रिये, 0:02:30.417,0:02:31.726 आपले हात 0:02:31.750,0:02:33.393 वापरुन जगाशी संपर्क साधतो 0:02:33.417,0:02:35.809 आणि त्याविषयी माहिती घेतो. 0:02:35.833,0:02:38.809 हा सुसंवाद हरवलेला आहे. 0:02:38.833,0:02:41.351 आता मी एक उदाहरण देते. 0:02:41.375,0:02:43.351 नुकताच मी हा प्रयोग केला, 0:02:43.375,0:02:45.518 टचस्क्रीनचं कार्य कसं चालतं, [br]ते पाहण्यासाठी. 0:02:45.542,0:02:47.434 या दोन धातूच्या तबकड्या आहेत. 0:02:47.458,0:02:51.542 बॅटरी वापरून मी यातील एक संभारित केली. 0:02:55.917,0:02:57.184 ठीक. 0:02:57.208,0:03:00.351 त्या भाराचं विस्थापन [br]मी व्होल्टमीटरद्वारे मोजलं. 0:03:00.375,0:03:02.143 आता, ते नीट चालतं आहे का पाहू. 0:03:02.167,0:03:04.434 आता मी जेव्हा तबकड्यांजवळ माझा हात हलवेन, 0:03:04.458,0:03:06.684 तेव्हा व्होल्टेज बदलल्याचं दिसेल. 0:03:06.708,0:03:09.250 टचस्क्रीनने माझ्या हाताला [br]दिलेला हा प्रतिसाद. 0:03:09.958,0:03:13.518 पण यात माझ्या हाताचं वैशिष्ट्य काय?[br]आता मला आणखी प्रयोग केले पाहिजेत. 0:03:13.542,0:03:15.851 आता समजा मी एखादा लाकडाचा तुकडा घेतला, 0:03:15.875,0:03:19.434 आणि एका तबकडीला जोडला, [br]तर फारसं काही घडत नाही. 0:03:19.458,0:03:22.101 पण एखादा धातूचा तुकडा तबकडीला जोडला, 0:03:22.125,0:03:24.000 तर व्होल्टेजमध्ये मोठा बदल होतो. 0:03:24.958,0:03:28.101 आता मी आणखी प्रयोग करून, [br]लाकूड आणि धातू यामधला फरक 0:03:28.125,0:03:29.684 शोधून काढू शकते. 0:03:29.708,0:03:32.226 मला असं आढळून येईल, की [br]लाकूड हे विद्युतवाहक नाही. 0:03:32.250,0:03:34.893 पण माझा हात आणि धातू, हे वाहक आहेत. 0:03:34.917,0:03:37.643 आता तुमच्या लक्षात आलं असेल, की [br]यामुळे माझं ज्ञान वाढलं. 0:03:37.667,0:03:40.768 टचस्क्रीन वापरताना हातमोजे का घालू नयेत, [br]ते आता मला समजतं. 0:03:40.792,0:03:42.458 कारण हातमोजे वाहक नसतात. 0:03:43.375,0:03:48.476 आता माझ्यासाठी या तंत्रज्ञानामागचं रहस्य [br]थोडंसं उलगडलं आहे. 0:03:48.500,0:03:50.601 माझ्या साधनांच्या मूलतत्त्वांशी 0:03:50.625,0:03:55.333 वैयक्तिक सुसंवाद साधण्याची [br]माझी क्षमता वाढली आहे. 0:03:56.875,0:04:00.351 पण प्रयोग करणं म्हणजे [br]फक्त वस्तूंची मोडतोड करणं नव्हे. 0:04:00.375,0:04:04.393 प्रयोग म्हणजे परीक्षण करणे, आणि[br]चिकित्सक विचारांनुसार प्रात्यक्षिक करणे. 