0:00:16.264,0:00:19.569 असं समजा, की तुम्ही समारंभाला जाण्यासाठी [br]तयारी करत आहात. 0:00:19.799,0:00:22.923 तुम्हाला उत्साह वाटतो आहे, [br]तशीच थोडीशी चिंताही वाटते आहे. 0:00:22.924,0:00:25.476 पोटात गोळा आला आहे धाकधूक वाटते आहे. 0:00:25.477,0:00:27.845 हृदयाच्या धडधडीसारखी. 0:00:28.860,0:00:34.030 तुमचं मन तुम्हांला मागे खेचतं आहे. 0:00:34.656,0:00:36.494 "थांब. इतका आनंद वाटू देऊ नकोस. 0:00:36.495,0:00:41.562 जरा सावध रहा, काहीतरी विपरीत घडू शकतं." 0:00:41.938,0:00:46.168 तुम्हांला प्रश्न पडतो, [br]"समारंभात मी कोणाशी बोलू? 0:00:46.169,0:00:52.078 माझ्याशी कोणी बोललं नाही तर? [br]लोक मला विक्षिप्त समजले तर?" 0:00:53.464,0:00:55.062 तुम्ही समारंभात पोहोचता. 0:00:55.063,0:00:58.533 कोणीतरी तुमच्याजवळ येतं [br]आणि तुमच्याशी बोलू लागतं. 0:00:58.534,0:01:00.232 आणि त्याचवेळी 0:01:00.233,0:01:04.917 तुमचं मन सैरभैर होतं. [br]हृदयाचे ठोके वाढतात. 0:01:05.429,0:01:06.798 तुम्हांला घाम फुटतो. 0:01:06.799,0:01:10.781 आपण स्वतःपासून विलग झालो आहोत, [br]असं वाटू लागतं. 0:01:10.782,0:01:15.479 जणु तुम्ही तुमच्या शरीरात नसून, [br]बाहेरून स्वतःलाच बोलताना पाहत आहात. 0:01:16.499,0:01:20.611 "भानावर ये." तुम्ही स्वतःला सांगता, [br]पण तसं करू शकत नाही. 0:01:20.612,0:01:23.171 चिंतेची तीव्रता वाढत जाते. 0:01:24.171,0:01:26.076 काही क्षण बोलून झाल्यावर 0:01:26.077,0:01:28.838 ती व्यक्ती निघून जाते. 0:01:28.839,0:01:31.735 आता तुम्हांला पूर्णपणे [br]पराभव झाल्यासारखं वाटू लागतं. 0:01:33.344,0:01:38.696 बऱ्याच काळापासून, समाजात मिसळताना [br]तुम्हाला असेच अनुभव येताहेत. 0:01:39.051,0:01:43.074 किंवा कल्पना करा, की [br]आपण गर्दीच्या ठिकाणी आहोत. 0:01:43.075,0:01:46.470 तुम्हाला भीती वाटू लागते. 0:01:46.471,0:01:48.787 आजूबाजूला पुष्कळ लोक असणाऱ्या ठिकाणी, 0:01:48.788,0:01:53.800 उदाहरणार्थ, बसमध्ये [br]तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. 0:01:54.769,0:01:56.932 ते टाळण्यासाठी तुम्ही[br]बाहेर जाणं टाळता. 0:01:56.933,0:02:02.951 मग त्यामुळे एकटेपणा जाणवतो. 0:02:03.816,0:02:08.122 या दोन्ही उदाहरणांतील व्यक्तींना 0:02:08.124,0:02:10.408 चिंताविकार जडला आहे. 0:02:10.949,0:02:14.583 आपल्या समजुतीपेक्षा कितीतरी जास्त लोकांना 0:02:14.584,0:02:17.473 चिंताविकार जडलेला असतो. 0:02:17.474,0:02:21.165 आजमितीला, जगात दर १४ व्यक्तींमागे 0:02:21.166,0:02:23.589 एका व्यक्तीला हा विकार आहे. 0:02:23.590,0:02:28.864 दरवर्षी, या विकारावरच्या उपचारांसाठी 0:02:28.865,0:02:32.844 ४२ दशकोटी डॉलर्सहूनही जास्त खर्च होतो. 0:02:32.845,0:02:36.097 चिंताविकारामुळे आयुष्यावर [br]काय परिणाम होऊ शकतात 0:02:36.098,0:02:37.378 ते सांगते.. 0:02:37.379,0:02:43.524 नैराश्य, शिक्षण सोडून देणे, [br]आत्महत्येचे विचार मनात येणे. 