Return to Video

काही आयुष्यांत बदल घडवताना मला तंत्रज्ञानाची मदत कशी झाली. | प्रशांत गडे | TEDxNMIMSShirpur

  • 0:09 - 0:10
    माझं नाव प्रशांत.
  • 0:10 - 0:14
    सुरुवात करण्यापूर्वी
    मी तुम्हांला एक प्रश्न विचारणार आहे.
  • 0:14 - 0:17
    अस्वस्थ करणारी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती
  • 0:17 - 0:19
    तुम्हांला दिसते, तेव्हा तुम्ही काय करता?
  • 0:19 - 0:22
    दुर्दैवी जीवन जगणारी कोणी व्यक्ती भेटली,
  • 0:22 - 0:26
    किंवा सोशल मीडियावर तिच्याबद्दल वाचलं,
  • 0:26 - 0:30
    तर मला वाटतं, आपल्यातले बहुतेक लोक
    या दोन गोष्टींपैकी एक करतील:
  • 0:30 - 0:32
    एक म्हणजे, आपण पैसे दान करू.
  • 0:32 - 0:34
    यामुळे त्या व्यक्तीला
    दिवसभराचं अन्न मिळू शकेल.
  • 0:34 - 0:38
    किंवा सोशल मीडियावर वाचत असलो,
  • 0:38 - 0:40
    तर आपण ते न वाचता पुढे जाऊ,
    कारण ते फार वाईट असतं.
  • 0:40 - 0:42
    त्याकडे पाहावंसं वाटत नाही.
  • 0:42 - 0:44
    दोन वर्षांपूर्वी
  • 0:44 - 0:47
    माझ्या आयुष्यात असंच घडलं.
    त्यामुळे अखेरीस माझं आयुष्य बदलून गेलं.
  • 0:48 - 0:49
    तर अशी आहे माझी कहाणी:
  • 0:49 - 0:56
    मला वाटतं, भारतात ९०% अभियंत्यांचं आयुष्य
    अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरु होतं.
  • 0:56 - 0:58
    माझ्या बाबतीत तसंच घडलं.
  • 0:58 - 1:02
    लहानपणापासून मला एकाच गोष्टीची
    खरीखुरी आवड होती.
  • 1:02 - 1:04
    एखाद्या वस्तूचं कार्य कसं चालतं?
  • 1:04 - 1:05
    यामुळे मी खेळणी उघडून पाही.
  • 1:06 - 1:07
    आणि माझ्या पालकांना वाटे,
  • 1:07 - 1:09
    [हिंदी] आपला मुलगा अभियंता होणार.
  • 1:12 - 1:16
    मग मी मोठी आशा बाळगून
    अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
  • 1:16 - 1:19
    मला नवं ज्ञान मिळवण्याची,
    नव्या व्यक्तींना भेटण्याची उत्सुकता होती.
  • 1:19 - 1:21
    पण खरं अभियांत्रिकी जग
  • 1:21 - 1:23
    माझ्या कल्पनेपेक्षा फार निराळं होतं.
  • 1:23 - 1:28
    कारण मला नवं काही शोधण्याची, शिकण्याची,
    किंवा निर्माण करण्याची मुभा नव्हती.
  • 1:28 - 1:30
    यामुळे हळूहळू मी निराश झालो.
  • 1:30 - 1:33
    तिथे मी एकच गोष्ट करावी अशी अपेक्षा होती.
  • 1:33 - 1:39
    ४० गुण मिळवणं, परीक्षा उत्तीर्ण होणं,
    नोकरी धरणं. झालं, संपलं आयुष्य.
  • 1:39 - 1:42
    (टाळ्या)
  • 1:42 - 1:46
    पण मला मेंढीसारखं त्याच त्या
    कळपामागून फिरायचं नव्हतं.
  • 1:47 - 1:49
    त्यामुळे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात
  • 1:49 - 1:53
    मी ठरवलं, शिक्षण सोडावं
    आणि आवडेल तेच करावं.
  • 1:53 - 1:55
    मी एक प्रयोगशाळा सुरु केली.
  • 1:55 - 1:57
    द क्युरिऑसिटी लॅब.
  • 1:57 - 2:00
    तिथे मी वरिष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थांना
    शिकवत होतो,
  • 2:00 - 2:01
    स्वयंचलित यंत्रे कशी बनवावी.