0:04:04.417,0:04:07.893 प्रयोग कशासाठी केला, हे महत्त्वाचं नाही. [br]टचस्क्रीनचं कार्य तपासणं असो, 0:04:07.917,0:04:11.393 कोणता पदार्थ किती वाहक आहे हे शोधणं असो, 0:04:11.417,0:04:14.893 किंवा किती जाडीचा पदार्थ [br]हातांनी तोडता येतो, 0:04:14.917,0:04:17.351 हे तपासणं असो. 0:04:17.375,0:04:20.559 माझ्या साधनांच्या मूलतत्त्वाबद्दलची 0:04:20.583,0:04:22.792 माझी समज, त्यावरचं नियंत्रण [br]याद्वारे वाढते. 0:04:23.875,0:04:25.601 यामागे संशोधन आहे. 0:04:25.625,0:04:27.518 पहिली गोष्ट, मी माझे हात वापरते आहे. 0:04:27.542,0:04:29.583 याचा संबंध आरोग्य सुधारण्याशी आहे. 0:04:30.417,0:04:32.768 दुसरी गोष्ट, [br]मी प्रात्यक्षिकाद्वारे शिकते आहे. 0:04:32.792,0:04:36.768 यामुळे समज आणि स्मरणशक्ती वाढते, [br]असं सिद्ध झालेलं आहे. 0:04:36.792,0:04:39.333 यामुळे मेंदूच्या जास्त भागांना [br]चालना मिळते. 0:04:40.125,0:04:43.518 म्हणजे प्रयोग आणि प्रात्यक्षिकाद्वारे 0:04:43.542,0:04:45.768 विचार केल्याने आपल्याला 0:04:45.792,0:04:47.893 भोवतालच्या जगाचं, आपल्या अस्तित्वाचं, 0:04:47.917,0:04:50.833 आणि आपल्या साधनांचं आकलन होतं. 0:04:51.833,0:04:53.559 आंतरजालावर माहिती शोधण्याचा 0:04:53.583,0:04:55.208 असा परिणाम होत नाही. 0:04:57.500,0:05:00.268 माझ्या बाबतीत प्रयोगाला 0:05:00.292,0:05:01.976 वैयक्तिक पातळीवर महत्त्व आहे. 0:05:02.000,0:05:04.018 मी लहानपणापासून प्रयोग करत नव्हते. 0:05:04.042,0:05:05.934 भौतिकशास्त्रज्ञांविषयी माहिती नव्हती. 0:05:05.958,0:05:09.184 माझ्या बहिणीजवळ रसायनशास्त्राची [br]उपकरणं होती, पण तिने मला 0:05:09.208,0:05:10.542 कधीच हात लावू दिला नाही. 0:05:11.708,0:05:14.351 मला जगाशी मानसिकदृष्टया [br]संपर्क तुटल्यासारखं वाटत असे, 0:05:14.375,0:05:16.393 आणि असं का वाटतं ते समजत नसे. 0:05:16.417,0:05:18.268 मी नऊ वर्षांची होते, तेव्हा 0:05:18.292,0:05:20.601 माझी आजी मला अहंमात्र म्हणत असे. 0:05:20.625,0:05:22.393 या शब्दाचा अर्थ मला शोधावा लागला. 0:05:22.417,0:05:26.292 याचा अर्थ, जगात फक्त आपण [br]एकटेच अस्तित्वात आहोत, असं वाटणं. 0:05:27.875,0:05:29.768 त्यावेळी मला फार राग आला होता. 0:05:29.792,0:05:31.893 कारण, कोणती आजी आपल्या नातीला असं म्हणेल? 0:05:31.917,0:05:34.601 (हशा) 0:05:34.625,0:05:38.476 पण मला वाटतं, ते खरं आहे. 