0:02:44.904,0:02:49.129 या विकारामुळे ध्येयाकडे वाटचाल करणं, [br]आणि नोकरी टिकवणं कठीण जातं. 0:02:49.619,0:02:52.589 नातेसंबंध तुटू शकतात. 0:02:52.989,0:02:55.023 हे अनेक लोकांना ठाऊक नसतं. 0:02:55.024,0:02:59.084 त्यामुळे ते हा विकार दडवून ठेवतात. 0:02:59.085,0:03:04.696 ही एक प्रकारची भीती आहे, आणि त्यावर [br]मात करणं शक्य आहे असं मानलं जातं. 0:03:05.146,0:03:07.385 पण या विकारात भीतीहूनही जास्त [br]असं काहीतरी असतं. 0:03:08.705,0:03:11.856 हा विकार फारसा महत्त्वाचा मानला जात नाही, 0:03:11.857,0:03:14.226 कारण त्याचं नेमकं स्वरूप [br]लोकांना ठाऊक नसतं. 0:03:14.227,0:03:21.227 हा स्वभावाचा भाग आहे का? आजार आहे का? [br]की नैसर्गिक भावना? काय आहे हे? 0:03:22.831,0:03:26.072 म्हणूनच, सर्वसाधारण चिंता आणि चिंताविकार 0:03:26.073,0:03:30.488 यातला फरक जाणणं महत्त्वाचं आहे. 0:03:32.277,0:03:35.571 सर्वसाधारण चिंता ही एक सामान्य भावना आहे. 0:03:35.572,0:03:38.035 तणावाच्या परिस्थितीत [br]अशी चिंता वाटणं साहजिक आहे. 0:03:38.036,0:03:41.688 उदाहरणार्थ, कल्पना करा, की [br]तुम्ही जंगलात आहात, 0:03:41.689,0:03:45.376 आणि तुमच्यासमोर एक अस्वल आलं. 0:03:46.650,0:03:50.184 यामुळे कदाचित तुम्हांला थोडी चिंता वाटेल. 0:03:50.185,0:03:53.668 तिथून पळून जावंसं वाटेल. 0:03:54.354,0:04:00.404 या प्रकारची चिंता वाटणं चांगलंच, [br]कारण त्यामुळे तुमचा जीव वाचेल. 0:04:00.405,0:04:03.886 तुम्ही ताबडतोब तिथून पळून जाल. 0:04:03.887,0:04:08.410 तसं पाहिलं तर अस्वल पाहून पळत सुटणं[br]ही काही तितकीशी चांगली कल्पना नाही. 0:04:08.650,0:04:11.249 अस्वलापेक्षा जलद कोणी पळू शकेल, [br]असं मला वाटत नाही. 0:04:13.592,0:04:16.935 नोकरीच्या ठिकाणी, [br]चिंतेमुळे आपण दिलेल्या मुदतीत कामं करतो, 0:04:16.935,0:04:19.841 आयुष्यात येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगांचा[br]सामना करतो. 0:04:19.841,0:04:24.287 पण कधीकधी ही चिंतेची भावना [br]पराकोटीला पोहोचते. 0:04:24.952,0:04:29.231 ज्या घटनांपासून खराखुरा धोका उद्भवत नाही, [br]त्याही वेळी ती निर्माण होते. 0:04:29.232,0:04:32.851 अशावेळी हा चिंताविकार असू शकतो. 0:04:32.852,0:04:36.481 उदाहरणार्थ, सार्वत्रिक चिंताविकार.[br](Generalized Anxiety Disorder) 0:04:36.482,0:04:41.871 या विकारात सतत सर्व गोष्टींबद्दल[br]पराकोटीची चिंता वाटते. 0:04:41.872,0:04:46.552 ही चिंता आटोक्यात ठेवणं कठीण जातं. 0:04:47.745,0:04:52.235 याबरोबर भीती, अस्वस्थता [br]अशी लक्षणंसुद्धा जाणवतात. 0:04:52.630,0:04:58.490 रात्री झोप लागत नाही. [br]कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. 0:04:59.595,0:05:05.974 चिंता, मग ती कोणत्याही प्रकारची असो, 0:05:05.975,0:05:09.734 तिची तीव्रता कमी करण्यासाठी [br]उपाय उपलब्ध आहेत. 0:05:09.735,0:05:13.715 ते उपयुक्त आहेत, [br]आणि अतिशय सोपे आहेत. 0:05:15.051,0:05:18.500 बरेचदा, मानसिक विकारांसाठी [br]औषधं दिली जातात. 0:05:18.501,0:05:21.020 पण ती दीर्घकाळ उपयोगी पडत नाहीत. 0:05:21.021,0:05:25.021 कालांतराने लक्षणं पुन्हा दिसू लागतात, [br]आणि विकार पुन्हा पहिल्या अवस्थेत जातो. 