  • 2:02 - 2:04
    पण एका वर्षातच माझ्या लक्षात आलं, की
  • 2:04 - 2:09
    शिक्षण अर्धवट सोडणारे
    सगळेच यशस्वी होत नाहीत.
  • 2:10 - 2:12
    कसंही करून मला शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे.
  • 2:12 - 2:15
    मग शिक्षण पूर्ण झालं. एक अध्याय संपला.
  • 2:15 - 2:18
    आता फार हुरळून जाऊ नकोस,
    नोकरीसाठी धडपड करायला हवी.
  • 2:18 - 2:22
    इतरांप्रमाणे माझ्याही पालकांची इच्छा होती,
    की मी नोकरी शोधायला सुरुवात करावी.
  • 2:22 - 2:25
    पण दुसऱ्या कोणाची नोकरी करण्याची
    मला खरोखरच आवड नव्हती.
  • 2:25 - 2:28
    म्हणून मी माझ्या पालकांना
    फोन करून सांगितलं,
  • 2:28 - 2:31
    "यापेक्षा पूर्वीसारखं त्या प्रयोगशाळेत
    काम करायला मला आवडेल."
  • 2:31 - 2:33
    माझे पालक म्हणाले,
    "ठीक आहे. जा, करून पहा."
  • 2:34 - 2:37
    एक महिनाभर सगळं सुरळीत चाललं.
  • 2:37 - 2:38
    पण एका महिन्यानंतर
  • 2:38 - 2:41
    मला वाटू लागलं, की
    हे करण्यासाठी माझा जन्म झालेला नाही.
  • 2:41 - 2:45
    हे माझ्या आयुष्याचं ध्येय नव्हे.
    इतरांना शिकवण्यासाठी मी जन्मलेलो नाही.
  • 2:45 - 2:47
    मग पुन्हा मी माझ्या पालकांना फोन केला,
  • 2:47 - 2:49
    आणि त्यांना सांगितलं,
  • 2:49 - 2:51
    "या शिकवण्याच्या कामातून
    मला समाधान मिळत नाही.
  • 2:51 - 2:53
    मी हे काम सोडून देतो."
  • 2:53 - 2:54
    माझे पालक म्हणाले,
  • 2:54 - 2:58
    "ठीक आहे. मग तू पुण्याला तुझ्या भावाकडे जा
  • 2:58 - 2:59
    आणि नोकरी शोधायला सुरुवात कर."
  • 2:59 - 3:04
    तरीही माझ्या डोक्यात अगदी पक्कं होतं, की
    मला नोकरी करायची नाही.
  • 3:04 - 3:05
    पण मी ठरवलं,
  • 3:06 - 3:08
    "ठीक आहे. आपण निदान भावाकडे तरी जावं."
  • 3:08 - 3:11
    माझा भाऊ मला जावा आणि
    बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास शिकवत असे.
  • 3:11 - 3:13
    मुलाखती यशस्वी व्हाव्या म्हणून.
  • 3:13 - 3:17
    पण मी पार वैतागून गेलो होतो.
    मला पळून जावंसं वाटत असे.
  • 3:19 - 3:22
    त्याच वेळी मी फेसबुकवर एक पोस्ट पाहिली.
  • 3:22 - 3:26
    एका फॅब लॅब ला एक
    इलेक्ट्रॉनिक अभियंता हवा होता.
  • 3:26 - 3:28
    रोबॉटिक्सचा मूलभूत अनुभव गरजेचा होता.
  • 3:28 - 3:33
    मला यात एक संधी दिसली.
    वाटलं, "अर्ज करायला काय हरकत आहे?"
  • 3:33 - 3:36
    डोळे झाकून मी या नोकरीसाठी अर्ज केला.
  • 3:37 - 3:38
    मुलाखत चांगली झाली.
  • 3:38 - 3:41
    ते म्हणाले, "आम्ही तुला नोकरी देऊ.
  • 3:41 - 3:44
    पण आम्ही महिन्याला फक्त
    पाच हजार पगार देऊ शकतो."
  • 3:44 - 3:48
    मी विचार केला,
    "पैशाच्या मागे धावण्यापेक्षा
  • 3:48 - 3:49
    आपल्याला आवडतं ते करणं चांगलं."
