तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA
नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून
हजोरो वेळा
शरीरातील हजारो कोटी पेशी
नादुरुस्त होत असतात.
शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज
नादुरस्त होतात
DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो
प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी
आवश्यक आहेत.
DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर
रोग निर्माण करतात.
वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात
काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या
रचनेचा पाया आहे, बिघडतात,
काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते
आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते
DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून
DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो
किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो.
सुदैवाने पेशीत यास अटकाव
करणारी यंत्रणा असते.
ती बहुतेकदा सफल होते.
या मार्गातील दुरुस्ती करतात
विशिष्ट विकार( enzymes.)
ही प्रोटीन्स असून ते विविध भागात
विविध प्रतिसाद देतात.
सामान्य होणारी चूक म्हणजे
पाया घटकांची चुकीची जुळवणी
प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात
A, G, C. T
आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत
ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे
काम करतात
ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C )
strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते
हे असे अदेनाइन थायमिन बरोबर,
आणि गौनीनसायटोसिन बरोबर.
पण या लाखो पाया जुळलवणीत
एखादी चूक होते.
ही विकरे योग्य जुळणी होण्यास
मदत करतात.
काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना
योग्य ठिकाणी जोडतात
यात काही सुटतात.
पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो.
त्यांना अयोग्य जोडी आढळली तर
ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात
यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात
या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात
दहा कोटीत एखादी चूक राहते.
पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो.
याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये
रासायनिक बदल घडवितात
यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात.
जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे.
तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात
जसे हायड्रोजन पेराओक्सैड
काही रासायनिक बदल सामान्य असतात.
त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी
विशिष्ट विकारे असतात.
याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य
दुरुस्तीचे मार्ग असतात
जर एखादा पाया खराब झाला
तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास
पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात.
एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो
आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो
अतिनील किरणांमुळे होणारे बदल
जे दुरुस्त होण्यास अवघड असतात
त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात
आणि dna च्या दुहेरी शिडीची
रचना नष्ट करतात .
याच्या दुरुस्तीची प्रक्रिया
खूप जातील असते
यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया
दुरुस्ती म्हणूया
या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची
लांबलचक श्हिडी काढून टाकतात
आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात
उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे
वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात
ते गुणसूत्राच्या एक अथवा
दोन्ही कडा दुरुस्त करतात
दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते
एकदेखील पेशीचा नाश करू शकते
या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात
होमोलोगौस जोडणी व
नॉन होमोलोगौस जोडणी
होमोलोगौस जोडणी चांगल्या
अवस्थेतील DNA पाया मानून काम करते
नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो
तो विकरांच्या मदतीनेच
गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो
आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो
आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही
strand दुरुस्त करतो
नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो
ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही
काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात
आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात
ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही
त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा
दूर जातात
पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA
मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे
DNAतील बदल काही वाईट नसतात
त्यामुळे उत्परिवर्तन होऊन
नव्या प्रजाती निर्माण होतात
पण आपल्याला DNA
योग्य जागीच असावयास हवा असतो
DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते
विविध प्रकारचे कर्करोग होतात
तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो
तुमच्या शरीरात कार्यरत असतो
दिवसातून कोटी कोटी वेळा.