0:05:25.560,0:05:28.359 म्ह्णून हा एक वेगळा विचार [br]करून पाहण्यासारखा आहे. 0:05:28.360,0:05:33.249 आपण समस्यांना कशा प्रकारे तोंड देतो, 0:05:33.250,0:05:37.250 त्यावर आपल्या चिंतेचं प्रमाण [br]अवलंबून असतं. 0:05:37.473,0:05:43.383 समस्या हाताळण्याची पद्धत जराशी बदलली, [br]तर चिंतेचं प्रमाण कमी होऊ शकतं. 0:05:45.523,0:05:47.862 केम्ब्रिज विद्यापीठातल्या [br]आमच्या पाहणीनुसार, 0:05:47.863,0:05:51.032 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना [br]चिंताविकार होण्याची शक्यता 0:05:51.033,0:05:55.362 सधन वस्तीतल्या स्त्रियांपेक्षा [br]जास्त असते. 0:05:55.363,0:05:59.492 हा निष्कर्ष तसा धक्कादायक वाटला नाही. [br]पण सखोल अभ्यासातून निराळं काही जाणवलं. 0:05:59.493,0:06:02.542 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना 0:06:02.543,0:06:06.382 समस्या सोडवण्याची एक खास पद्धत ठाऊक असेल, 0:06:06.383,0:06:08.382 तर त्यांना चिंतेचा त्रास होत नाही. 0:06:08.383,0:06:13.842 पण ती पद्धत ठाऊक नसेल, तर त्यांना 0:06:13.843,0:06:15.153 चिंताविकार सतावतो. 0:06:16.078,0:06:17.477 इतर काही पाहण्यांनुसार, 0:06:17.478,0:06:21.137 ज्या लोकांना ही पद्धत ठाऊक होती, 0:06:21.138,0:06:25.267 त्यांचं मानसिक आरोग्य 0:06:25.268,0:06:27.927 युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या 0:06:27.928,0:06:31.838 खडतर परिस्थितीतसुद्धा उत्तम राहिलं. 0:06:32.093,0:06:36.822 पण ज्यांना ही पद्धत ठाऊक नव्हती, 0:06:36.823,0:06:41.483 त्यांना याच खडतर परिस्थितीमुळे [br]मानसिक विकार जडले. 0:06:42.979,0:06:47.878 तर मग, काय आहेत या [br]समस्या हाताळण्याच्या पद्धती? 0:06:47.879,0:06:52.229 त्यांचा वापर करून चिंताविकाराची तीव्रता [br]कमी कशी करता येईल? 0:06:53.275,0:06:55.294 त्याबद्दल सांगण्याअगोदर, 0:06:55.295,0:06:58.914 एक रोचक गोष्ट सांगते. [br] 0:06:58.915,0:07:05.915 या पद्धती तुम्ही स्वतःच तयार करू शकता. 0:07:05.955,0:07:08.355 तुमच्या स्वतःच्या वागण्यातून. 0:07:09.077,0:07:12.316 तुमच्या चिंताविकारावर ताबा मिळवून[br]त्याची तीव्रता कमी करू शकता. 0:07:12.317,0:07:14.877 स्वतःला सक्षम करणारी ही गोष्ट आहे. 0:07:17.015,0:07:20.604 आज मी अशा प्रकारच्या [br]तीन पद्धतींविषयी बोलणार आहे. 0:07:20.605,0:07:25.435 पहिली, आपल्या आयुष्यावर [br]आपलं नियंत्रण आहे, असे समजणे. 0:07:27.057,0:07:31.436 आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली आहे [br]असं समजणाऱ्या लोकांचं 0:07:31.437,0:07:33.477 मानसिक आरोग्य चांगलं असतं. 0:07:33.869,0:07:36.868 तसं तुम्हांला वाटत नसेल, तर 0:07:36.869,0:07:38.498 नियंत्रणात असलेल्या गोष्टी करून 0:07:38.499,0:07:42.669 तो अनुभव घ्यावा, [br]असं संशोधन सांगतं. 