हा गाणं लिहिण्याचा धडा आहे.
संगीत बरंचसं कॉम्प्युटर प्रोग्रॅमसारखं असतं.
लिहिलेल्या नोट्स आणि शब्द गायकाला नक्की
काय करायचे ते सांगतात.
गाण्याचा काही भाग पुन्हा पुन्हा वापरला
जातो. याला आपण कोरस म्हणतो.
कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये, प्रोग्रॅमच्या पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या भागांना फंक्शन्स म्हणतात.
जेव्हा तुम्ही गाण्याचे शब्द वाचता आणि त्यात "कोरस" असे लिहिलेले असते, तेव्हा तुम्ही कोरस असा शब्द म्हणता का?
नाही, तुम्ही पानाच्या वर जाऊन कोरसचे शब्द
काय आहेत, ते पाहता.
या धड्यात, तुम्ही लिट्ल बनी फू फू नावाचं
एक गमतीशीर गाणे शिकाल.
या गाण्यात कोरस आहे जो तुम्ही अनेकदा
परत परत गाल.
फंक्शन म्हणजे एक कोड जो तुम्ही कॉल करता
आणि परत परत वापरता.
त्यामुळे प्रोग्रॅमिंग अधिक सोपे आणि अधिक
कार्यक्षम होते,
त्यामुळे तुम्हाला तुमच्या फंक्शनच्या पायऱ्या
पुन्हा पुन्हा लिहाव्या लागत नाहीत.
तुम्ही त्या फक्त एकदाच लिहू शकता!