WEBVTT 00:00:04.880 --> 00:00:07.250 हा गाणं लिहिण्याचा धडा आहे. 00:00:07.340 --> 00:00:09.643 संगीत बरंचसं कॉम्प्युटर प्रोग्रॅमसारखं असतं. 00:00:10.260 --> 00:00:14.520 लिहिलेल्या नोट्स आणि शब्द गायकाला नक्की काय करायचे ते सांगतात. 00:00:14.760 --> 00:00:19.720 गाण्याचा काही भाग पुन्हा पुन्हा वापरला जातो. याला आपण कोरस म्हणतो. 00:00:21.040 --> 00:00:27.000 कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये, प्रोग्रॅमच्या पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या भागांना फंक्शन्स म्हणतात. 00:00:27.940 --> 00:00:34.260 जेव्हा तुम्ही गाण्याचे शब्द वाचता आणि त्यात "कोरस" असे लिहिलेले असते, तेव्हा तुम्ही कोरस असा शब्द म्हणता का? 00:00:34.620 --> 00:00:39.540 नाही, तुम्ही पानाच्या वर जाऊन कोरसचे शब्द काय आहेत, ते पाहता. 00:00:39.680 --> 00:00:45.300 या धड्यात, तुम्ही लिट्ल बनी फू फू नावाचं एक गमतीशीर गाणे शिकाल. 00:00:45.710 --> 00:00:50.480 या गाण्यात कोरस आहे जो तुम्ही अनेकदा परत परत गाल. 00:00:51.440 --> 00:00:55.580 फंक्शन म्हणजे एक कोड जो तुम्ही कॉल करता आणि परत परत वापरता. 00:00:55.990 --> 00:00:58.475 त्यामुळे प्रोग्रॅमिंग अधिक सोपे आणि अधिक कार्यक्षम होते, 00:00:58.620 --> 00:01:02.520 त्यामुळे तुम्हाला तुमच्या फंक्शनच्या पायऱ्या पुन्हा पुन्हा लिहाव्या लागत नाहीत. 00:01:02.540 --> 00:01:05.360 तुम्ही त्या फक्त एकदाच लिहू शकता!