0:07:43.505,0:07:45.295 माझं म्हणणं स्पष्ट करून सांगते. 0:07:46.048,0:07:50.207 अजून पूर्ण तयारी झाली नाही, अशा समजुतीने 0:07:50.208,0:07:52.908 तुम्ही एखादं काम सुरु करणं [br]लांबणीवर टाकता का? 0:07:53.733,0:07:55.842 आज कोणते कपडे घालावेत?[br]कोणाबरोबर डेटला जावं? 0:07:55.843,0:08:01.693 कोणती नोकरी घ्यावी?[br]असे निर्णय तुम्हांला कठीण वाटतात का? 0:08:02.819,0:08:05.818 काय करावं हा निर्णय घेण्यात [br]तुमचा इतका वेळ वाया जातो, 0:08:05.819,0:08:09.819 की तुम्ही काहीच करू शकत नाही? 0:08:11.973,0:08:16.763 अनिर्णायक अवस्था, नियंत्रणाबाहेरची [br]परिस्थिती, यावर उपाय म्हणजे 0:08:16.979,0:08:19.139 ती गोष्ट चुकीची का होईना, पण करणे. 0:08:20.630,0:08:24.459 जी. के. चेस्टरटन हे एक कवी आणि लेखक आहेत. [br]ते म्हणतात, 0:08:24.460,0:08:30.760 जी गोष्ट करण्यासारखी असेल, ती पहिल्या वेळी[br]चुकीच्या पद्धतीने करायला हरकत नाही. 0:08:32.003,0:08:34.361 ही युक्ती चांगली लागू पडते, [br]कारण यामुळे 0:08:34.363,0:08:39.792 अनिर्णायक अवस्था संपते, आणि तुम्ही [br]कृतीच्या अवस्थेत ढकलले जाता. 0:08:39.793,0:08:42.472 नाहीतर काय करावं, कसं करावं, 0:08:42.472,0:08:45.932 या विचारात 0:08:45.933,0:08:47.693 तासनतास फुकट जाऊ शकतात, 0:08:48.091,0:08:53.221 तुमची शक्ती नष्ट होते, आणि [br]ते काम सुरु करण्याची भीती वाटू लागते. 0:08:54.492,0:08:59.331 बरेचदा, आपल्याला बिनचूक काम करायचं असतं. [br]पण आपण काहीच करू शकत नाही. 0:08:59.332,0:09:01.871 कारण आपण स्वतःसमोर [br]इतके उच्च आदर्श ठेवतो, की 0:09:01.872,0:09:05.051 त्यांचीच आपल्याला भीती वाटते. 0:09:05.052,0:09:09.051 या तणावामुळे आपण काम पुढे ढकलत राहतो, 0:09:09.052,0:09:13.052 किंवा करतच नाही. 0:09:14.716,0:09:17.786 चुकीच्या पद्धतीने करण्याची मुभा मिळाल्यावर[br]कृती मोकळेपणाने घडते. 0:09:18.420,0:09:20.259 तुम्हांला हे ठाऊक आहे. 0:09:20.260,0:09:24.979 अनेकदा, काम बिनचूक हवं, या भीतीपोटी [br]आपण ते सुरूच करत नाही. 0:09:24.980,0:09:28.980 योग्य वेळी करू, योग्य क्षमता आली की करू, [br]असं म्हणतो. 0:09:29.768,0:09:33.768 यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतात. 0:09:34.027,0:09:37.416 त्यापेक्षा त्या कामात झटकन उडी घेऊन [br]ते करूनच टाकलं तर? 0:09:37.417,0:09:39.907 ते चांगलं होतंय की नाही, [br]याची चिंता कशाला? 0:09:40.392,0:09:43.961 या विचारामुळे काम सुरु करणं सोपं जातं. 0:09:43.962,0:09:47.072 मग चुकीच्या पद्धतीने का होईना, [br]ते करून संपतं. 0:09:47.440,0:09:48.669 नंतर मागे वळून पाहताना 0:09:48.670,0:09:53.810 आपल्या लक्षात येतं, की [br]ते काही तितकंसं चुकीचं नव्हतं. 0:09:56.007,0:09:58.196 माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला [br]चिंताविकार आहे. 