  • 3:49 - 3:51
    म्हणून मी ती नोकरी स्वीकारली.
  • 3:52 - 3:55
    चला, नोकरी मिळाली.
  • 3:55 - 3:56
    दुसरा अध्याय संपला.
  • 3:56 - 4:00
    मला वाटतं, प्रत्येकाच्या आयुष्यात
    दोन दिवस महत्त्वाचे असतात.
  • 4:01 - 4:05
    पहिला, आपला जन्मदिवस. आणि दुसरा,
    ज्या दिवशी आपल्याला जगण्याचं कारण सापडतं.
  • 4:06 - 4:09
    मला माझ्या जगण्याचं कारण सापडलं.
  • 4:09 - 4:11
    फॅब लॅब मध्ये असताना
  • 4:11 - 4:16
    मला फॅब अकॅडमीबद्दल
    जाणून घेण्याची संधी मिळाली.
  • 4:16 - 4:18
    हा एक दूरशिक्षण अभ्यासक्रम आहे.
  • 4:18 - 4:21
    अमेरिकेतील एम आय टी च्या सेंटर फॉर
    बिट्स अँड अॅटम्स द्वारे हा चालवला जातो.
  • 4:22 - 4:25
    मला वाटलं, हा अभ्यासक्रम आपण करावा.
    म्हणून मी त्यात प्रवेश घेतला.
  • 4:25 - 4:29
    या अभ्यासक्रमात एक
    अंतिम प्रकल्प करणं गरजेचं होतं.
  • 4:29 - 4:33
    उत्तीर्ण होण्यासाठी हा प्रकल्प
    सहा महिन्यांत पूर्ण करायचा होता.
  • 4:33 - 4:34
    त्यासाठी मी विषय शोधत होतो.
  • 4:34 - 4:38
    एखादा खरोखर विलक्षण आणि छान विषय.
  • 4:38 - 4:41
    त्यावेळी मला निकोलसच्या भेटीची संधी लाभली.
  • 4:42 - 4:43
    तो फ्रान्सचा आहे.
  • 4:43 - 4:46
    एका अपघातात त्याने उजवा हात गमावला.
  • 4:46 - 4:49
    पण रडत बसण्यापेक्षा, त्याने स्वतःसाठी
    एक यांत्रिक हात बनवला.
  • 4:49 - 4:51
    हे पाहून मला प्रेरणा मिळाली.
  • 4:51 - 4:54
    मला वाटलं, "अंतिम प्रकल्पासाठी
    हा विषय का घेऊ नये?"
  • 4:54 - 4:59
    मग मी ठरवलं, ठीक आहे.
    याच विषयावर अंतिम प्रकल्प करायचा.
  • 5:00 - 5:01
    मी माझा पहिला नमुना बनवला.
  • 5:01 - 5:04
    त्यावेळी माझ्यासाठी हा फक्त प्रकल्प होता.
  • 5:04 - 5:06
    त्याहून जास्त काही नाही.
  • 5:06 - 5:08
    मग मी पहिला नमुना बनवला
  • 5:08 - 5:11
    आणि काही खऱ्या रुग्णांवर
    त्याची चाचणी घेतली.
  • 5:12 - 5:14
    सर्व काही ठीक चाललं होतं.
    पण अगदी त्याच सुमारास
  • 5:14 - 5:16
    मला एक मुलगी भेटली, श्रेया.
  • 5:16 - 5:19
    सात वर्षांच्या या मुलीला हात नव्हते.
  • 5:19 - 5:22
    ही गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली.
  • 5:23 - 5:26
    तिला भेटल्यावर मला वाटलं,
  • 5:26 - 5:30
    "हिच्या वाट्याला असं आयुष्य का आलं असेल?"
  • 5:30 - 5:34
    माझी झोप उडाली. मला वाटलं,
    "आपण हिच्यासाठी काही उपाय का शोधू नये?"
  • 5:34 - 5:37
    त्या रात्री मी गूगलवर शोध घेतला.
  • 5:37 - 5:40
    त्यातून सापडलेली माहिती
    फार धक्कादायक होती.
  • 5:40 - 5:43
    मला वाटलं, आपण तिच्यासाठी
    एखादा कृत्रिम हात शोधू.