0:05:38.500,0:05:40.601 त्यानंतर अनेक वर्षांनी 0:05:40.625,0:05:43.559 जेव्हा मी विद्यापीठात [br]मूलभूत भौतिकशास्त्र शिकत होते, 0:05:43.583,0:05:44.976 तेव्हा मला समजलं, 0:05:45.000,0:05:46.268 की या जगाच्या, 0:05:46.292,0:05:48.143 निदान भौतिक जगाच्या 0:05:48.167,0:05:50.601 चाचण्या करून ते समजून घेता येतं. 0:05:50.625,0:05:53.059 जगाचं कार्य कसं चालतं, 0:05:53.083,0:05:54.393 आणि त्यात माझं स्थान काय, 0:05:54.417,0:05:56.393 याची एक निराळी जाण मला येऊ लागली. 0:05:56.417,0:05:59.601 त्यानंतर जेव्हा स्वतः [br]चाचण्या आणि संशोधन केल्याने 0:05:59.625,0:06:01.434 माझं आकलन वाढलं, 0:06:01.458,0:06:04.208 तेव्हा जगाशी सुसंवाद साधण्यामधला [br]एक मोठा भाग पूर्ण झाला. 0:06:05.000,0:06:10.309 प्रत्येकजण प्रयोगशील भौतिकशास्त्र नसतो, [br]हे मला ठाऊक आहे. 0:06:10.333,0:06:13.917 पण मला वाटतं, प्रत्येकाने [br]प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 0:06:14.792,0:06:16.601 आणि मला वाटतं -- 0:06:16.625,0:06:18.917 मी आणखी एक उदाहरण देते. 0:06:20.439,0:06:23.059 नुकतीच मी माध्यमिक शाळेतल्या[br]मुलांसोबत काम करत होते. 0:06:23.083,0:06:25.059 चुंबकत्व शिकण्यात मदत करत होते. 0:06:25.083,0:06:29.434 मी त्यांना मॅग्ना डूडल [चुंबकीय पाटी] देऊन[br]ती तोडायला सांगितली. 0:06:29.458,0:06:31.542 आठवते का ती तुम्हांला? 0:06:34.958,0:06:38.809 सुरुवातीला तिला हात लावायला [br]कोणीच तयार नव्हतं. 0:06:38.833,0:06:41.601 वस्तू तोडू नका, असं सतत सांगितल्यामुळे 0:06:41.625,0:06:44.768 त्या निष्क्रियपणे वापरण्याची सवय [br]मुलांना लागली आहे. 0:06:44.792,0:06:46.809 पण मग मी त्यांना प्रश्न विचारू लागले. 0:06:46.833,0:06:49.351 या पाटीचं कार्य कसं चालतं? [br]कोणते भाग चुंबकीय आहेत? 0:06:49.375,0:06:51.476 याबद्दल एक गृहीतक मांडून ते सिद्ध कराल का? 0:06:51.500,0:06:53.809 तरीसुद्धा पाटी तोडायला मुलं तयार नव्हती. 0:06:53.833,0:06:56.059 खरं तर त्यांना ती घरी न्यावीशी वाटत होती. 0:06:56.083,0:07:01.309 शेवटी एका मुलाने ती कापली, आणि [br]त्याला तिच्यात काहीतरी अद्भुत आढळलं. 0:07:01.333,0:07:03.684 आता आपण सर्वजण हे इथे करून पाहू. 0:07:03.708,0:07:05.375 या पाट्या तोडायला सोप्या असतात. 0:07:08.958,0:07:14.125 हे पहा, यात एक लोहचुंबक आहे. [br]मी हे असं कापणार आहे. 0:07:17.833,0:07:19.851 आता ते उघडून त्याचे भाग अलग करणार आहे. 0:07:19.875,0:07:23.393 आता तुम्हांला आतलं दिसत नसेल, 0:07:23.417,0:07:27.226 पण इथे आत एक पांढरा पातळ पदार्थ दिसतो आहे. 