0:09:58.197,0:10:01.937 तिने हा मंत्र वापरायला सुरुवात केली आहे. 0:10:03.142,0:10:07.511 ती म्हणते, "या मंत्रामुळे [br]माझं आयुष्य बदलून गेलं. 0:10:07.512,0:10:12.732 आता मी पूर्वीपेक्षा कमी वेळात कामं उरकते. 0:10:13.887,0:10:20.297 चुकीची मुभा असल्यामुळे मी [br]धोका पत्करते, काही वेगळं करून पाहते. 0:10:20.818,0:10:25.598 या वेगळ्या पद्धतीमुळे कामातली मजा अनुभवते. 0:10:26.562,0:10:32.472 या मंत्रामुळे चिंतेची जागा [br]उत्साहाने घेतली आहे. " 0:10:34.113,0:10:41.063 चुकीच्या पद्धतीने काम करा, आणि [br]करता करता कामात सुधारणा करा. 0:10:42.589,0:10:46.119 आता यावर विचार करा पाहू.. 0:10:46.333,0:10:53.333 आजपासून तुम्ही हा मंत्र वापरला, [br]तर तुमच्या आयुष्यात काय बदल घडेल? 0:10:57.743,0:11:01.743 चिंताविकाराचा सामना करण्याचं दुसरं धोरण, [br]स्वतःला क्षमा करणे. 0:11:02.216,0:11:05.116 हे फार प्रभावी आहे. 0:11:06.381,0:11:09.620 चिंताग्रस्त लोक आपल्या चुका, [br]काळज्या, दुःखभावना 0:11:09.621,0:11:15.941 याबद्दल अति विचार करतात. 0:11:16.815,0:11:22.285 समजा, तुमचा एक मित्र [br]सतत तुमच्या चुका शोधून काढून 0:11:22.453,0:11:25.242 त्या तुम्हांला सांगतो आहे. 0:11:25.243,0:11:28.722 तुमच्या आयुष्यात जे जे काही [br]वाईट घडलं असेल, ते सर्व. 0:11:28.723,0:11:30.092 या माणसाला 0:11:30.093,0:11:33.243 ताबडतोब हाकलून द्यावं, [br]असं तुम्हांला वाटेल, हो ना? 0:11:34.639,0:11:40.219 चिंताग्रस्त लोक दिवसभर स्वतःलाच [br]हा त्रास देत असतात. 0:11:40.505,0:11:42.595 ते स्वतःशी फारसे चांगुलपणाने वागत नाहीत. 0:11:42.939,0:11:46.939 तर आता, स्वतःशी जरा दयाळूपणे वागून पहा. 0:11:47.473,0:11:50.313 स्वतःच स्वतःचा आधार व्हा. 0:11:50.834,0:11:54.283 हे कसं करायचं?[br]स्वतःच्या चुकांबद्दल 0:11:54.284,0:11:55.733 स्वतःला क्षमा करायची. 0:11:55.734,0:11:58.414 मग त्या अगदी नुकत्याच केलेल्या चुका असोत, 0:11:58.766,0:12:00.876 किंवा भूतकाळातल्या. 0:12:02.221,0:12:05.180 पूर्वी कधीतरी भीतीने ग्रस्त झाल्याची [br]शरम वाटत असेल, 0:12:05.181,0:12:06.741 तर त्याबद्दल स्वतःला क्षमा करा. 0:12:07.231,0:12:10.171 तुम्हांला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं असेल, 0:12:10.509,0:12:12.648 पण तसा धीर झाला नसेल, 0:12:12.649,0:12:14.559 तर चिंता करू नका, स्वतःला क्षमा करा. 0:12:14.947,0:12:17.946 या सगळ्या गोष्टींबद्दल [br]स्वतःला क्षमा करा. 0:12:17.947,0:12:22.467 मग तुम्हांला स्वतःविषयी [br]जरा जास्त करुणा वाटेल. 0:12:23.547,0:12:26.667 हे केल्याशिवाय तुमच्या मनाच्या जखमा [br]भरून येणार नाहीत. 0:12:28.094,0:12:31.044 आता शेवटची, पण महत्त्वाची गोष्ट. 0:12:32.081,0:12:34.920 आपल्या आयुष्याला 0:12:34.921,0:12:37.871 काहीतरी हेतू किंवा अर्थ असणं. 0:12:39.238,0:12:43.328 आपण आयुष्यात कोणतंही काम केलं, 0:12:43.915,0:12:46.034 कितीही पैसा कमावला, 0:12:46.035,0:12:51.185 तरीही कोणालातरी आपण हवे आहोत, [br]या भावनेशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. 