  • 5:43 - 5:45
    आणि मला आढळलं, की
  • 5:45 - 5:48
    एका कृत्रिम हाताची किंमत
    दहा हजार अमेरिकन डॉलर्स आहे.
  • 5:49 - 5:52
    इथे बसलेल्यांपैकी ९९ टक्के
    लोकांना ती परवडणार नाही.
  • 5:52 - 5:56
    मग मी या विषयावर जास्त माहिती शोधू लागलो.
  • 5:56 - 5:59
    आणि मला आढळलं, की
  • 5:59 - 6:00
    फक्त भारताचा विचार करता,
  • 6:00 - 6:04
    दर दहाव्या मिनिटाला
    एक अवयव काढून टाकला जातो.
  • 6:04 - 6:08
    दरवर्षी ४५,००० हून जास्त लोकांचे
    अवयव काढावे लागतात.
  • 6:08 - 6:12
    त्यापैकी ८५ टक्क्यांहून जास्त लोक
    निरुपायाने तसेच जगतात.
  • 6:12 - 6:14
    यामागचं कारण काय?
  • 6:14 - 6:17
    त्यांना कृत्रिम अवयव परवडत नाहीत.
  • 6:18 - 6:19
    मग मी ठरवलं,
  • 6:19 - 6:23
    देवाने मला हे जगण्याचं कारण दिलं आहे.
    मला त्या हाकेला उत्तर दिलं पाहिजे.
  • 6:23 - 6:28
    मी माझी नोकरी सोडली,
    आणि तो अभ्यासक्रमही सोडला.
  • 6:29 - 6:30
    पुन्हा एकदा वेळ आली होती,
  • 6:30 - 6:33
    मी काही सोडतो आहे असं सांगून
    पालकांना धक्का देण्याची.
  • 6:33 - 6:36
    मी माझ्या पालकांना फोन केला
    आणि त्यांना सांगितलं,
  • 6:36 - 6:39
    "मी ही नोकरी सोडतो आहे.
    हा अभ्यासक्रम सोडतो आहे."
  • 6:40 - 6:42
    पण यावेळी माझे पालक फार रागावले.
  • 6:42 - 6:46
    ते मला माझं आयुष्य
    असं वाया घालवू देणार नव्हते,
  • 6:46 - 6:48
    काहीतरी समाजकार्य वगैरेसाठी.
  • 6:48 - 6:50
    ते म्हणाले,
  • 6:50 - 6:52
    "हे काही समाजाची जबाबदारी
    उचलण्याचं वय नव्हे.
  • 6:52 - 6:55
    आधी तुला स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे."
  • 6:55 - 6:57
    पण मला वाटायचं,
  • 6:57 - 7:00
    "मला माझं स्वप्न पुरं केलं पाहिजे.
    ते ध्येय माझ्यापेक्षा मोठं आहे."
  • 7:00 - 7:03
    माझ्या पालकांना मात्र वाटायचं,
    "नोकरी करावी."
  • 7:04 - 7:06
    यापेक्षा दुसरं काही त्यांना ठाऊक नव्हतं.
  • 7:06 - 7:12
    पण माझ्या स्वप्नाकडे पाठ फिरवणं
    मला खरोखर कठीण वाटत होतं.
  • 7:13 - 7:17
    मग माझ्या पालकांनी मला
    एक अभ्यासक्रम सुरु करायला सांगितलं.
  • 7:17 - 7:19
    डिप्लोमा इन ऍडव्हान्सड कॉम्प्युटिंग.
  • 7:19 - 7:24
    ज्याद्वारे नोकरी मिळू शकते
    असा हा अभ्यासक्रम.
  • 7:25 - 7:30
    त्या अकादमीत जाण्याच्या आदल्या दिवशी
    मी माझ्या आईसमोर रडलो.
  • 7:30 - 7:32
    आणि तिला म्हणालो, "मी हे करू शकणार नाही.
  • 7:32 - 7:37
    हे माझं काम नव्हे.
    मला हे करायला लावू नका."
  • 7:37 - 7:39
    माझी आई म्हणाली,
  • 7:39 - 7:42
    "तुझ्यासमोर दुसरा काही पर्याय नाही.
    तुला जावंच लागेल."
  • 7:42 - 7:45
    आम्ही अभियंते.. फार चतुर असतो.