0:07:27.250,0:07:28.934 तो माझ्या बोटावर तुम्हांला दिसेल. 0:07:28.958,0:07:32.542 यावर हे पेन ओढताच त्याला 0:07:35.375,0:07:39.393 हे तंतू चिकटलेले तुम्हांला दिसतील. 0:07:39.417,0:07:40.976 हे बघताच मुलांना वाटलं, 0:07:41.000,0:07:43.434 हे काहीतरी छान मजेदार दिसतं आहे. 0:07:43.458,0:07:44.726 त्यांचा उत्साह वाढला. 0:07:44.750,0:07:47.684 त्यांनी पाट्या तोडायला, [br]फाडायला सुरवात केली. 0:07:47.708,0:07:50.559 आणि आत काय सापडलं, 0:07:50.583,0:07:54.351 चुंबकीय तंतू लोहचुंबकाला कसे चिकटतात, [br]त्यामुळे पाटीवर लिहिलं कसं जातं 0:07:54.375,0:07:55.684 हे ती ओरडून सांगू लागली. 0:07:55.708,0:07:59.042 किंवा तो पांढरा पदार्थ कसा सगळीकडे पसरतो, [br]त्यामुळे लिहिता येतं, असं. 0:08:00.167,0:08:01.851 खोलीतून बाहेर जाताजाता 0:08:01.875,0:08:03.893 त्यापैकी दोघी वळून मला म्हणाल्या, 0:08:03.917,0:08:05.476 "आम्हांला हे फार आवडलं. 0:08:05.500,0:08:08.976 आम्ही दोघी आठवड्याच्या शेवटी [br]घरी आणखी प्रयोग करणार." 0:08:09.000,0:08:11.583 (हशा) 0:08:14.542,0:08:17.226 मला ठाऊक आहे, हे ऐकून [br]पालक काळजीत पडले असतील. 0:08:17.250,0:08:19.601 पण ही एक चांगली गोष्ट आहे. 0:08:19.625,0:08:23.143 प्रयोग करणं चांगलंच. [br]मला त्यातून मोठं समाधान मिळालं. 0:08:23.167,0:08:28.309 आणि त्या विद्यार्थ्यांना यामुळे [br]मोठा फायदा झाला असेल, अशी आशा आहे. 0:08:28.333,0:08:31.059 कारण, एक साधा लोहचुंबक वापरून 0:08:31.083,0:08:33.726 आपण घरी प्रयोग करू शकतो. 0:08:33.750,0:08:37.559 साध्यासोप्या प्रयोगांप्रमाणेच आपण [br]जास्त गुंतागुंतीचे प्रयोगही करू शकतो. 0:08:37.583,0:08:39.268 उदाहरणार्थ, स्वतःला प्रश्न विचारा, 0:08:39.292,0:08:42.643 या एका पदार्थामुळे आकर्षण आणि अपकर्षण [br]दोन्ही क्रिया कशा होतात? 0:08:42.667,0:08:46.184 एक लोहचुंबक वापरून [br]दुसऱ्याचं परिभ्रमण घडवून आणता आलं, 0:08:46.208,0:08:49.393 तर त्याचा काही उपयोग होईल का? 0:08:49.417,0:08:52.893 किंवा, ही डॉलरची नोट घ्या. 0:08:52.917,0:08:54.518 मी हे लोहचुंबक घेते. 0:08:54.542,0:08:58.976 लोहचुंबकामुळे ही नोट कशी उचलली जाते, पहा. 0:08:59.000,0:09:03.309 या नोटेत चुंबकीय शाई दडली आहे.[br]त्यामुळे बनवटगिरीला आळा बसतो. 0:09:03.333,0:09:06.684 इथे ही ब्रान सिरीयल [br][गव्हाच्या कोंड्याचा पदार्थ] आहे. 0:09:06.708,0:09:09.601 ही सुद्धा चुंबकीय आहे. हो ना? 0:09:09.625,0:09:12.101 कारण त्यात लोह आहे. 