0:12:51.799,0:12:55.428 आपल्या कृतीमुळे कोणाचं तरी भलं व्हावं, 0:12:55.429,0:12:58.089 किंवा आपल्या प्रेमाचा कोणाला तरी [br]आधार वाटावा. 0:12:59.744,0:13:00.973 म्हणजे, 0:13:00.974,0:13:04.553 कोणीतरी आपली स्तुती केली तर आपण सुखी होऊ, [br]असं नव्हे. 0:13:04.554,0:13:08.093 याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्यांसाठी [br]कधीच काही केलं नाही, 0:13:08.094,0:13:11.804 तर मानसिक आरोग्य [br]ढासळण्याची शक्यता असते. 0:13:13.642,0:13:17.282 सुप्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट [br]डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात, 0:13:17.771,0:13:21.380 "ज्यासाठी जगावं, असं काही उरलं नाही, किंवा 0:13:21.381,0:13:24.551 आयुष्याकडून कसलीच अपेक्षा शिल्लक नाही, 0:13:24.742,0:13:27.651 असं म्हणणाऱ्या व्यक्तींना समजवायला हवं, 0:13:27.652,0:13:32.082 की तुम्ही जिवंत आहात, म्हणजे अजून [br]तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. " 0:13:35.601,0:13:40.611 इतर कोणाच्या हितासाठी केलेली कृती [br]आपल्याला कठीण समयी तारून नेते. 0:13:41.493,0:13:44.192 जगायचं कशासाठी, [br]हे त्यातून आपल्याला समजतं, 0:13:44.193,0:13:50.133 आणि मग आपण कोणत्याही परिस्थितीचा[br]सामना करू शकतो. कोणत्याही. 0:13:52.771,0:13:55.541 आता प्रश्न असा, की [br] 0:13:56.324,0:14:00.154 केवळ दुसऱ्यासाठी अशी [br]एक तरी कृती तुम्ही करता का? 0:14:01.127,0:14:02.867 मग ते विनावेतन काम असेल, 0:14:03.682,0:14:08.941 किंवा आज, इथे मिळालेलं हे ज्ञान [br]इतरांना सांगणं असेल. 0:14:08.942,0:14:11.372 खासकरून ज्यांना गरज असेल, त्यांना. 0:14:11.511,0:14:15.230 आणि अशाच लोकांजवळ समुपदेशन घेण्यासाठी [br]पैसे नसतात. 0:14:15.231,0:14:16.730 आणि साधारणपणे अशाच लोकांमध्ये 0:14:16.731,0:14:19.821 चिंताविकार मोठ्या संख्येने आढळतो. 0:14:20.232,0:14:22.621 हे ज्ञान त्यांना द्या, सर्वांना द्या. 0:14:22.622,0:14:26.352 कारण त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य [br]खरोखर सुधारेल. 0:14:30.317,0:14:32.857 आता आणखी एक विचार सांगून हे भाषण संपवते. 0:14:35.224,0:14:39.423 इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा [br]आणखी एक मार्ग म्हणजे 0:14:39.424,0:14:44.244 पुढच्या पिढयांना ज्याचा उपयोग होईल, [br]असं काही कार्य करणे. 0:14:45.614,0:14:50.513 तुमचं हे कार्य त्यांना समजलं नाही, 0:14:50.514,0:14:51.793 तरी हरकत नाही. 0:14:51.794,0:14:57.113 कारण तुमचं कार्य तुम्हांला ठाऊक असेल.[br]त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, 0:14:57.114,0:15:01.904 की या बाबतीत आपण एकमेव आहोत, [br]आणि हेच आपल्या आयुष्याचं महत्त्व आहे. 0:15:02.737,0:15:04.016 धन्यवाद. 0:15:04.017,0:15:05.347 (टाळ्या)