  • 7:45 - 7:46
    तर मी काय केलं,
  • 7:48 - 7:51
    मी अकादमीत दाखल झालो,
    पण एकाही वर्गाला हजर राहिलो नाही.
  • 7:51 - 7:54
    सकाळी मी बायोमेट्रिक हजेरी देत असे,
  • 7:54 - 7:56
    आणि पुन्हा संध्याकाळी जाऊनही देत असे.
  • 7:56 - 7:59
    मधल्या वेळेत मी होस्टेलवर परत जात असे.
  • 7:59 - 8:04
    आणि माझ्याजवळ साठलेले पैसे वापरून मी
    माझ्या खोलीत कृत्रिम हातावर काम करत असे.
  • 8:04 - 8:08
    पंधरा दिवसांत मी एक आराखडा तयार केला.
  • 8:08 - 8:09
    मग मी काय केलं --
  • 8:10 - 8:14
    मला अधिक चांगलं काम करण्याकरता
    अधिक पैशांची गरज होती --
  • 8:14 - 8:17
    म्हणून मी काय केलं --
  • 8:17 - 8:20
    निधी गोळा करण्यासाठी
    इंडिगोगो साईटवर एक मोहीम सुरु केली.
  • 8:22 - 8:25
    पण ती मोहीम यशस्वी झाली नाही.
    मला फारसे पैसे मिळाले नाहीत.
  • 8:26 - 8:27
    पण एक चांगली गोष्ट घडली.
  • 8:27 - 8:31
    जयपूर फूट चे तंत्रज्ञान प्रमुख
  • 8:31 - 8:34
    श्री. दीपेंद्र मेहता यांनी
    ती मोहीम पाहिली.
  • 8:34 - 8:36
    आणि त्यांनी मला फोन करून विचारलं,
  • 8:36 - 8:41
    "तू जयपूरला येऊन
    तुझा आराखडा आम्हांला दाखवशील का?"
  • 8:41 - 8:45
    पालकांनासुद्धा न कळवता
  • 8:45 - 8:47
    मी तडक जयपूरला गेलो.
  • 8:47 - 8:51
    जयपूर फूट बद्दल थोडक्यात सांगायचं तर,
  • 8:52 - 8:55
    कृत्रिम अवयव बनवून ते विनामूल्य देणारी
  • 8:55 - 8:56
    ही जगातली सर्वात मोठी संस्था.
  • 8:56 - 8:59
    मला त्यांनी तिथे बोलावलं.
    आणि सुमारे तासाभराच्या बैठकीनंतर
  • 8:59 - 9:02
    सात निरनिराळ्या प्रकारचे कृत्रिम
    हात बनवण्यासाठी अनुदान दिलं.
  • 9:03 - 9:05
    मला हेच हवं होतं.
  • 9:05 - 9:08
    मला हवी असलेली मदत आता मला मिळाली होती.
  • 9:08 - 9:12
    आता पुन्हा वेळ आली होती
    पालकांना फोन करून सांगण्याची, की
  • 9:12 - 9:15
    "पुन्हा मी काहीतरी सोडून देतो आहे.
    पुन्हा एक अभ्यासक्रम सोडतो आहे."
  • 9:16 - 9:20
    हे मला फार कठीण वाटत होतं.
    कारण आता पुन्हा जर मी म्हणालो असतो,
  • 9:20 - 9:21
    की मी अभ्यासक्रम सोडणार आहे,
  • 9:21 - 9:26
    तर यावेळी माझे पालक भयंकर संतापले असते.
  • 9:26 - 9:29
    आता काय करावं,
    हा निर्णय घेण्याची वेळ आली होती.
  • 9:29 - 9:34
    त्यावेळी मी काय केलं,
    सरळ माझ्या पालकांना फोन केला,
  • 9:34 - 9:36
    आणि म्हणालो,
    "मी तो अभ्यासक्रम सोडणार आहे.
  • 9:36 - 9:39
    कारण मला वाटतं की
    हे माझ्या जगण्याचं कारण आहे.
  • 9:39 - 9:41
    मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे."
  • 9:42 - 9:44
    जयपूर फूट कडून मिळालेल्या चेकचा
  • 9:44 - 9:47
    एक फोटो काढून तो मी
  • 9:47 - 9:48
    माझ्या पालकांना पाठवला.