0:09:12.125,0:09:13.476 (हशा) 0:09:13.500,0:09:15.768 आणि ते आरोग्याला चांगलं. हो ना? 0:09:15.792,0:09:17.809 आता आणखी एक. 0:09:17.833,0:09:19.684 ही वस्तू चुंबकीय नाही. 0:09:19.708,0:09:22.684 लोहचुंबक वापरून ती उचलली जात नाही. 0:09:22.708,0:09:24.476 पण मी आता ती थंड करणार आहे. 0:09:24.500,0:09:26.851 हीच इथली वस्तू, पण थंड. 0:09:26.875,0:09:28.417 ती वस्तू थंड करून 0:09:33.000,0:09:34.917 या लोहचुंबकावर ठेवल्यावर, 0:09:37.458,0:09:38.851 पहा.. 0:09:38.875,0:09:40.143 (टाळ्या) 0:09:40.167,0:09:41.417 हे अद्भुत आहे. 0:09:45.792,0:09:47.934 ती वस्तू चुंबकीय नाही, 0:09:47.958,0:09:50.768 पण तरीही लोहचुंबकाशी सुसंवाद साधते आहे. 0:09:50.792,0:09:54.684 हे नीट समजून घ्यायला [br]आणखी बरेच प्रयोग करावे लागतील. 0:09:54.708,0:09:58.018 खरं तर माझ्या व्यावसायिक आयुष्यातला [br]बराच काळ मी हे शिकत आहे. 0:09:58.042,0:09:59.500 याला सुपरकंडक्टर म्हणतात. 0:10:00.083,0:10:03.518 सुपरकंडक्टर ही कल्पना क्लिष्ट आहे. 0:10:03.542,0:10:08.101 पण अगदी साधे प्रयोग सुद्धा आपल्याला [br]जगाची चांगली माहिती करून देऊ शकतात. 0:10:08.125,0:10:12.976 मी जर म्हटलं, की फ्लॅश मेमरीचं कार्य [br]छोट्या लोहचुंबकांच्या परिभ्रमणामुळे चालतं, 0:10:13.000,0:10:15.518 तर तुम्हांला कल्पना येईल.[br]कारण हे तुम्ही पाहिलेलं आहे. 0:10:15.542,0:10:17.768 किंवा मी म्हटलं, की एम आर आय यंत्रं 0:10:17.792,0:10:22.226 चुंबकत्व वापरून आपल्या शरीरातल्या [br]चुंबकीय कणांचं परिभ्रमण घडवून आणतात, 0:10:22.250,0:10:24.101 तर ते तुम्ही पाहिलेलं आहे. 0:10:24.125,0:10:31.250 म्हणजे तंत्रज्ञानाशी तुमचा सुसंवाद होऊन,[br]या साधनांचं मूलतत्त्व तुम्हांला समजलं आहे. 0:10:33.958,0:10:39.768 मला ठाऊक आहे, की आपल्या रोजच्या आयुष्यात [br]जास्तीची कामं वाढवून घेणं कठीण आहे. 0:10:39.792,0:10:42.143 विशेष करून प्रयोग. 0:10:42.167,0:10:45.101 पण मला वाटतं, हे आव्हान [br]घेऊन पाहण्यासारखं आहे. 0:10:45.125,0:10:49.226 एखाद्या गोष्टीच्या कार्याबद्दल कल्पना करा.[br]ती गोष्ट तोडा, आणि तपासून पहा. 0:10:49.250,0:10:53.375 एखादी गोष्ट हाताळून पहा, [br]आणि एखादं भौतिक तत्त्व स्वतःशी सिद्ध करा. 0:10:54.292,0:10:57.333 तंत्रज्ञानाला मानवतेची जोड द्या. 0:10:58.250,0:11:01.143 यामुळे साधला जाणारा सुसंवाद [br]तुम्हांला थक्क करून टाकेल. 0:11:01.167,0:11:03.143 धन्यवाद. 0:11:03.167,0:11:05.333 (टाळ्या)