  • 9:48 - 9:51
    त्यानंतर आलेल्या फोनवर माझे पालक म्हणाले,
  • 9:51 - 9:55
    "आता यापुढे तुझ्या आयुष्यात जे घडेल,
    त्याला तूच जबाबदार असशील.
  • 9:55 - 9:58
    यापुढे आम्ही कसलीच जबाबदारी घेणार नाही."
  • 9:58 - 10:01
    त्या दिवशी मी ठरवलं,
    "आता एखादं साधन निर्माण करून
  • 10:01 - 10:04
    स्वतःला सिद्ध करून दाखवेपर्यंत
    मी मागे वळून पाहणार नाही."
  • 10:04 - 10:08
    मग मी माझं सामान भरलं, जयपूरला गेलो,
    आणि काम सुरु केलं.
  • 10:08 - 10:10
    कृत्रिम हात बनवू लागलो.
  • 10:11 - 10:16
    याविषयी थोडक्यात सांगतो.
  • 10:16 - 10:19
    कृत्रिम अवयवांची, खासकरून हातांची किंमत
  • 10:19 - 10:21
    दहा हजार अमेरिकन डॉलर्स एवढी असते.
  • 10:21 - 10:26
    आणि रुपयांत बोलायचं तर,
    भारतात ही किंमत १२ लाखांपासून सुरू होते.
  • 10:26 - 10:32
    मी एक कृत्रिम हात बनवला.
    त्याची किंमत एक लाख रुपयांपर्यंत होती.
  • 10:32 - 10:36
    मग मी जयपूर फूटच्या प्रमुखांना भेटलो,
  • 10:36 - 10:38
    आणि म्हणालो, "मी एक लाख रुपयांचा
    हात बनवला आहे."
  • 10:38 - 10:40
    ते म्हणाले, "आम्हांला परवडत नाही."
  • 10:40 - 10:43
    मग मी पन्नास हजारांत बनवला.
    ते म्हणाले, "परवडत नाही."
  • 10:43 - 10:45
    मग मी तीस हजारांत बनवला.
    ते म्हणाले, "परवडत नाही."
  • 10:46 - 10:48
    मी विचारलं, "तुम्हांला किती किंमत परवडेल?"
  • 10:48 - 10:50
    ते म्हणाले, "शंभर डॉलर्समध्ये करू शकशील?"
  • 10:51 - 10:52
    हे खरोखर धक्कादायक होतं.
  • 10:52 - 10:54
    दहा हजार डॉलर्स किमतीचा हात
  • 10:54 - 10:56
    कोणी शंभर डॉलर्समध्ये कसा बनवू शकेल?
  • 10:56 - 10:59
    पण मला ठाऊक होतं, की
    मी मागचे दोर कापून टाकले होते.
  • 10:59 - 11:02
    मी माझ्या पालकांकडे जाऊन
    "मी हरलो" असं सांगू शकणार नव्हतो.
  • 11:03 - 11:08
    मग मी ते आव्हान स्वीकारलं,
    आणि काम पुढे सुरु केलं.
  • 11:08 - 11:11
    मी माझ्यातला अभियंता बाहेर ठेवून,
    ते ज्ञान नसणाऱ्या
  • 11:11 - 11:13
    एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे विचार केला.
  • 11:13 - 11:16
    ज्याला इतकंच ठाऊक असतं, की
    आपल्याला काहीतरी बनवायचं आहे.
  • 11:16 - 11:18
    मग मी काय केलं,
  • 11:18 - 11:22
    स्वतःच सर्किटची रचना केली,
    आणि सर्व जुळणी केली.
  • 11:22 - 11:23
    त्रिमित छपाईतंत्र वापरलं.
  • 11:23 - 11:25
    आणि मी हा हात तयार केला.
  • 11:26 - 11:28
    असं चालतं याचं कार्य.
  • 11:30 - 11:32
    आणि मी जर तुम्हांला विचारलं,
    "याची किंमत किती?"
  • 11:33 - 11:34
    उत्तर आहे, पंचाहत्तर डॉलर्स.
  • 11:36 - 11:37
    (टाळ्या)
  • 11:37 - 11:42
    मी ती किंमत दहा हजारांपासून
    ७५ डॉलर्सवर आणली.
  • 11:42 - 11:46
    पण माझ्यापुढे आणखी एक मोठी समस्या होती.
  • 11:46 - 11:47
    माझे पैसे संपत आले होते.
  • 11:47 - 11:48
    जयपूर फूट ने सांगितलं, की
  • 11:48 - 11:53
    आम्ही प्रत्येक रुग्णामागे
    एका हाताचे ७५ डॉलर्स देऊ शकतो,
  • 11:53 - 11:54
    पण त्याहून जास्त पैसे नाहीत.
  • 11:54 - 11:58
    म्हणजे मला यंत्रं बसवण्यासाठी निधी नव्हता.
  • 11:58 - 12:00
    मग मी हे हात कसे बनवणार होतो?
  • 12:00 - 12:01
    ही मोठीच समस्या होती.
  • 12:01 - 12:05
    त्या सहा महिन्यांत
    माझ्याजवळ अन्नासाठी पैसे नव्हते.
  • 12:05 - 12:07
    जयपूर फूट ने दिलेल्या निधीतूनच
  • 12:07 - 12:10
    मी माझा खर्च भागवत होतो.
  • 12:10 - 12:12
    आता काय करायचं?
  • 12:12 - 12:14
    शेवटच्या महिन्यात
  • 12:14 - 12:19
    माझ्याजवळ दिवसातून फक्त
    एकदा जेवता येईल इतकेच पैसे उरले.
  • 12:19 - 12:23
    कारण दोनदा जेवलो असतो,
    तर घराचं भाडं भरता आलं नसतं.
  • 12:23 - 12:28
    मी दिवसातून फक्त एकदाच जेवत असे.
    परिस्थिती कठीण होत चालली होती.
  • 12:28 - 12:31
    पण मग काहीतरी घडलं. काहीतरी चांगलं घडलं.
  • 12:31 - 12:34
    मी त्या सगळ्या चित्रफिती यूटयूबवर घातल्या,
  • 12:35 - 12:39
    आणि अचानक, अमेरिकेतल्या
    एका प्राध्यापकांनी त्या पाहिल्या.
  • 12:39 - 12:42
    त्यांनी मला फोन करून विचारलं,
    "बायोमेडिकल साधनांबद्दलच्या
  • 12:42 - 12:45
    एका परिषदेसाठी अमेरिकेला येशील का?"
  • 12:45 - 12:48
    यावर कोणी "नाही" म्हणेल का?
    मी लगेच "हो" म्हणालो.
  • 12:48 - 12:51
    माझ्या भारत ते अमेरिका प्रवासाचा
    पूर्ण खर्च त्यांनी उचलला.
  • 12:51 - 12:52
    मी तिथे गेलो.
  • 12:52 - 12:58
    कृत्रिम अवयव आणि मी विकसित केलेलं
    तंत्रज्ञान याबद्दल मी एक व्याख्यान दिलं.
  • 12:59 - 13:02
    व्याख्यानानंतर ते काही देणगीदारांसह
    मला भेटायला आले.
  • 13:02 - 13:05
    त्यांनी मला विचारलं, "आम्ही तुला
    कशा प्रकारे मदत करू शकतो?"
  • 13:06 - 13:10
    मग माझी गरज मी त्यांना सांगितली.
  • 13:10 - 13:13
    मला काही साधनसामुग्री हवी होती.
  • 13:13 - 13:18
    मग त्यांनी आपापसात काही वेळ विचार केला,
    आणि ते पुन्हा माझ्याकडे येऊन म्हणाले,
  • 13:18 - 13:20
    "तुला यंत्रं हवी आहेत ना?"
  • 13:20 - 13:22
    मी म्हणालो, "हो."
  • 13:22 - 13:23
    ते म्हणाले,
  • 13:23 - 13:26
    "तू आता भारतात परत जाशील,
    तेव्हा एकटा जाणार नाहीस.
  • 13:26 - 13:29
    आम्ही तुला त्रिमित छपाईची
    दहा यंत्रं देणार आहोत.
  • 13:29 - 13:30
    अगदी विनामूल्य."
  • 13:31 - 13:32
    मी अक्षरशः रडलो.
  • 13:32 - 13:35
    (टाळ्या)
  • 13:35 - 13:38
    त्या वेळी मला रडू आलं,
    कारण देवाने मला पैसे दिले नाहीत,
  • 13:38 - 13:40
    पण चांगली माणसं दिली,
    आणि त्यांनी मला मदत केली.
  • 13:41 - 13:42
    मग मी भारतात परत आलो,
  • 13:43 - 13:47
    आणि इनाली फाउंडेशन नावाची
    संस्था सुरू केली.
  • 13:47 - 13:49
    इनाली म्हणजे नव्या बदलाची सुरूवात.
  • 13:49 - 13:54
    आणि इनाली हे एका सुंदर मुलीचं नाव आहे.
    ती मला चार वर्षांपूर्वी भेटली,
  • 13:54 - 13:56
    आणि तिला माझ्यातला चांगुलपणा दिसला.
  • 13:56 - 13:59
    ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
    मी देवाचे आभार मानतो.
  • 13:59 - 14:02
    ही संस्था सुरु केल्यापासून
  • 14:02 - 14:05
    मी तीनशेवर लोकांना मदत केली आहे.
  • 14:05 - 14:06
    तीही विनामूल्य.
  • 14:07 - 14:10
    (टाळ्या)
  • 14:10 - 14:14
    आमच्या संस्थेचं काम असं चालतं:
    आम्हांला जयपूर फूट कडून अनुदान मिळालं.
  • 14:14 - 14:17
    आम्ही लोकांना सांगतो, "तुमचा वाढदिवस असेल
  • 14:17 - 14:21
    आणि तुम्हाला भेट घेण्यापेक्षा
    भेट देण्याची इच्छा असेल,
  • 14:21 - 14:24
    तर आमच्याशी संपर्क साधा,
    आणि एखाद्या गरजू व्यक्तीला
  • 14:24 - 14:26
    कृत्रिम हाताची भेट पाठवा."
  • 14:26 - 14:30
    आता मी एक चित्रफीत दाखवणार आहे.
  • 14:30 - 14:31
    (चित्रफीत सुरु होते.)
  • 14:31 - 14:33
    (संगीत)
  • 14:33 - 14:37
    [त्रिमित छपाईने निर्माण केलेला हा हात
    केवळ २० तासांत तयार झाला.]
  • 15:06 - 15:10
    [याची किंमत १०० डॉलर्सपेक्षा कमी आहे.]
  • 15:14 - 15:18
    [अशा प्रकारच्या इतर उत्पादनांपेक्षा
    ती पन्नास पटीने कमी आहे.]
  • 15:22 - 15:26
    [त्रिमित छपाईच्या तंत्रज्ञानाच्या
    मदतीमुळे हे शक्य झालं.]
  • 15:41 - 15:45
    [इनाली फाउंडेशनने
    या साधनाची निर्मिती केली आहे.]
  • 16:22 - 16:26
    [हा हात आता उपलब्ध आहे. या प्रकल्पाला
    BMVSS (जयपूर फूट)चे सहाय्य मिळालेआहे.]
  • 17:17 - 17:18
    (चित्रफीत संपते.)
Title:
काही आयुष्यांत बदल घडवताना मला तंत्रज्ञानाची मदत कशी झाली. | प्रशांत गडे | TEDxNMIMSShirpur
Description:

जगभरात अपंग व्यक्तींची संख्या दहा दशलक्षांहून अधिक आहे. त्यांच्याजवळ या अवस्थेवर उपाय नाही, कारण त्यांना तो परवडत नाही. त्यांच्या गरजेनुसार योग्य ते कृत्रिम अवयव पुरवून त्यांना मदत करणे अशी ही कल्पना आहे.

प्रशांत गडे हा एक २५ वर्षीय तरुण उद्योजक आणि अन्वेषक आहे. त्याच्या वयाच्या २२व्या वर्षी त्याला दोन्ही हात गमावलेली एक व्यक्ती भेटली, आणि या घटनेने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. प्रशांतने आपली नोकरी सोडली, आणि स्वस्त किमतीत कृत्रिम हात निर्माण करण्याकडे आपलं पूर्ण लक्ष गुंतवलं. आज कृत्रिम हाताची किंमत दहा हजार अमेरिकन डॉलर्स आहे. पण जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या बळावर प्रशांतने १०० डॉलर्सपेक्षा कमी किमतीत एक कृत्रिम हात निर्माण केला.

This talk was given at a TEDx event using the TED conference format but independently organized by a local community. Learn more at https://www.ted.com/tedx

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
17:29

Marathi subtitles

Revisions